Thane Mahanagarpalika Recruitment 2025 : ठाणे महानगरपालिका ही ठाणे शहर आणि आसपासच्या भागातील लोकांना पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा, शाळा, अग्निशमन यांसारख्या अत्यावश्यक सुविधा पुरवणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे महापालिकेच्या विविध विभागात मनुष्यबळाची गरज वाढत असते. यासाठी दरवर्षी ठाणे महापालिका वेळोवेळी भरती काढते.
यंदाची ही भरती विशेष आहे कारण यात आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, प्रशासन विभाग, तांत्रिक विभाग अशा सगळ्या क्षेत्रात पदे आहेत. म्हणजेच डॉक्टर, नर्स, फिजिशियन, लॅब टेक्निशियन, फायरमन, कारकून, अभियंते, सहाय्यक कर्मचारी अशा विविध नोकऱ्या यात उपलब्ध आहेत.
- जाहिरात क्रमांक : 12/2025
- भरती संस्था : ठाणे महानगरपालिका, ठाणे
- एकूण पदसंख्या : 1773
- अर्ज पद्धत : ऑनलाइन
- अर्जाची सुरुवात : 12 ऑगस्ट 2025
- अर्जाची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2025
एकूण जागांची आणि पदांची सविस्तर माहिती :
या भरतीत एकूण 1773 पदे आहेत. खाली काही महत्वाची पदे आणि त्यांची संख्या दिली आहे :
- वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन)
- पदसंख्या : 03
- पगार (रु.) : ₹67,700 – ₹2,08,700
- वैद्यकीय अधिकारी (सर्जन)
- पदसंख्या : 02
- पगार (रु.) : ₹67,700 – ₹2,08,700
- वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ)
- पदसंख्या : 03
- पगार (रु.) : ₹67,700 – ₹2,08,700
- वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ)
- पदसंख्या : 03
- पगार (रु.) : ₹67,700 – ₹2,08,700
- वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या : 15
- पगार (रु.) : ₹56,100 – ₹1,77,500
- नर्सिंग अधीक्षक
- पदसंख्या : 01
- पगार (रु.) : ₹44,900 – ₹1,42,400
- कर्मचारी नर्स
- पदसंख्या : 100+
- पगार (रु.) : ₹29,200 – ₹92,300
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- पदसंख्या : 25
- पगार (रु.) : ₹25,500 – ₹81,100
- फायरमन
- पदसंख्या : 50+
- पगार (रु.) : ₹21,700 – ₹69,100
- लिपिक
- पदसंख्या : 40+
- पगार (रु.) : ₹19,900 – ₹63,200
(अधिकृत जाहिरातीत संपूर्ण पदांची यादी आहे)
प्रत्येक पदाचे काम काय असते?
- वैद्यकीय अधिकारी : रुग्णांचे तपासणे, योग्य उपचार सुचवणे, रुग्णालयातील वैद्यकीय टीमचे नेतृत्व करणे.
- नर्सिंग अधीक्षक : हॉस्पिटलमधील नर्सिंग सेवा सुरळीत चालेल याची जबाबदारी.
- कर्मचारी नर्स : रुग्णांना वेळेवर औषधे देणे, डॉक्टरांच्या सूचनांनुसार उपचार करणे.
- लॅब टेक्निशियन : रक्त, मूत्र, इतर तपासण्या करून त्यांचे रिपोर्ट तयार करणे.
- फायरमन : आग लागल्यास तत्काळ कार्यवाही करणे, लोकांचे प्राण वाचवणे, अग्निशमन साहित्याची देखरेख करणे.
- लिपिक : कार्यालयीन नोंदी, फाईल्स, पत्रव्यवहार आणि संगणकावरची कामे पाहणे.
शैक्षणिक पात्रता :
प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पात्रता आहे:
- वैद्यकीय पदांसाठी एमबीबीएस/एमडी/एमएस/डीएनबी
- नर्ससाठी जनरल नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc Nursing
- लॅब टेक्निशियनसाठी B.Sc/ DMLT
- फायरमनसाठी 10वी/12वी + फायर कोर्स
- लिपिकासाठी पदवी + टायपिंग स्किल्स
अधिकृत संकेतस्थळ, सविस्तर जाहिरात व अर्ज :
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा :
- बहुतांश पदांसाठी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 43 वर्षे पर्यंत सूट)
- काही वैद्यकीय पदांसाठी जास्तीत जास्त 45 वर्षे
पगार :
- या भरतीत पगार पदानुसार वेगळा आहे –
- सर्वात कमी पगार – ₹15,000/-
- सर्वात जास्त पगार – ₹2,08,700/-
- पगारासोबत इतर भत्ते, सुट्ट्या, वैद्यकीय सुविधा मिळतील.
अर्ज प्रक्रिया :
- अधिकृत वेबसाईटवर जा – www.thanecity.gov.in
- भरती विभागात ऑनलाइन अर्ज पर्याय निवडा
- रजिस्ट्रेशन करून लॉगिन करा
- फोटो, सही, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज फी भरून सबमिट करा
- अर्जाची प्रिंट काढून ठेवा
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग: ₹1,000/-
- आरक्षित प्रवर्ग: ₹900/-
- फी परत मिळणार नाही
महत्वाच्या तारखा :
- अर्ज सुरू: 13 ऑगस्ट 2025
- शेवटची तारीख: 03 सप्टेंबर 2025
महत्वाच्या सूचना :
- एका पदासाठी एकच अर्ज करा
- चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाईल
- मूळ कागदपत्रे पडताळणीला आणणे बंधनकारक आहे
- परीक्षा/मुलाखतीसाठी तारीख नंतर कळवली जाईल
