Dr. Babasaheb Ambedkar Technology University Raigad Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी. महाराष्ट्र शासन अधिनियम 2014 अंतर्गत संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोनेरे हे तंत्रशिक्षण क्षेत्रांमधील एक अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखण्यात येते. या विद्यापीठांतर्गत चालणाऱ्या विविध पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा कोर्सेस तसेच प्रादेशिक आणि प्रशासकीय विभागांची गरज लक्षात घेता शैक्षणिक परिषद 2026 साठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही भरती प्रक्रिया पूर्णपणे 11 महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा नियमित पदे भरेपर्यंत असणार आहे. इच्छुक को पात्र उमेदवारांकडून संबंधित विभागांतर्गत घेतली जाणारी लेखी परीक्षा आणि मुलाखत याद्वारे उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. या निवड साठी उमेदवारांना 6 , 7 आणि 8 ऑक्टोंबर 2026 या तारखेला वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तांत्रिक शिक्षण आणि विद्यापीठाच्या कामकाजामध्ये पारदर्शकता व गुणवत्ता टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन आरक्षण धोरणा, एआयसीटीई तसेच संबंधित नियम पात्रतांच्या अधीन राहून ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पार पडणार आहे. माहितीची अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही खालील संपूर्ण लेख वाचू शकता.
- महत्त्वाच्या तारखा :
- जाहिरात दिनांक: २४ सप्टेंबर २०२६
- मुलाखतींच्या तारखा (लेखी परीक्षेसह):
- ०६ ऑक्टोबर २०२६
- ०७ ऑक्टोबर २०२६
- ०८ ऑक्टोबर २०२६
- जुनी जाहिरात संदर्भ (ज्या उमेदवारांनी यापूर्वी ०७/०७/२०२५ रोजीच्या वृत्तपत्रातील जाहिरातीनुसार अर्ज केला होता): विद्यापीठाने नमूद केल्यानुसार, त्या भरती प्रक्रियेची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.
Dr. Babasaheb Ambedkar Technology University Raigad Recruitment 2026 : पदाची माहिती
| पदाचे नाव | एकूण जागा (पदसंख्या) |
| असिस्टंट प्रोफेसर (विविध विभाग व पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रम) | 136 |
| लेक्चरर (डिप्लोमा कोर्सेस – विविध विभाग) | 29 |
| सिनियर इंजिनिअर (सिव्हिल) | 02 |
| जुनियर इंजिनिअर (सिव्हिल) | 06 |
| जुनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | 01 |
| सिव्हिल सुपरवायझर | 08 |
| इलेक्ट्रिकल सुपरवायझर | 01 |
| गार्डन सुपरवायझर | 04 |
| ड्राफ्ट्समन | 01 |
| ड्राफ्ट्समन ट्रेनी | 01 |
| सॉफ्टवेअर (ICT) इंजिनिअर | 19 |
| स्पोर्ट्स डायरेक्टर | 01 |
| स्पोर्ट्स इन्स्ट्रक्टर / कोच | 02 |
| मेडिकल ऑफिसर | 02 |
| नर्स | 03 |
| वर्कशॉप इन्स्ट्रक्टर (वेल्डर, कार्पेन्टर, शीटमॅटल, टर्नर, फिट्हर) | 15 |
| लायब्ररी असिस्टंट | 05 |
| लायब्ररी ट्रेनी | 04 |
| लायब्ररी अटेंडंट | 05 |
| ड्रायव्हर | 04 |
| पब्लिक रिलेशन ऑफिसर (जनसंपर्क अधिकारी) | 01 |
| अकाउंटंट | 12 |
| हॉस्टेल क्लर्क | 05 |
| हॉस्टेल वार्डन (पुरुष) | 02 |
| प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) | 41 |
| डेटा एंट्री ऑपरेटर | 25 |
| क्लर्क-कम-टाइपिस्ट | 73 |
Dr. Babasaheb Ambedkar Technology University Raigad Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती 2026 या भरतीतील पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे :
- असिस्टेंट प्रोफेसर (पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम):
- या पदासाठी संबंधित शाखेमध्ये प्रथम श्रेणी सह बी.ई./बी.टेक (B.E./B.Tech) आणि एम.टेक/पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. सोबत संबंधित विषयामध्ये पीएचडी किंवा अध्यापन/संशोधन अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येऊ शकते.
