ITBP Head Constable Recruitment 2026 : ITBP हेड कॉन्स्टेबल भरती 2026; 37 पदांसाठी Best भरती जाहीर, पात्रता व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

ITBP Head Constable Recruitment 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. देशाच्या सीमा सुरक्षेचे आणि अंतर्गत संरक्षण कठीण व महत्त्वपूर्ण कर्तव्य बजावणाऱ्या भारताच्या निमलष्करी दलांपैकी एक असलेल्या इండో-तिबेटन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) येथे तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ITPB अंतर्गत विविध तांत्रिक व शैक्षणिक पदांसाठी हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) आणि हेड कॉन्स्टेबल (एज्युकेशन अँड स्ट्रेस काउन्सिलर) या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. देशाच्या सेवेमध्ये आवड असणाऱ्या, शिस्तप्रिय आणि पात्र तरुण-तरुणींना लढाऊ दलाचा एक महत्त्वाचा भाग बनवण्याची ही एक उत्तम संधी आहे.

या भरती प्रक्रियेत द्वारे देशभरातील होतकरू उमेदवारांना केंद्र सरकारच्या अंतर्गत सुरक्षित आणि सन्मानाची कारकीर्द घडवण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही 28 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली आहे, आणि अंतिम तारीख 27 ऑक्टोंबर 2026 अशी असणार आहे. ये भरती बद्दल अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खालील संपूर्ण लेख वाचावा.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: २८ सप्टेंबर २०२६ (सकाळी ०:०१ वाजता)
    • ​ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)

ITBP Head Constable Recruitment 2026 : पदाची माहिती

पदाचे नावएकूण जागा
हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक)21
हेड कॉन्स्टेबल (एज्युकेशन अँड स्ट्रेस काउन्सिलर)16

ITBP Head Constable Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

  • हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक)
    • या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त बोर्डी किंवा संस्थेमधून 12 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
    • मान्यताप्राप्त संस्था किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मधून मोटर मेकॅनिक ट्रेडमध्ये प्रमाणपत्र आणि नामांकित वर्कशॉप मध्ये तीन वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये तीन वर्षासाठी डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक ठरते.
  • हेड कॉन्स्टेबल (एज्युकेशन अँड स्ट्रेस काउन्सिलर)
    • या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किंवा समतुल्य संस्थेमधून मानसशास्त्र हा विषय घेऊन पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी सहभागाची लवर ऑफ एज्युकेशन (B.Ed.), बॅचलर ऑफ टीचिंग (B.T.) किंवा समतुल्य पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

ITBP Head Constable Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

पदाचे नाववयोमर्यादा जन्म दिनांक मर्यादा
हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक)१८ ते २५ वर्षेउमेदवाराचा जन्म २८ ऑक्टोबर २००१ ते २७ ऑक्टोबर २००८ दरम्यान असावा.
हेड कॉन्स्टेबल (एज्युकेशन अँड स्ट्रेस काउन्सिलर)२० ते २५ वर्षेउमेदवाराचा जन्म २८ ऑक्टोबर २००१ ते २७ ऑक्टोबर २००६ दरम्यान असावा.

तुम्ही येथे “अमरावती कोतवाल भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/amravati-mahasul-sevak-recruitment-2026/

ITBP Head Constable Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

ITBP हेड कॉन्स्टेबल भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :

  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे: दहावी (१२ वी) आणि संबंधित पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता दर्शवणारी गुणपत्रिका (Mark Sheets) व प्रमाणपत्रे (आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवी प्रमाणपत्र).
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र (Voter ID), ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यांपैकी कोणतेही एक मूळ असणे बंधनकारक आहे.
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate) (लागू असल्यास)
  • छायाचित्र व स्वाक्षरी
  • अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
  • (लागू असल्यास)
  • माजी सैनिकांसाठी (Ex-Servicemen) डिस्चार्ज बुक किंवा सेवेचे कागदपत्र आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) उमेदवारांसाठी वैध उत्पन्नाचे व मालमत्तेचे प्रमाणपत्र.

ITBP Head Constable Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

ITBP हेड कॉन्स्टेबल भरती 2026 या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीचा अर्ज हा फक्त ऑनलाईन करणे बंधनकारक आहे अथवा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांनी या भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे अनिवार्य आहे.
  • सर्वप्रथम अधिकृत पोर्टलवर गेल्यानंतर उमेदवारांची स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • नोंदणी केल्यानंतर उमेदवारांकडे लॉर्ड आयडी आणि पासवर्ड येतो याचा वापर करून लॉगिन करून घ्यावे.
  • डॅशबोर्ड वर उपलब्ध असलेल्या संबंधित पदाच्या अर्जावर क्लिक करून विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती अचूक व काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरणे :
    • जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी ₹१००/- अर्ज शुल्क आहे. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने (नेट बँकिंग, युपीआय, क्रेडिट/डेबिट कार्ड इ.) भरावे.
    • ​अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), महिला आणि माजी सैनिकांना अर्ज शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.
  • अंतिम सबमिट करण्यापूर्वी अर्जातील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करा व सबमिट करा.
  • अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून जपून ठेवा.
Online apply (ऑनलाइन अप्लाय)येथे क्लिक करा
Official website (अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Notification PDF 1 (अधिकृत जाहिरात)येथे क्लिक करा
Notification PDF 2 (अधिकृत जाहिरात)येथे क्लिक करा

ITBP Head Constable Recruitment 2026 : ITBP हेड कॉन्स्टेबल भरती 2026 – FAQ

  1. ITBP हेड कॉन्स्टेबल भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    ITBP हेड कॉन्स्टेबल भरती 2026 मध्ये एकूण 37 पदे आहेत.
  2. या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?
    अधिकृत जाहिरातीत दिलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
  3. ITBP हेड कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
    अर्ज प्रक्रिया ITBP च्या अधिकृत भरती पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने केली जाते.
  4. या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?
    निवड प्रक्रिया पदासाठीच्या अधिकृत जाहिरातीनुसार परीक्षा, शारीरिक चाचणी, कौशल्य/दस्तऐवज पडताळणी आणि इतर निर्धारित टप्प्यांनुसार होऊ शकते.
  5. अर्ज करण्यापूर्वी काय तपासावे?
    उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेली शैक्षणिक पात्रता, वय, अर्जाची अंतिम तारीख, शुल्क आणि निवड प्रक्रिया काळजीपूर्वक तपासावी.
  6. ITBP हेड कॉन्स्टेबल भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
    भरतीसंबंधी अधिकृत माहिती ITBP च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होते.
ITBP Head Constable Recruitment 2026 feature image
ITBP Head Constable Recruitment 2026

महत्वाची सूचना/Disclaimer : या भरतीसंबंधी दिलेली माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी आहे. पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची तारीख, शुल्क, निवड प्रक्रिया व इतर नियमांमध्ये अधिकृत सूचनेनुसार बदल होऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ITBP च्या अधिकृत जाहिराती व अधिकृत वेबसाइटवरील माहिती काळजीपूर्वक तपासावी. चुकीची किंवा अपूर्ण माहिती असल्यास totalnaukri.com जबाबदार राहणार नाही.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!