Aaple Sarkar Seva Kendra Solapur Bharti 2026 : मित्रांनो तुम्ही जर नोकरीचे शोधात आहात आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाकडील निर्णय आणि शासन शुद्धी पत्रकानुसार, सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय व नागरिक सुविधा सुलभ रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र भरती प्रक्रिया जाहीर करत आहे.
सोलापूर जिल्ह्यामधील शहरी व ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये, नगरपरिषद मध्ये तसेच महानगरपालिकेतील क्षेत्रांमध्ये रिक्त असलेला एकूण 592 जागा आपले सरकार सेवा केंद्राच्या ठिकाणी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे. या भरती प्रक्रियेत द्वारे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करणे आणि सोबतच नागरीकांना पारदर्शकपणे सेवा मिळू शकतील हाच या भरती मागचा मुख्य उद्देश आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत आणि आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे सादर करणे बंधनकारक आहे. या भरती बद्दल अधिक माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही खालील संपूर्ण लेख वाचू शकता.
- महत्त्वाच्या तारखा
- जाहिरात प्रसिद्ध झाल्याचा महिना: ऑगस्ट २०२६
- अर्ज स्वीकारण्याचा कालावधी: ०१ सप्टेंबर २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६
- अर्ज करण्याची वेळ: सकाळी ११:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ: ३० सप्टेंबर २०२६, सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत
Aaple Sarkar Seva Kendra Solapur Bharti 2026 : पदाची माहिती
| अ.क्र. | तालुका | रिक्त जागांची संख्या |
| 1 | उत्तर सोलापूर | 46 |
| 2 | बार्शी | 58 |
| 3 | अक्कलकोट | 63 |
| 4 | दक्षिण सोलापूर | 46 |
| 5 | मोहोळ | 43 |
| 6 | पंढरपूर | 77 |
| 7 | मंगळवेढा | 40 |
| 8 | सांगोला | 50 |
| 9 | माढा | 55 |
| 10 | करमाळा | 62 |
| 11 | माळशिरस | 52 |
| एकूण सर्व तालुके एकूण रिक्त ठिकाणे / पदे | 592 |
Aaple Sarkar Seva Kendra Solapur Bharti 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
आपले सरकार सेवा केंद्र सोलापूर भरती 2026 या भरतीतील विविध पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाण आहे.
- आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत निघालेली भरती या भरतीसाठी उमेदवारांकडे उच्च माध्यमिक शाळांत (१२ वी परीक्षा – H.S.C.) परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
Aaple Sarkar Seva Kendra Solapur Bharti 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
आपले सरकार सेवा केंद्र सोलापूर भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे.
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- सोलापूर महानगरपालिका क्षेत्रांमधील अर्जदारांनी त्यांच्या रहिवासी पत्या प्रमाणे संबंधित मधील दाखला महानगरपालिकेकडे संबंधित झोन विभागाकडून घेणे व अर्जासोबत जोडणे बंधनकारक ठरते.
- आपले सरकार सेवा केंद्राच्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये यापूर्वी कार्यरत असणारे CSC केंद्रधारक, बँकिंग प्रतिनिधी किंवा इतर नागरी सुविधा केंद्रधारक असल्याचे प्रमाणपत्र देखील अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची प्रत असणे आवश्यक आहे.
- मंडळ अधिकाऱ्याचा अहवाल
- व्यवसाय आराखडा
तुम्ही येथे “IIM नागपूर भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/indian-institute-of-management-nagpur/
Aaple Sarkar Seva Kendra Solapur Bharti 2026 : वयोमर्यादा – Age limit
| तपशील | वयोमर्यादेची अट |
| किमान वय | उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. |
Aaple Sarkar Seva Kendra Solapur Bharti 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
आपले सरकार सेवा केंद्र सोलापूर भरती 2026 या भरतीची प्रक्रिया ही खालील प्रमाणे आहे.
- पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी ऑफलाईन अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.
- महत्त्वाची टीप पोस्ट आणि इतर कोणत्याही मार्गाने पाठवलेले अर्ज ग्राहक धरण्यात येणार नाहीत.
- अर्जाचा विहित नमुना, त्यासोबत ची परिशिष्टे, कागदपत्रांचा तपशील, अटी व शर्ती ची माहिती तसेच रिक्त ठिकाणांची यादी या खालील दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे, सोबतच अर्जाचा नमुना देखील खालील रखाण्यात देण्यात आला आहे.
- अर्ज सादर करण्याचा पत्ता हे खालील प्रमाणे आहे : संकलन, महसूल शाखा, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय दूध डेअरीजवळ, सात रस्ता परिसर, सोलापूर
- अर्ज करण्याचा कालावधी हा 1 सप्टेंबर 2026 ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान सकाळी 11:00 वाजेपर्यंत असणार आहे.
- या भरतीची निवड प्रक्रिया ही कागदपत्रांच्या आधारे किंवा अपात्र उमेदवारांच्या तात्पुरती गुणांकन यदि व त्यानंतर मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
| Official website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
| Notification PDF (जाहिरात पीडीएफ) | येथे क्लिक करा |
| Application form (अर्जाचा नमुना) | येथे क्लिक करा |
Aaple Sarkar Seva Kendra Solapur Bharti 2026 : आपले सरकार सेवा केंद्र सोलापूर भरती 2026 – FAQ
- आपले सरकार सेवा केंद्र सोलापूर भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
या भरतीमध्ये एकूण 592 जागा असल्याची माहिती देण्यात आली आहे. - आपले सरकार सेवा केंद्र भरती कोणत्या जिल्ह्यासाठी आहे?
ही भरती सोलापूर जिल्ह्यासाठी आहे. - या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
अर्जाची पद्धत, अर्जाची लिंक आणि अधिकृत सूचना यासाठी संबंधित अधिकृत जाहिरात तपासणे आवश्यक आहे. - शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रता पदानुसार/जाहिरातीनुसार निश्चित केली जाते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीतील पात्रता तपासावी. - अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
अर्जाची अंतिम तारीख अधिकृत जाहिरातीत दिलेली असेल. अर्ज करण्यापूर्वी अंतिम तारीख नक्की तपासा. - निवड प्रक्रिया कशी असेल?
निवड प्रक्रिया संबंधित अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या नियमांनुसार असेल. - अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्काबाबतची माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी. - सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ही भरती आहे का?
ही भरती सोलापूर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांशी संबंधित असल्याने जिल्हानिहाय पात्रता व अटी अधिकृत सूचनेनुसार तपासणे आवश्यक आहे. - भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
अर्जाची तारीख, पात्रता, कागदपत्रे, शुल्क आणि इतर अटींसाठी संबंधित अधिकृत शासकीय संकेतस्थळावरील जाहिरात पहावी. - उमेदवारांनी कोणती काळजी घ्यावी?
अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्ण वाचून पात्रता, कागदपत्रे, अंतिम तारीख आणि अर्जाची पद्धत तपासावी.

महत्त्वाची सूचना/Disclaimer : ही माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. भरतीतील पदसंख्या, पात्रता, अर्जाची तारीख, शुल्क, निवड प्रक्रिया व इतर अटींमध्ये बदल होऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित अधिकृत जाहिरात व अधिकृत संकेतस्थळावरील माहिती काळजीपूर्वक तपासावी. कोणत्याही चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी TotalNaukri.com जबाबदार राहणार नाही.