- फार्मसी पदांसाठी प्रथम श्रेणी मध्ये बी.फार्म आणि संबंधित विषयात एम.फार्म दोन वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- विज्ञान/मानव्यशास्त्र शाखेसाठी संबंधित विषयामध्ये प्रथम श्रेणी सह एम.एससी./एम.ए./एम.फिल असणे अनिवार्य आहे.
- एमबीए (MBA): या पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी आणि बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन प्रथम श्रेणीचा मास्तर पदवी आणि पदवी नंतर दोन वर्षाचा व्यावसायिक अनुभव असणे आवश्यक आहे.
- एमसीए (MCA): बी.ई./बी.टेक/बी.एस. आणि एम.ई./एम.टेक/एम.एस. किंवा संबंधित शाखेत एमसीए (MCA) प्रथम श्रेणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- लेक्चरर (डिप्लोमा कोर्सेस): या पदासाठी संबंधित शाखेमध्ये प्रथम श्रेणी सह बीई किंवा बी टेक किंवा समतुल्य पदवी असणे आवश्यक आहे.
- लेक्चरर (डिप्लोमा कोर्सेस): संबंधित शाखेत प्रथम श्रेणीसह बी.ई./बी.टेक किंवा समतुल्य पदवी.
- सिनियर इंजिनिअर (सिव्हिल): सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.ई./बी.टेक पदवी आणि १५ वर्षांचा फिल्ड अनुभव, किंवा सिव्हिल डिप्लोमासह किमान २० वर्षांचा अनुभव (ज्यातील १० वर्षे सार्वजनिक विद्यापीठ किंवा तत्सम संस्थेत असावीत) अथवा सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनिअर.
- जुनियर इंजिनिअर (सिव्हिल / इलेक्ट्रिकल): संबंधित इंजिनिअरिंग शाखेत बी.ई./बी.टेक पदवीसह ५ वर्षांचा अनुभव किंवा डिप्लोमासह १० वर्षांचा फिल्ड अनुभव.
- सिव्हिल / इलेक्ट्रिकल सुपरवायझर: संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा संबंधित विषयात NCTVT सह आय.टी.आय. (ITI) आणि २ वर्षांचा अनुभव.
- गार्डन सुपरवायझर: मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc. (हॉर्टिकल्चर) किंवा एग्रीकल्चर डिप्लोमासह ३ वर्षांचा अनुभव.
- ड्राफ्ट्समन / ड्राफ्ट्समन ट्रेनी: आय.टी.आय. (ड्राफ्ट्समन सिव्हिल) किंवा MCVC कोर्स, ACAD ड्राफ्टिंग आणि MS Office चे कौशल्य.
- सॉफ्टवेअर (ICT) इंजिनिअर: कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये B.E./B.Tech/MCA सह २ वर्षांचा संबंधित अनुभव.
- स्पोर्ट्स डायरेक्टर: शारीरिक शिक्षणात (Physical Education) पीएचडी आणि ५ वर्षांचा अनुभव.
- स्पोर्ट्स इन्स्ट्रक्टर / कोच: प्रथम श्रेणीसह शारीरिक शिक्षणात पदव्युत्तर पदवी (M.P.Ed) आणि ५ वर्षांचा अनुभव.
- मेडिकल ऑफिसर: MBBS / BAMS / BHMS पदवी आणि ३ वर्षांचा अनुभव.
- नर्स: ANM / GNM / B.Sc. नर्सिंग कोर्स आणि ३ वर्षांचा अनुभव.
- वर्कशॉप इन्स्ट्रक्टर (वेल्डर, कार्पेन्टर इ.): संबंधित शाखेत NCTVT सह आय.टी.आय. किंवा २ वर्षांच्या अनुभवासह आय.टी.आय..
- लायब्ररी पद (असिस्टेंट/ट्रेनी/अटेंडंट): M.Lib.Sc. किंवा B.Lib.Sc. किंवा ग्रंथालयातील प्रमाणपत्र कोर्ससह ५ वर्षांचा अनुभव किंवा HSC / पदवी.
