Talathi Bharti 2025 | तब्बल 1700 पदं भरतीसाठी जाहीर, तुमच्या जिल्ह्यात किती पदं?

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Talathi Bharti 2025 : राज्यात महसूल विभागात तलाठ्यांच्या सुमारे १७०० जागा भरल्या जाणार असल्याचं संकेत मिळाले आहेत. तलाठ्यांवर सध्या मोठा कार्यभार असल्यामुळे ही भरती अत्यंत आवश्यक बनली आहे. एकाच तलाठ्याच्या शंभर कामं, अनेक गावांचा कारभार, रेती माफियांविरोधातील कारवाई, निवडणूक कार्य — या सगळ्यामुळे तलाठ्यांची भरती ही राज्याच्या कारभारासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या लेखात आपण तलाठी भरती 2025 संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत — जिल्हानिहाय पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम (सिल्याबस), निवड प्रक्रिया, आणि तयारीसाठी मार्गदर्शन.

जिल्हानिहाय पदसंख्या (तात्पुरती यादी) :

अ.क्रजिल्हापदसंख्या
1पुणे385
2बीड913
3नाशिक274
4नगर255
5नांदेड135
6गोंदिया717
7रत्नागिरी210
8पालघर243
9औरंगाबाद154
10कोल्हापूर56
11ठाणे81
12सातारा156
13सिंधुदुर्ग145
14हिंगोली76
15लातूर55
16यवतमाळ142
17धुळे205
18परभणी15
19जालना122
20वर्धा84
21अमरावती78
22वाशिम26
23चंद्रपूर01
24भंडारा67
25बुलढाणा53
26जळगाव
27अकोला48
28धाराशिव110
29रायगड220
30सांगली110
31गडचिरोली140
32नंदुरबार54
33मुंबई उपनगर
34मुंबई शहर17
🔸 टीप: ही यादी तात्पुरती असून, पुढील अधिकृत अधिसूचनेनंतर बदल होऊ शकतात. तरीही, इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू ठेवावी.

शैक्षणिक पात्रता (Talathi Bharti 2025) :

  • तलाठी पदासाठी उमेदवारांनी खालील पात्रता पूर्ण केलेली असावी:
  • भारतात मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक (MS-CIT किंवा शासनमान्य समकक्ष कोर्स आवश्यक)
  • उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

वयोमर्यादा :

  • सर्वसाधारण प्रवर्गासाठी: 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय, इमाव, महिला, अपंग इ. सवलतीच्या प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल.

निवड प्रक्रिया :

तलाठी भरतीसाठी निवड प्रक्रिया ही दोन टप्प्यांमध्ये असते:

  1. लेखी परीक्षा (Online CBT)
  2. मूल्यांकन व कागदपत्र तपासणी

परीक्षा पद्धत व अभ्यासक्रम (Syllabus) :

लेखी परीक्षेसाठी खालीलप्रमाणे विषय असतात:

अ.क्रविषयगुणप्रश्नसंख्या
1मराठी भाषा2525
2इंग्रजी भाषा2525
3सामान्य ज्ञान2525
4बौद्धिक चाचणी (IQ)2525
एकूण100100

सविस्तर अभ्यासक्रम :

  • मराठी भाषा: व्याकरण, समास, वाक्यप्रकार, वाक्यरचना, समानार्थी/विरुद्धार्थी शब्द, वाक्यसुधारणा इत्यादी.
  • इंग्रजी भाषा: Grammar, Vocabulary, Synonyms/Antonyms, Sentence Correction, Comprehension.
  • सामान्य ज्ञान: महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, संविधान, पंचायतराज व्यवस्था, शासन योजना.
  • बौद्धिक चाचणी: गणितीय तर्क, श्रेणी, चित्रचिन्हे, कोडी, वेगवेगळ्या आकृत्यांची तुलना, आकडेमोड, मानसिक क्षमता.

तयारीसाठी काही उपयुक्त टिप्स :

  • तलाठी भरतीसाठी नियमित वाचायची सवय लावा.
  • मागील वर्षांचे पेपर्स आणि टेस्ट सिरीजचा अभ्यास करा.
  • दररोज चालू घडामोडी वाचा आणि नोट्स बनवा.
  • MS-CIT किंवा संगणक प्रशिक्षण पूर्ण असणे अनिवार्य असल्याने लवकरात लवकर ते पूर्ण करा.

शेवटी…

तलाठी भरती 2025 साठी ही माहिती तात्पुरती असून लवकरच अधिकृत जाहिरात येईल. त्यामुळे सर्व उमेदवारांनी अभ्यासाची सुरुवात लवकरात लवकर करावी.

सर्व प्लॅटफॉर्मवर सर्वात आधी अपडेट आम्हीच देतो. अजून कुठेही ह्या पदांची संपूर्ण माहिती आलेली नाही. त्यामुळे आमच्या वेबसाईटला आणि सोशल पेजेसना फॉलो करून ठेवा.

Talathi Bharti 2025
Talathi Bharti 2025

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!