GMC Chandrapur Recruitment 2026 : कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती 2026; 20 जागांसाठी Best भरती, पात्रता व अर्ज प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

GMC Chandrapur Recruitment 2026 : मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणारे आहात तरी ही संधी तुमच्यासाठीचं. संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखाली कार्य करणाऱ्या चंद्रपूर येथील ‘कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ मध्ये वैद्यकीय अध्यापन आणि दर्जेदार रुग्णसेवा अधिक बळकट करण्यासाठी विविध चिकित्सालयीन (Clinical) आणि अचिकित्सालयीन (Non-Clinical) विषयांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महाविद्यालयाच्या आस्थापनेवर प्राध्यापक (Professor), सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) आणि सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) या पदांना भरून काढण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. वरील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रियेअंतर्गत किंवा स्थानिक निवड समिती अंतर्गत 364 दिवसांच्या तात्पुरत्या करार तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय मार्गदर्शन मिळवून देणे आणि रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना वेळेवर उत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा या भरतीचा महत्त्वाचा उद्देश आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (NMC) नियमांनुसार आणि शासन निर्णयांच्या अधीन राहून पात्रताधारक सेवानिवृत्त प्राध्यापकांसोबतच खाजगी व इतर क्षेत्रामधील पात्र व इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागण्यात आले आहेत. या भरतीची निवड प्रक्रिया ही पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारे होणार असल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील शैक्षणिक व वैद्यकीय सेवा अधिक प्रभावी होण्यास मदत होऊ शकते. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • १. प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदांची भरती (करार पद्धत)
      • ​जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख: ०५/१०/२०२६
      • ​अर्ज स्वीकारण्याचा कालावधी: ०५/१०/२०२६ ते १९/१०/२०२६ (सकाळी ११:०० ते सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत, शासकीय सुट्ट्या वगळून)
      • ​प्रत्यक्ष मुलाखतीची तारीख: १२/१०/२०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता (अधिष्ठाता यांचे दालन)
    • ​२. सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती (तात्पुरती कंत्राटी पदे – डि.एस.बी.)
      • ​अर्ज उपलब्ध व स्वीकारण्याचा कालावधी: ०५/१०/२०२६ ते १९/१०/२०२६ (वेळ: सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत)
      • ​प्रत्यक्ष मुलाखतीची तारीख: २३/१०/२०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता (अधिष्ठाता यांचे दालन)

GMC Chandrapur Recruitment 2026 : पदाची माहिती

अ.क्र.पदाचे नावएकूण रिक्त पदे
1.प्राध्यापक (Professor)08
2.सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)06
3.सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor – गट-ब)06
एकूण—20

GMC Chandrapur Recruitment 2026 : पात्रता व अटी

कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती 2026 या भरतीसाठी लागणाऱ्या पात्रता आणि अटी खालीलप्रमाणे आहेत :

  • नागरिकत्व: उमेदवार हा भारताचा नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • ​वयोमर्यादा:
  • ​प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदांसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्षांपेक्षा जास्त नसावी (सेवानिवृत्त किंवा खाजगी क्षेत्रातील योग्य अर्हताधारक उमेदवार पात्र).
  • ​सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सेवाप्रवेश नियमानुसार खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे राहील. तसेच वरिष्ठ निवासी पदाचा किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
  • ​शैक्षणिक अर्हता व अनुभव: नॅशनल मेडिकल कमिशनच्या (NMC) नियमांनुसार संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB इ.) आणि नियमानुसार अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

तुम्ही येथे “IOCL अप्रेंटीशीप भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/indian-oil-corporation-limited-apprentice/

GMC Chandrapur Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती 2026 या भरती चा अर्जासोबत जोडवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रेखालील प्रमाणे आहेत :