- ड्रायव्हर: किमान १२ वी उत्तीर्ण, LMV/HMV/ट्रेन्सपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स आणि ५ वर्षांचा अनुभव.
- पब्लिक रिलेशन ऑफिसर: मास कम्युनिकेशन/जर्नालिझम/पब्लिक रिलेशनमध्ये किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी, ३ वर्षांचा अनुभव आणि मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व.
- अकाउंटंट: मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीत M.Com, बुक-कीपिंग व अकाउंटिंगचा २ वर्षांचा अनुभव, तसेच टॅली (Tally) आणि इंग्रजी/मराठी टायपिंगचे ज्ञान.
- हॉस्टेल क्लर्क / क्लर्क-कम-टाइपिस्ट: कोणत्याही शाखेत पदवी, इंग्रजी (४० शब्द प्रति मिनिट) व मराठी (३० शब्द प्रति मिनिट) टायपिंग आणि MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स.
- हॉस्टेल वार्डन (पुरुष): कोणत्याही शाखेत पदवी किंवा संबंधित अनुभवासह M.S.W..
- प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant): इंजिनिअरिंग डिप्लोमा / B.Sc. / संबंधित विषयात NCTVT किंवा MCVC सह आय.टी.आय. आणि ३ वर्षांचा अनुभव.
- डेटा एंट्री ऑपरेटर: कोणत्याही शाखेत पदवी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा, इंग्रजी/मराठी टायपिंग, MSCIT आणि डेटा एंट्री ऑपरेटरचा प्रमाणपत्र कोर्स किंवा ३ वर्षांचा अनुभव.
Dr. Babasaheb Ambedkar Technology University Raigad Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Dcouments
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती 2026 या भरतीच्या मुलाखतीसाठी आणि कागदपत्र पडताळणीच्या वेळी खालील कागदपत्रांची यादी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे :
- दहावी, बारावी आणि पदवी / पदव्युत्तर पदवीची प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका (ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्यानुसार संबंधित पात्रता जसे की B.E./B.Tech, M.Tech, M.Pharm, Ph.D., MBA, MCA, M.Sc., Diploma, ITI इ.).
- अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
- संगणक ज्ञान (MSCIT / Tally / ACAD / Data Entry), टायपिंग परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्रे (इंग्रजी ४० व मराठी ३० शब्द प्रति मिनिट). आवश्यक ठरते.
- लागू असल्यास NET / SET किंवा संबंधित व्यावसायिक कौशल्याची प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक असणे बंधनकारक आहे.
- पासपोर्ट आकाराचा फोटो
तुम्ही येथे अप्रेन्टिस इंजिनीयर भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/apprentice-engineer-recruitment-2026/
Dr. Babasaheb Ambedkar Technology University Raigad Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची ऑफलाईन किंवा ऑनलाइन अर्ज प्रक्रिया नसून डायरेक्ट मुलाखत घेण्यात येणार आहे.
- उमेदवारांनी मुलाखतीच्या आणि लेखी परीक्षेचा तारखेला विद्यापीठांमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
- लेखी परीक्षा ही विद्यापीठाच्या संबंधित विभागात द्वारे मुलाखतीत पूर्वी विशिष्ट पदांसाठी घेण्यात येईल.
- पदानुसार ठरवून दिलेल्या तारखांना उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
- मुलाखतीच्या दिवशी ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरावे लागते.
- अध्यापकीय पदे (Teaching Posts): खुला प्रवर्गासाठी १०००/- रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी ५००/- रुपये.
- शिक्षकेतर पदे (Non-teaching Posts): खुला प्रवर्गासाठी ५००/- रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी २५०/- रुपये.
