CRPF Recruitment 2026 : केंद्रीय रिझर्व पोलीस बल स्पोर्ट्स कोटा भरती 2026; खेळाडूंसाठी 521 पदांची Best संधी, अर्जाची माहिती येथे

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

CRPF Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी. मित्रांनो तुमच्यासाठी केंद्रीय रिजर्व पोलीस बल (CRPF) मध्ये उत्कृष्ट क्रीडापटूंना डायरेक्ट सेबीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशांमधील होतकरू, गुणवान आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपल्या खेळाची चमक दाखवणाऱ्या तरुणांना पोलीस दलामध्ये मानाचे स्थान मिळून देशाच्या उद्देशाने स्पोर्ट्स कोटा-२०२६ अंतर्गत विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 521 रिक्त जागा भरल्या जाणार असून, अर्ज करण्याची तारीख ही 11 नोव्हेंबर 2026 अशी आहे. क्रीडा क्षेत्रांमधील गुणवत्ता आणि शिस्त यांना डायरेक्ट सेवेच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी ही भरती प्रक्रिया चालू करण्यात आली आहे, या मागचा हा प्रमुख उद्देश आहे. देशामध्ये खेळाडूंना फक्त क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर देशाच्या संरक्षणामध्ये आपले योगदान देण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून, खेळाडूंच्या कलागुणांना मिळणारी प्रस्थान आणि सरकारी सेबीची सुरक्षितता या सर्व बाबींचा संगम असलेली ही भरती तरुण पिढीसाठी एक अभिमानास्पद ठरत आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रांची यादी, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १२ ऑक्टोबर २०२६
    • ​ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
    • ​ऑनलाइन अर्जात दुरुस्ती किंवा बदल करण्याची तारीख: १२ नोव्हेंबर २०२६ ते १४ नोव्हेंबर २०२६

CRPF Recruitment 2026 : पदाची माहिती

पदाचे नावएकूण जागा (Total Vacancies)
हेड कॉन्स्टेबल / जीडी (Head Constable – GD)182
कॉन्स्टेबल / जीडी (Constable – GD)339
एकूण521

CRPF Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

केंद्रीय रिजर्व पोलिस पल्स स्पोर्ट्स कोटा भरती 2026 या भरतीतील पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :

  • हेड कॉन्स्टेबल / जीडी (Head Constable – GD): या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
  • कॉन्स्टेबल / जीडी (Constable – GD): या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त बोर्डाकडून इयत्ता 10 वी परीक्षा किंवा समक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

CRPF Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Dcouments

केंद्रीय रिझर्व पोलीस बल स्पोर्ट्स कोटा भरती 2026 या भरतीचा अर्ज करत असताना आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :

  • हेड कॉन्स्टेबल पदासाठी इयत्ता 12 वीचे उत्तीर्ण असलेले गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • कॉन्स्टेबल पदासाठी 10 वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • क्रीडा पात्रता प्रमाणपत्रे (Sports Certificates)
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक.
  • जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे बंधनकारक आहे.
  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसा (Digital Signature & Thumb Impression).

CRPF Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

तपशील (Detail)पात्रता निकष (Criteria)
वयोमर्यादा१८ ते २३ वर्षे (१ ऑगस्ट २०२६ रोजी)
जन्मतारीखमर्यादा उमेदवाराचा जन्म ०२/०८/२००३ पूर्वी आणि ०१/०८/२००८ नंतरचा नसावा
वयात सवलतशासकीय नियमांनुसार आरक्षित प्रवर्गासाठी लागू

CRPF Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

केंद्रीय रिझर्व पोलीस बल स्पोर्ट्स कोटा भरती 2026 या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारची आहे याची माहिती खालीलप्रमाणे आहे :

  • सर्वप्रथम पात्र व इच्छुक उमेदवारांनी CRPF या भरतीच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देणे आवश्यक आहे.
  • या भरतीचे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने केलेली स्वीकारण्यात येणार आहेत अन्यथा कुठल्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • कर्ज मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक अहर्ता आणि क्रीडा प्रकारचा तपशील ही संपूर्ण माहिती अचूक व काळजीपूर्वक भरा.
  • आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरले जाते अर्ज शुल्क भरणे बंधनकारक आहे, कारण अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज संपूर्ण मानला जात नाही.
  • अर्ज अंतिम सबमिट करण्यापूर्वी कर्ज मधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करा नंतरच अर्ज सबमिट करा.
  • अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढणे विसरू नका.
Official website (अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Online apply (ऑनलाइन अर्ज)येथे क्लिक करा
Notification PDF (जाहिरात पीडीएफ)येथे क्लिक करा