  • प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदासाठी आवश्यक कागदपत्रे
    • अर्जामध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता, अनुभव आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रति अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.
    • मुलाखतीला जात असताना सर्व मूळ प्रमाणपत्रांच सह साक्षांकित प्रती घेऊन जाव्या.
  • सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक कागदपत्रे (छायांकित व साक्षांकित प्रतींचा संच):
    • प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष एमबीबीएस (MBBS) तसेच एमडी/एमएस (MD/MS) किंवा समतुल्य सर्व परीक्षांच्या गुणपत्रिका आणि प्रयत्न प्रमाणपत्रे.
    • सर्व पदवी, पदविका (Diploma) आणि पदव्युत्तर पदवी (PG) परीक्षांची डिग्री प्रमाणपत्रे व अंतिम वर्षाची गुणपत्रिका.
    • राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) तसेच भारतीय वैद्यकीय परिषदेचे (MCI) नूतनीकरण केलेले नोंदणी प्रमाणपत्र.
    • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
    • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा/महाविद्यालयात सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
    • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड कोणतेही एक वैद्य ओळख पत्र असणे बंधन कारक आहे.
    • MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.
    • उमेदवार इतर संस्थेत कार्यरत असल्यास संस्था प्रमुखांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) जोडणे आवश्यक आहे.

GMC Chandrapur Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा

कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :

  • ​अर्जाचे शुल्क: २००/- रुपये (रोख भरून पावती घेणे आवश्यक).
  • ​अर्ज सादर करण्याचा कालावधी:
  • ​प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक: दिनांक ०५/१०/२०२६ ते १९/१०/२०२६ (सकाळी ११:०० ते सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत, शासकीय सुट्ट्या वगळून).
  • ​सहाय्यक प्राध्यापक: दिनांक ०५/१०/२०२६ ते १९/१०/२०२६ (सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत).
  • ​अर्ज करण्याचा पत्ता: अधिष्ठाता कार्यालय, कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे प्रत्यक्ष किंवा पंजीकृत डाकेने (बाय पोस्ट) पाठवावा.
Official website (अधिकृत संकेतस्थळ)येथे क्लिक करा
Notification PDF (अधिकृत जाहिरात)येथे क्लिक करा

GMC Chandrapur Recruitment 2026 : कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती 2026 – FAQ

  1. कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    या भरतीमध्ये एकूण 20 रिक्त पदे असल्याची माहिती दिली आहे.
  2. ही भरती कोणत्या ठिकाणी आहे?
    ही भरती चंद्रपूर, महाराष्ट्र येथील कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित आहे.
  3. या भरतीसाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?
    पदाच्या स्वरूपानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेली पात्रता तपासावी.
  4. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    वयोमर्यादा संबंधित पदाच्या नियमांनुसार लागू असेल. आरक्षित प्रवर्गांना शासन नियमानुसार सवलत मिळू शकते.
  5. कर्मवीर मा. सा. कन्नमवार महाविद्यालय भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
    पदाच्या स्वरूपानुसार निवड प्रक्रिया निश्चित केली जाते. अधिकृत जाहिरातीत दिलेली निवड प्रक्रिया अंतिम मानावी.
  6. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
    अर्जाची पद्धत आणि अर्ज सादर करण्याची प्रक्रिया अधिकृत भरती जाहिरातीनुसार असेल.
  7. भरती कोणत्या विभागाच्या अधिपत्याखाली आहे?
    महाविद्यालय हे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग/संचालनालयाच्या अधिपत्याखाली आहे.
  8. उमेदवारांनी कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत?
    शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), अनुभव प्रमाणपत्र आणि जाहिरातीत नमूद केलेली इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
  9. भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
    अधिकृत जाहिरात आणि सूचना कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासता येतील.
  10. अर्ज करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?
    उमेदवारांनी पदनिहाय पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख, आवश्यक कागदपत्रे आणि निवड प्रक्रिया अधिकृत जाहिरातीतून तपासूनच अर्ज करावा.
GMC Chandrapur Recruitment 2026 feautre image
GMC Chandrapur Recruitment 2026

महत्वाची सूचना / Disclaimer : ही माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती 2026 संदर्भातील पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया व इतर अटींमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरातीत दिलेली माहितीच अंतिम व ग्राह्य राहील.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!