Mumbai Naval Dockyard Apprenticeship Recruitment 2026 : मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. भारतीय नौदलाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई येथील प्रतिष्ठित नवल डॉकयार्ड द्वारे देशातील अन्य राज्यातील तरुण व तरुणींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल (Dockyard Apprentice School) अंतर्गत डिझाईन केलेल्या विविध ट्रेड मधील अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (Apprenticeship Training IT-28) च्या एकूण 283 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना, नॉन आयआयटी तसेच फ्रेशर्स उमेदवारांसाठी तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्याचा एक उत्तम मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रशिक्षण सत्रामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमानुसार उत्तम विद्यावेतन देण्यात येईल. ही भरती प्रक्रिया फक्त कौशल्य आधारित शिक्षणासाठी नसून, तरुणांच्या भविष्यातील शासकीय व नोंदला आर्थिक रोजगारांच्या संधीसाठी तयार करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. या भरती प्रक्रिये मध्ये सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक आहे. यावर्षी बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.
- महत्त्वाच्या तारखा :
- प्रशिक्षण सुरू होण्याचा संभाव्य काळ (Commencement of Training): नोव्हेंबर / डिसेंबर २०२६
- टीप (अर्ज करण्याच्या तारखांबाबत नियम):
- सुरुवात: रोजगार वृत्तपत्रात (Employment News) जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ५ व्या दिवशी सकाळी १०:०० वाजल्यापासून ऑनलाइन नोंदणी सुरू होते.
- अंतिम तारीख: नोंदणी सुरू झाल्यापासून २१ व्या दिवसापर्यंत (रात्री ११:५५ वाजेपर्यंत) ऑनलाइन अर्ज करता येतो.
Mumbai Naval Dockyard Apprenticeship Recruitment 2026 : पदाची माहिती
| क्र. | अप्रेंटिसशिप डिझाईन केलेले ट्रेड (Apprenticeship Designated Trade) | रिक्त जागांची संख्या |
| 1 | अडव्हान्स मेकॅनिक (इन्स्ट्रुमेंट्स) [Advance Mechanic (Instruments) | 02 |
| 2 | कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) | 06 |
| 3 | इलेक्ट्रिशियन (Electrician) | 37 |
| 4 | इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (Electronics Mechanic) | 21 |
| 5 | फिटर (Fitter) | 21 |
| 6 | आय अँड सीटीएसएम (I&CTSM) | 04 |
| 7 | इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (Instrument Mechanic) | 02 |
| 8 | मशिनिस्ट (Machinist) | 10 |
| 9 | मरिन इंजिन फिटर (Marine Engine Fitter) | 17 |
| 10 | मेसन (Mason) | 03 |
| 11 | कूलिंग अँड मेकॅनिक (सेंट्रल एसी प्लांट, इंडस्ट्रियल पॅकेज एअर कंडिशनिंग) | 01 |
| 12 | मेकॅनिक (एम्बेडेड सिस्टम आणि पीआयसी) [Mechanic (Embedded System & PIC)] | 05 |
| 13 | मेकॅनिक डिझेल (Mechanic Diesel) | 23 |
| 14 | मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स (Mechanic Industrial Electronics) | 08 |
| 15 | मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स (Mechanic Mechatronics) | 06 |
| 16 | मेकॅनिक एमटीएम (Mechanic MTM) | 11 |
| 17 | फाउंड्रीमन (Foundryman) | 01 |
| 18 | मेकॅनिक (मोटर व्हेहिकल) [Mechanic (Motor Vehicle)] | 02 |
| 19 | मेकॅनिक रेफ्रिजरेटर अँड एसी (Mechanic Ref & AC) | 05 |
| 20 | ऑपरेटर अडव्हान्स मशिन टूल (Operator Advance Machine Tool) | 02 |
| 21 | पेंटर (जी) [Painter (G)] | 08 |
| 22 | पॅटर्न मेकर (Pattern Maker) | 01 |
| 23 | पाईप फिटर (Pipe Fitter) | 07 |
| 24 | प्रोग्रामिंग अँड सिस्टम्स प्रशासन सहाय्यक (Programming and Systems Administration Assistant) | 02 |
| 25 | शीट मेटल वर्कर (Sheet Metal Worker) | 02 |
| 26 | शिपराईट स्टील (Shipwright Steel) | 07 |
| 27 | शिपराईट वुड (Shipwright Wood) | 24 |
| 28 | टीआयजी/एमआयजी वेल्डर (TIG/MIG Welder) | 11 |
| 29 | वेल्डर (जी आणि ई) [Welder (G&E)] | 19 |
| 30 | वेल्डर (पाईप आणि प्रेशर वेसल) [Welder (Pipe and Pressure Vessels)] | 09 |
| 31 | क्रेन ऑपरेटर ओव्हरहेड (SI) [Crane Operator Overhead (SI)] | 03 |
| 32 | रिगर (Rigger) | 03 |
| एकूण | सर्व ट्रेड मिळून एकूण रिक्त जागा | 283 |
Mumbai Naval Dockyard Apprenticeship Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
नवल डॉकयार्ड मुंबई अप्रेंटिसशिप भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे आहे :
- रिगर (Rigger) ट्रेडसाठी : या ट्रेडसाठी उमेदवाराची फक्त आठवी मध्ये 50% गुण असणे आवश्यक आहे.
