Assistant Professor Recruitment 2026 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 139 पदे हे पदे विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर शिक्षण विभागामध्ये, चालविलेल्या महाविद्यालयांमध्ये, शाळेमध्ये आणि विशेष अभ्यास केंद्रामध्ये निघाले आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीची अर्ज प्रक्रिया 10 ऑगस्ट 2026 पर्यंत असून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 40,000 रुपये या वेतनावर 30 एप्रिल 2027 नियुक्ती दिली जाणार आहे. या भरती लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि निवड प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखकांमध्ये पाहू शकता.
महत्त्वाच्या तारखा व जागा
- जाहिरात दिनांक: २४ जुलै २०२६
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: १० ऑगस्ट २०२६
- पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे: विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.
- मुलाखतीची तारीख: उमेदवारांनी तपशीलांसाठी विद्यापीठाचे संकेतस्थळ नियमितपणे तपासावे
जागा :
- मानव्यशास्त्र भाषा : ११ पदे
- मानव्यशास्त्र [समाजशास्त्रे] (Social Sciences): ३५ पदे
- विज्ञान व तंत्रज्ञान विज्ञान : ४१ पदे
- वाणिज्य व व्यवस्थापन (Business Management/Commerce): ०७ पदे
- आंतर-विद्याशाखीय अभ्यास (Fine Arts / Library Sci. / Mass Comm. / Education / Physical Education): १८ पदे
- विद्यापीठाची विशेष अभ्यास केंद्रं (Centres of Specialized Studies): ०५ पदे
- विद्यापीठाची चालविलेली महाविद्यालयं / शाळा (Conducted Colleges / School): २२ पदे
- एकूण पदे: १३९
Assistant Professor Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
१. वाणिज्य, मानव्यशास्त्र, शिक्षण, कायदा, समाजशास्त्र, विज्ञान, भाषा, ग्रंथालय शास्त्र, शारीरिक शिक्षण आणि वृत्तपत्रविद्या (Mass Communication):
- या पदासाठी संबंधित किंवा सुसंगत विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी मध्ये कमीत कमी 55% गुण असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचे UGC किंवा CSIR द्वारे घेतली जाणारी NET परीक्षा किंवा UGC मान्यताप्राप्त SET परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
२. व्यवसाय व्यवस्थापन (Business Management):
- मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून कोणत्याही विषयामध्ये पदवी आणि व्यवसाय व्यवस्थापनात प्रथम श्रेणी सहा पदव्युत्तर पदवी असणे अनिवार्य आहे.
- पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर उमेदवाराकडे कमीत कमी दोन वर्षाचा व्यावसायिक अनुभव असणे अनिवार्य असते.
३. ललित कला (Fine Arts):
- संबंधित विषयांमध्ये उमेदवारांना कमीत कमी 55% गुणकारी मध्ये असणे आणि NET/SET किंवा Ph.D. असणे अनिवार्य आहे.
- राष्ट्रीय नाट्य विद्यालय किंवा इतर मान्यताप्राप्त संस्थेची पदवी किमान पदवी का घेतलेले असेल अनेक क्षेत्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावर कमीत कमी पाच वर्षे सातत्यपूर्ण कामगिरी केली असेल तर या पदासाठी तुम्ही पात्र ठरू शकता.
४. औषध निर्माण शास्त्र (Pharmaceutical Sciences):
- या पदासाठी फार्मसी पदवी आणि संबंधित फार्मसी शाखेमध्ये प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र ठरतात.
- लागू असलेला फार्मसी कायद्या अंतर्गत नोंदणीकृत फार्मासिस्ट हसणे अनिवार्य आहे.
५. आंतर-संस्थात्मक संगणक केंद्र (Inter Institutional Computer Centre):
- संभाजी शाखेमध्ये प्रथम श्रेणी B.E. / B.Tech / B.S. आणि M.E. / M.Tech / M.S. पदवी असणे बंधनकारक आहे.
- टीप : SC, ST, OBC आणि दिव्यांग उमेदवारांच्या पदवी तसेच पदव्युत्तर स्तरावरील गुणांमध्ये ५% गुणांची सवलत दिली जाऊ शकते.
Assistant Professor Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक (कंत्राटी पद्धतीवर) पदासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे.
- शैक्षणिक आणि व्यावसायिक मूळ कागदपत्रे
- आर्जाची प्रिंट आऊट ऑनलाइन पद्धतीने सादर केलेल्या
- सर्व कागदपत्रांच्या दोन-तीन यादी सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
- ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरण्याची पावती
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
- नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (Non-creamy layer Certificate)
Assistant Professor Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया How to Apply
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती चा अर्ज ऑनलाईन पद्धतीने आहे.
- सर्वप्रथम या विद्यापीठाच्या प्रतिकूल संकेतस्थळाला भेट द्या www.nagpuruniversity.ac.in
- नोंदणी करण्यासाठी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाका व नोंदणी करा.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्ड मिळेल याचा वापर करून लॉगिन करून घ्या.
- लॉगिन केल्यानंतर अर्जा मधील वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता आणि जन्मतारीख), शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
- नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे फोटोज स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रे योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज शुल्क प्रवर्गानुसार भरावी लागते, ऑनलाइन पद्धतीने भरून घ्या कारण अर्थ शुल्क भरल्याशिवाय अर्ज पूर्ण मानला जात नाही.
- कर्ज मधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करा कारण अर्ज सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येत नाही.
- अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट आणि अर्ज शुल्क भरलेली पावती जपून ठेवा.
मानधन
| तपशील | वेतन स्वरूप |
| मासिक मानधन | प्रतिमहिना ४०,०००/- रुपये एकत्रित वेतन दिले जाईल. |
| रजेचे नियम (Leave Rules) | निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण शैक्षणिक सत्रात केवळ ८ नैमित्तिक रजा (Casual Leaves) घेण्याची मुभा असेल. याशिवाय इतर कोणतीही रजा किंवा भत्ते दिले जाणार नाहीत. |
| नियुक्तीचा कालावधी | नियुक्ती सामील झाल्याच्या तारखेपासून ते ३० एप्रिल २०२७ पर्यंत राहील. |

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता, शैक्षणिक अर्हता, विषयनिहाय पदांची माहिती, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि निवड प्रक्रिया यांची खात्री करून घ्यावी. ऑनलाइन अर्ज भरताना सर्व माहिती अचूक नमूद करावी व आवश्यक कागदपत्रे निर्धारित स्वरूपात अपलोड करावीत. अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंट व शुल्क भरल्याची पावती भविष्यातील पडताळणीसाठी सुरक्षित ठेवावी. चुकीची किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो, त्यामुळे अंतिम अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व तपशील पुन्हा एकदा तपासणे आवश्यक आहे.
तुम्ही येथे गोदावरी कॉलेज जळगाव भरती २०२६ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/godavari-college-jalgaon-recruitment/