CRPF Recruitment 2026 : निवड प्रक्रिया

केंद्रीय रिझर्व पोलीस बल स्पोर्ट्स कोटा भरती 2026 या भरतीची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :

  • सर्वप्रथम परीक्षा केंद्रावर उमेदवारांची प्राथमिक ओळख बायोमेट्रिक नोंदणी करण्यात येते.
  • उमेदवारांच्या मूळ शैक्षणिक पात्रता, क्रीडा प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते.
  • निर्धारित केलेल्या निकषानुसार उमेदवारांची उंची आणि छातीची मोजणी घेण्यात येईल.
  • संबंधित क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंच्या प्राविण्याचा प्रत्यक्ष खेळाच्या चाचणी द्वारे कस लावण्यात येईल.
  • अंतिम टप्पा निवड प्रक्रियेचा म्हणजेच यशस्वी झालेल्या उमेदवारांची तपशीलावर वैद्यकीय परीक्षा व पुनरावलोकन वैद्यकीय परीक्षा घेण्यात येईल.

केंद्रीय रिझर्व पोलीस बल (CRPF) स्पोर्ट्स कोटा भरती 2026 – FAQ

  1. CRPF स्पोर्ट्स कोटा भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    या भरतीमध्ये एकूण 521 पदे आहेत. त्यापैकी 182 पदे Head Constable (GD) आणि 339 पदे Constable (GD) आहेत.
  2. CRPF स्पोर्ट्स कोटा भरतीमध्ये कोणती पदे आहेत?
    Head Constable (GD) आणि Constable (GD) ही पदे आहेत.
  3. या भरतीसाठी अर्ज कधी सुरू होणार आहे?
    ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2026 रोजी सुरू होणार आहे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
    अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2026 आहे.
  5. CRPF स्पोर्ट्स कोटा भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    सामान्यतः वयोमर्यादा 18 ते 23 वर्षे असून वयाची गणना 1 ऑगस्ट 2026 रोजी केली जाते. प्रवर्गानुसार वयाची सवलत लागू होऊ शकते.
  6. या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?
    निर्धारित क्रीडा कामगिरी/प्रमाणपत्र असलेले पात्र पुरुष व महिला खेळाडू अर्ज करू शकतात. शैक्षणिक व क्रीडा पात्रता अधिकृत जाहिरातीनुसार असणे आवश्यक आहे.
  7. CRPF स्पोर्ट्स कोटा भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
    निवड प्रक्रियेत कागदपत्र पडताळणी, Physical Standard Test (PST), Sports Trial आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे.
  8. या भरतीसाठी लेखी परीक्षा आहे का?
    उपलब्ध भरती माहितीनुसार या स्पोर्ट्स कोटा भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही; क्रीडा कामगिरीवर आधारित गुणवत्ता, PST, Sports Trial आणि वैद्यकीय तपासणी हे टप्पे आहेत.
  9. CRPF स्पोर्ट्स कोटा भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
    UR/OBC/EWS पुरुष उमेदवारांसाठी ₹100 शुल्क आहे. महिला, SC, ST आणि Ex-Servicemen उमेदवारांना शुल्कातून सूट आहे.
  10. CRPF स्पोर्ट्स कोटा भरती 2026 साठी अर्ज कुठे करायचा?
    अर्ज CRPF च्या अधिकृत भरती वेबसाइटवर ऑनलाइन करावा. अधिकृत CRPF वेबसाइटवर भरतीविषयक माहिती उपलब्ध आहे.
CRPF Recruitment 2026 feature image
CRPF Recruitment 2026

महत्त्वाची सूचना / Disclaimer: केंद्रीय रिझर्व पोलीस बल (CRPF) स्पोर्ट्स कोटा भरती 2026 संदर्भातील माहिती उपलब्ध भरती जाहिरात व अधिकृत माहितीनुसार देण्यात आली आहे. पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, क्रीडा पात्रता, अर्ज शुल्क, अर्जाच्या तारखा व निवड प्रक्रियेत अधिकृत विभागाकडून बदल होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी CRPF ची अधिकृत जाहिरात आणि अधिकृत वेबसाइटवरील नवीनतम माहिती काळजीपूर्वक तपासावी. चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी totalnaukri.com जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे सैनिक ट्रेड्समन भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/moef-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!