UPSC ESE Exam 2027 : स्पर्धा परीक्षेच्या तयारी करत असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी. देशाच्या पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि अभियांत्रिकी क्षेत्राला योग्य दिशा देणाऱ्या उच्च गुणवत्तेचे तांत्रिक अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी संघ लोक सेवा आयोगामार्फत (UPSC) अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2027 ची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
ही परीक्षा फक्त एक स्पर्धा परीक्षा नसून देशाच्या धोरणात्मक आणि तांत्रिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारी महत्वकांशी तरुणांसाठी एक सुवर्णसंधी म्हणून ओळखण्यात येते. या परीक्षेच्या माध्यमातून सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन अशा चार प्रमुख अभियांत्रिकी शाखांमधील प्रतिभावान आणि होतकरू अभियंत्यांना केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये नेतृत्व करण्याची सर्वोत्तम संधी. या परीक्षा बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.
- महत्त्वाच्या तारखा :
- अधिसूचना जारी होण्याची तारीख: १६ सप्टेंबर २०२६
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: ६ ऑक्टोबर २०२६ (संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत)
- प्रारंभिक परीक्षा (Preliminary Exam) तारीख: ३१ जानेवारी २०२७
- मुख्य परीक्षा (Main Exam) तारीख: १८ जून २०२७
UPSC ESE Exam 2027 : पदाची माहिती
| श्रेणी (Engineering Discipline) | पदांचे नाव | पदांचे नाव |
| श्रेणी – I | सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineering) श्रेणी – II मेकॅनिकल इंजिनिअरिंग (Mechanical | |
| श्रेणी – II | मेकॅनिकल इंजिनिअरिंग (Mechanical Engineering) | |
| श्रेणी – III | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (Electrical Engineering) | |
| श्रेणी – IV | इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग (Electronics & Telecommunication Engineering) | |
| एकूण जागा | ४८० जागा |
UPSC ESE Exam 2027 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
यूपीएससी अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2027 या परीक्षेतील विविध पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे :
- अभियांत्रिकी पदवी (Engineering Degree) या पदासाठी उमेदवाराकडे भारताने संसदेच्या किंवा राज्याच्या कायद्याद्वारे स्थापित केलेल्या विद्यापीठाची किंवा संसदेच्या कायद्याने स्थापित युनिव्हर्सिटी ग्रँड्स कमिशन कायद्याच्या कलम तीन अंतर्गत विद्यापीठ म्हणून घोषित केल्या जाणाऱ्या इतर शैक्षणिक संस्थेची अभियांत्रिकी पदवी असणे अनिवार्य असते.
- संस्थांची मान्यता: केंद्र किंवा राज्य सरकारच्या अधिनिस्थ असलेल्या मान्यताप्राप्त संस्थांची समकक्ष पात्रता (Equivalent Qualification) असलेले उमेदवारही या परीक्षेसाठी पात्र असतात.
- संस्थेची परीक्षा उत्तीर्ण: युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने (UPSC) मान्यता दिलेल्या संस्थांची परीक्षा किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
UPSC ESE Exam 2027 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
यूपीएससी अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2027 या भरतीच्या अधिसूचनेनुसार अर्ज करताना आणि परीक्षा प्रक्रियेदरम्यान लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पारपत्र (Passport) किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांपैकी कोणतेही एक कसने बंधनकारक आहे.
- छायाचित्र आणि स्वाक्षरी (Photograph & Signature)
- अभियांत्रिकी पदवीचे (Engineering Degree) गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्राची कागदपत्रे.
- जात किंवा वर्ग प्रमाणपत्र (Category Certificate)
- दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD Certificate)
UPSC ESE Exam 2027 : वयोमर्यादा – Age limit
| निकष / तपशील | वयोमर्यादा / निकष |
| किमान वय | २१ वर्षे (१ जानेवारी २०२७ रोजी पूर्ण असावे) |
| कमाल वय | ३० वर्षे (जन्म २ जानेवारी १९९७ ते १ जानेवारी २००६ दरम्यान असावा) |
| वयोमर्यादेत सवलत | सरकारी नियमांनुसार एससी (SC), एसटी (ST), ओबीसी (OBC) आणि दिव्यांग (PwBD) उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत लागू राहील. |
UPSC ESE Exam 2027 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
यूपीएससी अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2027 या परीक्षेची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :
- सर्वप्रथम पात्र उमेदवारांनी फक्त यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला अर्ज करणे बंधनकारक आहे.
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराला सर्वप्रथम आयोगाच्या पोर्टलवर एक वेळ नोंदणी करणे आवश्यक असते. या युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर आयुष्यभरात एकदाच तयार करावा लागतो.