Dr. Babasaheb Ambedkar Technology University Raigad Recruitment 2026 : वेतन श्रेणी – Salary
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती 2026 या भरतीतील विविध पदांसाठी असणारी वेतन श्रेणी खालील प्रमाणे आहे :
| पदाचा प्रकार / नाव | एकत्रित पगार (Consolidated Salary) प्रतिमहिना |
| असिस्टेंट प्रोफेसर (विविध विभाग) | ४०,०००/- रुपये |
| लेक्चरर (डिप्लोमा कोर्सेस) | ३०,०००/- रुपये |
| सिनियर इंजिनिअर (सिव्हिल) | ४०,०००/- रुपये |
| जुनियर इंजिनिअर (सिव्हिल / इलेक्ट्रिकल) | २८,०००/- रुपये |
| सुपरवायझर (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / गार्डन) | १८,०००/- रुपये |
| ड्राफ्ट्समन / ड्राफ्ट्समन ट्रेनी | १०,०००/- रुपये (फक्त ट्रेनी/इ.) / २८,०००/- (ड्राफ्ट्समन) |
| सॉफ्टवेअर (ICT) इंजिनिअर | ३०,०००/- रुपये |
| स्पोर्ट्स डायरेक्टर | ३०,०००/- रुपये |
| स्पोर्ट्स इन्स्ट्रक्टर / कोच | २२,०००/- रुपये |
| मेडिकल ऑफिसर | ३०,०००/- रुपये |
| नर्स | १५,०००/- रुपये |
| वर्कशॉप इन्स्ट्रक्टर (वेल्डर, कार्पेन्टर इ.) | १५,०००/- रुपये |
| लायब्ररी पदे (असिस्टंट / ट्रेनी / अटेंडंट) | (पदानुसार निश्चित वेतन / अनुभवसापेक्ष) |
| ड्रायव्हर | (अनुभवानुसार निश्चित) |
| पब्लिक रिलेशन ऑफिसर (PRO) | ३०,०००/- रुपये |
| अकाउंटंट | १८,०००/- रुपये |
| क्लार्क / वार्डन / डेटा एंट्री ऑपरेटर इ. | १५,०००/- रुपये |
| Official website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
| Notification PDF (जाहिरात पीडीएफ) | येथे क्लिक करा |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती 2026 – FAQ
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
या भरतीमध्ये एकूण 411 जागा आहेत. - या भरतीमध्ये कोणत्या पदांसाठी संधी आहे?
पदनिहाय रिक्त जागा, पदांची नावे आणि आरक्षणाचा तपशील अधिकृत भरती जाहिरातीत दिलेला असेल. - भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी संबंधित पदाची पात्रता अधिकृत जाहिरातीत तपासावी. - या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा पदानुसार निश्चित केली जाईल. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वयाची सवलत लागू होऊ शकते. - अर्ज कसा करायचा?
अर्ज प्रक्रिया विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन किंवा जाहिरातीत नमूद केलेल्या पद्धतीने करावी. - अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, जन्मतारीख प्रमाणपत्र, फोटो, स्वाक्षरी आणि लागू असल्यास जात/आरक्षण प्रमाणपत्र आवश्यक असू शकते. - निवड प्रक्रिया कशी असेल?
पदाच्या स्वरूपानुसार लेखी परीक्षा, मुलाखत, कौशल्य चाचणी, कागदपत्र पडताळणी किंवा इतर निर्धारित टप्प्यांचा समावेश असू शकतो. - अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क पद व प्रवर्गानुसार वेगवेगळे असू शकते. अचूक शुल्कासाठी अधिकृत जाहिरात तपासावी. - 411 जागांमध्ये सर्व पदांचा समावेश आहे का?
होय, दिलेल्या माहितीनुसार एकूण 411 रिक्त जागा आहेत. पदनिहाय जागांचा तपशील अधिकृत जाहिरातीत तपासावा. - भरतीची अधिकृत माहिती कुठे पाहावी?
अर्जाची तारीख, पात्रता, शुल्क, पदनिहाय जागा आणि निवड प्रक्रिया यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट व भरती जाहिरात पाहावी.

महत्त्वाची सूचना / Disclaimer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड भरती 2026 संदर्भातील वरील माहिती उपलब्ध माहितीनुसार देण्यात आली आहे. पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्जाच्या तारखा व निवड प्रक्रिया यामध्ये विद्यापीठाकडून बदल होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरात आणि विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवरील नवीनतम माहिती काळजीपूर्वक तपासावी. चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी totalnaukri.com जबाबदार राहणार नाही.