- क्रेन ऑपरेटर (Crane Operator) ट्रेडसाठी : या ट्रेडसाठी उमेदवाराची 10 वी उत्तीर्ण आणि सोबतच दहावी मध्ये 50% गुण असणे आवश्यक आहे.
- इतर सर्व डिझायनिंग केलेले ट्रेड मध्ये १० वी इयत्ता संबंधित विषयांमध्ये किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण.
- तसेच संबंधित ट्रेडमध्ये NCVT किंवा SCVT मधून आयटीआय (ITI) परीक्षा सर्व सेमिस्टर मिळून किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तुम्ही येथे “ITBP हेड कॉन्स्टेबल भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/itbp-head-constable-recruitment-2026/
Mumbai Naval Dockyard Apprenticeship Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
नवल डॉकयार्ड मुंबई अप्रेंटिसशिप भरती 2026 या भरतीचा अर्थ करण्यासाठी लागणारे कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :
- पासपोर्ट आकाराचा फोटो : पांढऱ्या पार्श्वभूमीचा दोन्ही कान स्पष्ट दिसणारा रंगीत फोटो असावा.
- पांढऱ्या कागदावर काळ्या शाईन ने केलेली स्वाक्षरी
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोलाचा दाखला असणे बंधनकारक आहे.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- १० वीची गुणपत्रिका/प्रमाणपत्र
- ८ वीची गुणपत्रिका आणि जन्माचा दाखला
- आयटीआय (ITI) गुणपत्रिका
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD Certificate)
- माजी सैनिक / संरक्षण दल प्रमाणपत्र
Mumbai Naval Dockyard Apprenticeship Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit
| ट्रेडचा प्रकार (Trade Type) | किमान वयोमर्यादा (किमान वय) |
| अ-धोकादायक ट्रेड (Non-Hazardous Trades) | किमान १४ वर्षे (अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनुसार) |
| धोकादायक ट्रेड (Hazardous Trades) | किमान १८ वर्षे (अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनुसार) |
Mumbai Naval Dockyard Apprenticeship Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
नवल डॉकयार्ड मुंबई अप्रेंटिसशिप भरती 2026 या भरतीची ऑनलाईन करण्याची प्रक्रिया ही खालील प्रमाणे आहे :
- सर्वप्रथम पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.
- अर्ज करणे अगोदर पोर्टल वरील ऑनलाईन माहिती मार्गदर्शक सूचना लक्षपूर्वक वाचा.
- अर्ज करताना खालील कागदपत्रे पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी, जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाख, आधार कार्ड, दहावीची गुणपत्रिका, रिव्हर ट्रेड साठी अर्ज करत असेल तर जन्म प्रमाणपत्र किंवा आठवीचे गुणपत्रिका आणि ३० ट्रेडपैकी ज्या ट्रेडसाठी आयटीआय (ITI) अनिवार्य आहे, त्यांच्या सर्व सेमिस्टरची एकत्रित (Consolidated) गुणपत्रिका योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती अचूक व काळजीपूर्वक भरा.
- अर्जाची प्रिंट आऊट काढून जपून ठेवा.
| Online apply (ऑनलाइन रजिस्ट्रेशन) | येथे क्लिक करा |
| Official website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
| Notification PDF (जाहिरात पीडीएफ) | येथे क्लिक करा |
Mumbai Naval Dockyard Apprenticeship Recruitment 2026 : नवल डॉकयार्ड मुंबई अप्रेंटिसशिप भरती 2026 – FAQ
- नवल डॉकयार्ड मुंबई अप्रेंटिसशिप भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
या भरतीमध्ये एकूण 283 अप्रेंटिस पदे आहेत. - नवल डॉकयार्ड मुंबई अप्रेंटिसशिप भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?
अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक अटी पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. - या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी अधिकृत सूचनेनुसार ऑनलाइन/निर्धारित पद्धतीने अर्ज करावा. - अप्रेंटिसशिप भरतीमध्ये कोणत्या ट्रेडसाठी संधी आहे?
उपलब्ध ट्रेडची माहिती अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली असते. अर्ज करण्यापूर्वी ट्रेडनुसार पात्रता तपासावी. - निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या नियमांनुसार केली जाते. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. - अर्ज करण्यापूर्वी काय तपासावे?
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ट्रेड, अर्जाची अंतिम तारीख, आवश्यक कागदपत्रे आणि इतर अटी अधिकृत जाहिरातीतून तपासाव्यात.

महत्त्वाची सूचना/Disclaimer : नवल डॉकयार्ड मुंबई अप्रेंटिसशिप भरती 2026 संदर्भातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ट्रेड, अर्जाची तारीख, निवड प्रक्रिया व इतर नियमांमध्ये अधिकृत जाहिरातीनुसार बदल होऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नवल डॉकयार्ड मुंबईच्या अधिकृत जाहिरातीतील माहिती काळजीपूर्वक तपासावी. चुकीची किंवा अपूर्ण माहिती असल्यास totalnaukri.com जबाबदार राहणार नाही.