Indian Air Force : अग्निवीर वायू 2026 या पदासाठी भरती निघाली आहे | १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Indian Air Force : अग्निवीर वायू (Agniveer Vayu 2026) ही भरती प्रक्रिया भारतीय हवाई दलामध्ये निघाली असून याची सर्व माहिती खालील लेखामध्ये दिली आहे. जर तुम्हाला अग्निविर वायू या पदासाठी खर्च करायचा आहे किंवा तुम्हाला इच्छा आहे तुम्ही इंडियन एअरफोर्स मध्ये आपले करिअर घडवावे तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. तरुणांसाठी अग्निविर वायू ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठित महत्त्वाची संधी आहे. अग्निविर वायू या पदांमध्ये काम करणे हे देशाचे संरक्षण सेवेमध्ये करिअर करण्याच्या उद्देशाने, शिस्तबद्ध जीवनशैली आणि हे एक आदर्श व्यासपीठ म्हणून ओळखले जाते.

विशेषतः या पदासाठी उमेदवार फक्त १२वी उत्तीर्ण, विज्ञान किंवा विज्ञान शिवाय हवाई दलामध्ये भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते. जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा आहे तर अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया आणि वयोमर्यादा याची सर्व सविस्तर माहिती खालील लेखांमध्ये दिली आहे.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

Indian Air Force : अग्निवीर वायू या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दिली आहे.

  • उमेदवाराचे शिक्षण दहावी आणि बारावी किंवा सक्षम परीक्षेत गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी ही विषय असणे अनिवार्य मानले जाते.
  • 12 वी मध्ये कमीत कमी ५०% गुण असणे आणि इंग्रजी विषयातही ५०% गुण अनिवार्य आहे.
  • जर तुम्ही 12 वी उत्तीर्ण नसाल तर तुम्ही राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून इंजीनियरिंग तीन वर्षाचा डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Automobile/Computer Science/Instrumentation Technology/Information Technology) यामध्ये ५०% गुण असणे अनिवार्य असते.
  • जर उमेदवार कोणत्याही शाखेतून 12 वी किंवा सक्षम परीक्षा कमीत कमी ५०% गुणांसह उत्तीर्ण असेल तर या भरतीसाठी तो पात्र ठरू शकतो.
  • उमेदवारांनी 12 वी कोणत्याही शाखेतून पूर्ण केली असली तरीही इंग्रजी विषयांमध्ये ५०% गुण असणे आवश्यक असते.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

Indian Air Force : अग्निवीर वायू या भरतीसाठी उमेदवाराकडेल खालील आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

  • १० वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • १२ वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • उमेदवाराचे पासपोर्ट साईज फोटो
  • पांढऱ्या कागदावर निळ्या शाही ने केलेली स्वाक्षरी.
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड

निवड प्रक्रिया वेळी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे

Indian Air Force : अग्निवीर वायू 2026:-

  • ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट.
  • प्रवेश पत्र
  • पळत पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा शाळेचे ओळखपत्र
  • १०वी आणि १२वी चे मूळ गुणपत्रिका
  • पासपोर्ट आकाराचा फोटो १०-२०
  • ​ना-हरकत प्रमाणपत्र (NOC)
  • जर तुमच्याकडे असेल तर एनसीसी (NCC) प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र किंवा संगणक प्रमाणपत्र

टीप :

टीप : सर्व मूळ कागदपत्रे त्यांच्या कमीत कमी ५-६ छायांकित प्रती सोबत असणे फायदेशीर ठरेल आणि त्या स्व-साक्षांकित असले फायदेशीर ठरते. कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची चूक आढळल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.

या पदाच्या परीक्षेसाठी अभ्यासक्रम (Syllabus)

Indian Air Force : अग्निवीर वायू या पदासाठी सिल्याबस हा तुम्ही निवडलेल्या ग्रुप वर आधारित असतो. परीक्षेच्या विषयावर अभ्यासक्रम खालीलप्रमाणे पाहू शकता :

इंग्रजी (English) – सर्व गटांसाठी अनिवार्य

  • व्याकरण (Grammar) : काळ (Tenses), आर्टिकल, प्रिपोझिशन, डिटरमिनर्स, मॉडल्स, सब्जेक्ट-व्हर्ब कॉकॉर्ड, क्लॉज
  • शब्दसंग्रह (Vocabulary) : समानार्थी (Synonyms), विरुद्धार्थी (Antonyms), वन वर्ड सबस्टिट्यूशन, स्पेलिंग सुधारणा, वाक्प्रचार (Idioms/Phrases)
  • आकलन (Comprehension) : उताऱ्यावरील आधारित प्रश्न

विज्ञान शाखा (Science Subjects – पूर्वीचे Group X)

