Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी आणि उच्चशिक्षित विशेषज्ञांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. फिजिशियन, बधिरीकरण तज्ञ, स्त्री रोग तज्ञ आणि बालरोग तज्ञ या महत्त्वाच्या पदांवर करार पद्धतीने (Contract Basis) नियुक्तीसाठी थेट मुलाखती (Walk-in-Interview) आयोजित करण्यात आल्या आहेत. जर तुम्ही आकर्षक मानधनावर पुण्यात सेवा करण्याची संधी शोधत असाल, तर ही जाहिरात तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
रिक्त पदांचा तपशील आणि मासिक मानधन (Vacancy Details and Salary)
या भरतीमध्ये एकूण ४ पदांसाठी ४४ दिवस व तदनंतर ०१ दिवस तांत्रिक खंड याप्रमाणे १२ महिन्यांच्या कालावधीसाठी अस्थायी सेवा घ्यायची आहे.
| अ.क्र. | पदाचे नाव | एकूण पदसंख्या | मासिक एकवट मानधन (₹) |
|---|---|---|---|
| १ | फिजिशियन | ०४ | २,५०,०००/- |
| २ | बधिरीकरण तज्ञ | ०२ | २,५०,०००/- / १,५०,०००/- |
| ३ | स्त्री रोग तज्ञ | ०८ | २,५०,०००/- / १,५०,०००/- |
| ४ | बालरोग तज्ञ | ०९ | २,५०,०००/- / १,५०,०००/- |
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (Eligibility Criteria)
उमेदवारांना जाहिरात प्रकटन तक्यात नमूद केल्याप्रमाणे पदनिहाय शैक्षणिक व अनुभव पात्रता धारण करणे आवश्यक आहे.
- मेडिसिन तज्ञ (Physician)
- शैक्षणिक पात्रता:
- मेडिसिन विषयातील MD / DNB उत्तीर्ण
- अनुभव:
- शासकीय / निमशासकीय / खाजगी (५० ते १०० खाटांचे) रुग्णालयात
- संबंधित कामाचा ०३ ते ०५ वर्षांचा अनुभव आवश्यक
- ICU अनुभवास प्राधान्य
- शैक्षणिक पात्रता:
- बधिरीकरण तज्ञ (Anaesthetist)
- ऍनेस्थेशिया विषयातील एमडी / डीएनबी
- एमबीबीएस + डीए (डिप्लोमा इन ऍनेस्थेशिया)
- स्त्री रोग तज्ञ (Gynaecologist)
- शैक्षणिक पात्रता:
- स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विषयातील MD / DNB
- MBBS + DGO
- शैक्षणिक पात्रता:
- बालरोग तज्ञ (Paediatrician)
- शैक्षणिक पात्रता:
- बालरोग चिकित्सा शास्त्र विषयातील MD / DNB
- MBBS + DCH
- अनुभव:
- नवजात अतिदक्षता विभाग (NICU) अनुभवास प्राधान्य
- शैक्षणिक पात्रता:
- नोंदणी: महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
मुलाखतीचा दिनांक, वेळ आणि स्थळ (Interview Schedule and Venue)
मुलाखत (Walk-in-Interview) आणि मूळ कागदपत्रांची पडताळणी खालील निश्चित वेळेतच घेतली जाणार आहे.
| अ.क्र. | पदनाम | दिनांक | वेळ |
|---|---|---|---|
| १ | फिजिशियन | दि. १०/१२/२०२५ | सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० |
| २ | बधिरीकरण तज्ञ | दि. १०/१२/२०२५ | दुपारी १२.०० ते दुपारी ०२.०० |
| ३ | स्त्री रोग तज्ञ | दि. १०/१२/२०२५ | दुपारी ०२.०० ते सायं ०४.०० |
| ४ | बालरोग तज्ञ | दि. १०/१२/२०२५ | सायं ०४.०० ते सायं ०६.०० |
मुलाखतीचे ठिकाण: छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, (जुना जी.बी. हॉल) पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, शिवाजीनगर, पुणे ४११००५.
अधिकृत संकेतस्थळ व सविस्तर जाहिरात :
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
महत्त्वाचे निर्देश आणि अटी (Key Instructions)
- अर्ज सादर करण्याची पद्धत:
- उमेदवारांनी निश्चित वेळेस, कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन, ऑफ लाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. टपालाद्वारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- वयोमर्यादा:
- खुला प्रवर्ग – ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय प्रवर्ग – ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- कागदपत्रे:
- उमेदवारांनी विहित नमुन्यातील मूळ अर्ज आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्वयं साक्षांकित प्रतींसहित उपस्थित राहावे. सर्व स्वयं साक्षांकित प्रतींवर पानवारी (पेजिंग) करणे आवश्यक आहे.
- सेवा अनामत (Service Deposit):
- निवड झालेल्या उमेदवारास सेवेत रुजू होण्यापूर्वी रु. ५०,०००/- (पन्नास हजार फक्त) इतकी रक्कम ‘सेवा अनामत’ म्हणून भरावी लागेल. या रकमेवर कोणतेही व्याज मिळणार नाही.
- सेवा रद्द करणे:
- करार कालावधी पूर्ण होण्याआधी सेवा रद्द करावयाची असल्यास, एक महिना अगोदर लेखी स्वरुपात कळविणे बंधनकारक आहे. लेखी अवगत न केल्यास, एक महिन्याच्या एकवट मानधनाची रक्कम जप्त करण्यात येईल.
- अंतिम अधिकार:
- भरती प्रक्रियेतील कोणत्याही बाबीबाबत बदल करण्याचे, स्थगित करण्याचे किंवा रद्द करण्याचे सर्व अधिकार मा. महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत.
- अर्जाची अपात्रता: अपूर्ण भरलेले अर्ज, चुकीचे भरलेले अर्ज, किंवा निश्चित वेळेनंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
टीप: उमेदवारांनी मुलाखतीला जाताना सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या स्वयं साक्षांकित प्रती घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी. कामाचे स्वरूप दररोज ०८ तास (आरोग्य खात्याच्या आवश्यकतेनुसार रोटेशन प्रमाणे) सेवा देणे बंधनकारक राहील.
