डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये भरती (PDKV Akola Bharati 2026) विविध पदांची भरती निघाली असून, ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी!डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे तांत्रिक पदासाठी पात्र उमेदवारांना डायरेक्ट मुलाखती द्वारा अर्ज मागविण्यात आले आहे इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून नोकरीची संधी मिळावा. या पदाची निवड हे मुलाखत द्वारे होणार असून ३० जून रोजी अकोला येथे उमेदवारांनी आपल्या कागदपत्रासह वेळेवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
जर कोणाला या पदाबाबत माहिती हवी असेल आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याची सर्व माहिती खालील लेखामध्ये दिली आहे.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये भरती (PDKV Akola Bharati 2026) या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे खालील प्रमाणे दिली आहे.
ड्रायव्हर-कम-मेकॅनिक (ट्रॅक्टर) पद:
- ITI प्रमाणपत्र ट्रॅक्टर मेकॅनिकल मधील असणे आवश्यक आहे.
- सक्षम प्राधिकरणाकडून दिलेला वैध ट्रॅक्टर ड्रायव्हिंग लायसन्स (LMV-TT/Tractor) असणे अनिवार्य आहे
- शासकीय संस्थेमध्ये संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
फिटर पद:
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे फिटर ट्रेड मधील ITI प्रमाणपत्र असावी लागते.
- शासकीय संस्थेत कृषी यंत्रसामग्रीच्या दुरुस्ती आणि देखभालीचा अनुभव असावा लागतो.
टीप : मुलाखतीच्या वेळी उमेदवाराकडे शैक्षणिक पात्रतेची मूळ कागदपत्रे सोबत असणे बंधनकारक आहे.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये भरती (PDKV Akola Bharati 2026) मधील पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
- या विद्यापीठाच्या वेबसाईट वरून डाउनलोड केलेला आणि पूर्ण भरलेला अर्ज असणे अनिवार्य आहे.
- ITI प्रमाणपत्र (शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्र)
- ड्रायव्हिंग लायसन्स (ड्रायव्हर-कम- मेकॅनिक पदासाठी सक्षम प्रदीप करणारी दिलेल्या वैद्य ट्रॅक्टर ड्रायव्हिंग लायसन्स)
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो – 2
- उमेदवाराकडे शासकीय संस्थेचे कामाचा अनुभव असलेले प्रमाणपत्र.
- ना हरकत प्रमाणपत्र (NOC) (याआधी उमेदवार कुठे काम करत असेल तर त्या मालकाकडून घेतलेले ना हरकत प्रमाणपत्र)
- अर्जासोबत जोडलेली घोषणापत्र पूर्ण असलेले
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये भरती (PDKV Akola Bharati 2026) या पदाचा अर्ज भरण्यासाठी खालील प्रक्रिया भाऊ शकता.
- सर्वप्रथम उमेदवारांनी विद्यापीठाच्या अधिकृत पोर्टलला www.pdkv.ac.in एप्लीकेशन फॉर्म डाउनलोड करून घ्यावा.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्व भरावी. तुमची वैयक्तिक माहिती (नाव पत्ता शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची सविस्तर माहिती लिहा)
- अर्जा सोबत नमूद केलेली सर्व कागदपत्रे जोडा (अर्जासोबत शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे, अनुभवाची प्रमाणपत्रे (असल्यास), आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती)
- अर्जाच्या शेवटी दिलेली घोषणापत्र त्यावर स्वाक्षरी करणे अनिवार्य असते.
- मुलाखतीसाठी गेल्यानंतर पूर्ण भरलेला अर्ज, मूळ कागदपत्रे आणि एक पासपोर्ट साईज फोटो सोबत ठेवा.
- मुलाखतीसाठी टाईम : ९:०० ते १०:००
वेतन
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये भरती (PDKV Akola Bharati 2026) या पदासाठी वेतन हे खालील प्रमाणे दिले आहे.
| पद | वेतन संरचना |
| ड्रायव्हर-कम-मेकॅनिक (ट्रॅक्टर) | २५,५०० रुपये, महागाई भत्ता (DA), १०% घरभाडे भत्ता, TA |
| फिटर | २५,५०० रुपये, महागाई भत्ता (DA), १०% घरभाडे भत्ता (HRA), TA |
निवड प्रक्रिया
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये भरती (PDKV Akola Bharati 2026) या भरतीची निवड प्रक्रिया ही खालील प्रमाणे सविस्तर दिली आहे.
- जाहिरात : या विद्यापीठातून निघणाऱ्या पदांसाठी अधिकृत संकेतस्थळावर विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाते.
- अर्ज प्रक्रिया : उमेदवारांनी या पदांसाठी निघालेल्या जाहिरातीत दिलेल्या नियमानुसार अर्ज करणे अनिवार्य असते. काही पदांसाठी ईमेलद्वारे आणि काही पदांसाठी कुरिअर किंवा स्पीड पोस्टद्वारे अर्ज पाठविण्यात सांगितले जाते.
- मुलाखत (Interview): कंत्राटी किंवा तात्पुरत्या पदांसाठी वॉक-इन-इंटरव्ह्यू किंवा मुलाखतीद्वारे निवड करण्यात येते.
- छाननी (Screening) : कर्जाची छाननी करून झाल्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी ईमेल किंवा दूरध्वनीद्वारे कळविण्यात येते. काही प्रकरणात १:५ या गुणोत्तराने उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येते.
- दस्तऐवज पडताळणी : उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी सर्व कागदपत्रे मूळ अनावित ((Educational Certificates, Caste Certificate, Experience Certificate)
कामे
ड्रायव्हर-कम-मेकॅनिक (ट्रॅक्टर) साठी
- या पदाचे काम ट्रॅक्टर आणि संबंधित शेती अवजारांचे योग्य प्रकारे ठेवणे.
ट्रॅक्टर आणि यंत्रसामग्रीची देखभाल आणि दुरुस्ती नियमितपणे करणे.
संशोधन प्रकल्पाच्या कामासाठी गरज असलेले तांत्रिक गरजांची पुरवणी करणे.
फिटरसाठी
- शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध यंत्रणांची दुरुस्ती आणि देखभाल करणे.
- यंत्रणाची विविध भागांची जोडणी करणे, प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात यंत्रणा चे कार्य सुरळीत राहील याची काळजी घेणे.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : ही माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या अधिकृत जाहिरातीवर आधारित आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर (www.pdkv.ac.in) जाऊन मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या भरती प्रक्रियेत कोणतेही बदल करण्याचा किंवा ती रद्द करण्याचा पूर्ण अधिकार विद्यापीठाकडे राखीव आहे. अधिकृत माहितीसाठी केवळ विद्यापीठाच्या संकेतस्थळाचाच आधार घ्यावा.
तुम्ही येथे “महाराष्ट्र राज्य सहकारी बँके भरती 2026” भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकतो : https://totalnaukri.com/maharashtra-state-co-operative-bank-2026/