  • भौतिकशास्त्र (Physics) : मोजमाप (Measurement), गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती, गुरुत्वाकर्षण, थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, ऑप्टिक्स
  • गणित (Mathematics) : संच, संबंध आणि कार्ये (Sets, Relations & Functions), त्रिकोणमिती, कॉम्प्लेक्स नंबर्स, द्विघात समीकरणे, क्रमवारी (Sequences & Series), लिनियर इनइक्वालिटीज, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन, द्विपद प्रमेय (Binomial Theorem), 3D भूमिती, कलन (Calculus – Differentiation & Integration)

विज्ञान शाखा वगळून (Other than Science Subjects – पूर्वीचे Group Y)

  • तर्कक्षमता (Reasoning) : कोडिंग-डिकोडिंग, अंकमालिका, रक्तसंबंध, दिशाज्ञान चाचणी, वेन आकृत्या, नॉन-वर्बल रिझनिंग (आकृती ओळखणे), तर्कसंगत प्रश्न
  • सामान्य जागरूकता (General Awareness) : चालू घडामोडी (Current Affairs), इतिहास, भूगोल, नागरीशास्त्र (Civics), क्रीडा, पुरस्कार, सामान्य विज्ञान, संगणकाची मूलभूत माहिती
  • परीक्षा पद्धत : विज्ञान विषय = ६० मिनिटांत इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि गणित. एकूण प्रश्न 70 असतात.
  • इतर विज्ञान विषय = ४५ मिनिटांत इंग्रजी आणि RAGA एकूण प्रश्न 50 असतात.
  • दोन्हीसाठी = 88 मिनिटात सर्व विषय सोडवावी लागतात एकूण प्रश्न 100
  • गुण = प्रत्येक बरोबर आलेल्या उत्तराला एक गुण आणि प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी ०.२५ कापला जातो या परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते.

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

Indian Air Force : अग्निवीर वायू अर्ज प्रक्रिया आहे ऑनलाइन असते. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशी करावी याची सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे:

  • सर्वप्रथम तुम्ही भारतीय हवाई दलाच्या अधिकृत संख्या स्थळाला भेट द्या https://agnipathvayu.cdac.in
  • मुख्य पानावर Candidate Login या पर्यायावर क्लिक करा.
  • जर तुम्ही नवीत असाल तर न्यू रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडा.
  • तुमची ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून ओटीपी मिळवा ओटीपी मिळाल्यानंतर नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करा आणि सूचना वाचा आणि Continue पर्यायवर क्लिक करा.
  • यानंतर तुमची वैयक्तिक माहिती (नाव, जन्मतारीख, सत्ता आणि पालकांचे नाव) ही सर्व माहिती अचूकपणे भरा.
  • यानंतर तुमची सर्व कागदपत्रे (१०वीचे गुणपत्रक, १२वीचे गुणपत्रक/डिप्लोमा प्रमाणपत्र, आधार कार्ड) योग्य साईज मध्ये अपलोड करा.
  • तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि डाव्या हाताचा पण त्याचा ठसा योग्य आकारात अपलोड करा.
  • या नंतर तुम्हाला आवडते ते पाच परीक्षा केंद्र निवडा.
  • परीक्षा केंद्र निवडून झाल्यानंतर अर्जाची फी ऑनलाइन पद्धतीने भरून घ्या.
  • संपूर्ण अर्ज पुन्हा एकदा तपासून घ्या माहिती चुकीची असल्यास दुरुस्त करून घ्या. अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर परत उघडता येत नाही आणि माहितीमध्ये त्रुटी आढळल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता असते.
  • सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करून झाल्यानंतर सबमिट करा.
  • सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून जपून ठेवा.

टीप : या पदाबाबतच्या सूचना प्रवेश पत्र सर्व ईमेलद्वारे कळवले जाते.

वेतन (Salary)

Indian Air Force : अग्निवीर वायू या पदासाठी वेतन खालील प्रमाणे दिले आहे.

कार्यकाळ (Year)मासिक वेतन (Customized Package)३०% निधी (Agniveer Corpus Fund)हातात येणारी रक्कम (In-Hand Salary)
पहिला वर्ष३०,००० ९,००० २१,०००
दुसरा वर्ष३३,००० ९,९०० २३,१००
तिसरा वर्ष३६,५००१०,९५० २५,५५०
चौथा वर्ष४०,००० १२,०००२८,०००
Indian Air Force feature image
Indian Air Force : अग्निवीर वायू 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत अधिसूचना, जाहिराती व उपलब्ध स्रोतांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात व सूचना काळजीपूर्वक वाचावी. या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक व माहितीपर उद्देशाने देण्यात आलेली आहे. कोणत्याही त्रुटी, बदल किंवा नुकसानीसाठी TotalNaukri.com जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “एसटी चालक वाहक 2026” पदाची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/msrtc-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!