- अर्ज करण्याची पद्धत :
- ओटीपी द्वारे लॉगिन करून परीक्षेच्या अर्जाचा फॉर्म निवडा त्यानंतर;
- कर्ज मध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती अचूक व काळाचे पूर्वक भरा.
- अर्जामध्ये तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर करून अपलोड करणे आवश्यक असते तसेच काळा शाईने पांढऱ्या कागदावर स्वाक्षरी करून स्कॅन करून अपलोड करा.
- ओळखपत्र म्हणून आधार कार्ड वापरण्यात येईल.
- अर्ज शुल्क प्रत्येकी उमेदवारास ₹200 असणार आहे अर्ज शुल्क ही ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येईल.
UPSC ESE Exam 2027 : मुलाखत – Interview
- गुणांचे वजन: मुलाखतीसाठी एकूण २०० गुण असतात.
- कशाचे मूल्यमापन केले जाते?
- या मुलाखतीत उमेदवाराचे बौद्धिक कौशल्य, नेतृत्वगुण, प्रामाणिकपणा, सामाजिक जाणिवा, आत्मविश्वास आणि तांत्रिक विषयांची सखोल जाणकार तपासली जाते.
- उमेदवाराचा समतोल दृष्टिकोन, निर्णयक्षमता आणि संकट व्यवस्थापन कौशल्य परखण्यासाठी विविध प्रश्न विचारले जातात.
- स्वरूप: ही मुलाखत सहसा यूपीएससीच्या (नवी दिल्ली) कार्यालयात एका विशेष तज्ज्ञ समितीद्वारे (Board) घेतली जाते. यामध्ये तांत्रिक ज्ञानासोबतच चालू घडामोडी (Current Affairs) आणि उमेदवाराच्या वैयक्तिक पार्श्वभूमीवर आधारित प्रश्न विचारले जातात.
UPSC ESE Exam 2027 – FAQ
- UPSC ESE Exam 2027 मध्ये एकूण किती जागा आहेत?
UPSC ESE Exam 2027 साठी एकूण 480 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. - UPSC ESE परीक्षा म्हणजे काय?
UPSC Engineering Services Examination (ESE) ही अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध पदांसाठी घेतली जाणारी स्पर्धात्मक परीक्षा आहे. - UPSC ESE 2027 साठी कोण अर्ज करू शकतो?
मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा जाहिरातीत नमूद केलेली समकक्ष पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. - ESE मध्ये कोणत्या अभियांत्रिकी शाखांचा समावेश होतो?
मुख्यतः Civil, Mechanical, Electrical आणि Electronics & Telecommunication Engineering या शाखांचा समावेश होतो. - UPSC ESE 2027 ची निवड प्रक्रिया काय आहे?
निवड प्रक्रियेत साधारणपणे Preliminary Examination, Main Examination आणि Personality Test यांचा समावेश असतो. - UPSC ESE परीक्षा कोण आयोजित करते?
UPSC म्हणजेच Union Public Service Commission ही परीक्षा आयोजित करते. - ESE परीक्षेसाठी वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा UPSC च्या अधिकृत जाहिरातीनुसार लागू होते. विविध आरक्षित प्रवर्गांसाठी नियमानुसार सवलत मिळू शकते. - UPSC ESE 2027 चा अर्ज कसा करायचा?
अर्ज प्रक्रिया UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने केली जाते. उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पाहून अर्ज करावा. - ESE परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?
अभ्यासक्रमामध्ये संबंधित अभियांत्रिकी शाखेतील विषयांसोबत General Studies & Engineering Aptitude आणि संबंधित परीक्षेच्या टप्प्यानुसार इतर विषयांचा समावेश असतो. - UPSC ESE 2027 ची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
परीक्षेची तारीख, पात्रता, अभ्यासक्रम, अर्जाची अंतिम तारीख आणि इतर माहिती UPSC च्या अधिकृत वेबसाइटवरील अधिसूचनेत तपासावी.
| Official website | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |

महत्वाची सूचना : या लेखामध्ये UPSC ESE Exam 2027 संदर्भातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धती, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि इतर अटींमध्ये अधिकृत अधिसूचनेनुसार बदल होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी UPSC च्या अधिकृत वेबसाइटवरील जाहिरात व सूचना काळजीपूर्वक तपासाव्यात. अधिकृत अधिसूचनेतील माहिती अंतिम व ग्राह्य राहील.
तुम्ही येथे” जिल्हा रुग्णालय नांदेड भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/nanded-district-hospital-recruitment-2026/