जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा यांच्या वतीने विधी स्वयंसेवक योजनेअंतर्गत नेमणुकीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या सूचनेनुसार वर्धा जिल्ह्यात 100 विधी स्वयंसेवकांची नेमणूक करण्याचे नमूद आहे. अर्जदार किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ही नियमित सरकारी नोकरी नाही, असे जाहिरातीत स्पष्ट नमूद केले आहे. नेमणूक झालेल्या स्वयंसेवकांना काम नेमून दिले जाईल त्या वेळी नियमानुसार मानधन मिळेल. यासाठी कोणताही पगार, मोबदला किंवा मजुरी याव्यतिरिक्त मिळणार नसल्याचेही सूचनेत नमूद आहे.
भरतीचा थोडक्यात तपशील
- संस्थेचे नाव: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा
- योजना: विधी स्वयंसेवक / अधिकार मित्र
- संभाव्य संख्या: 100
- कार्यक्षेत्र: वर्धा जिल्हा
- शैक्षणिक पात्रता: किमान १०वी उत्तीर्ण
- अर्ज पद्धत: ऑफलाइन अर्ज आणि QR कोडद्वारे माहिती भरणे
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: ६ नोव्हेंबर २०२६
- अंतिम वेळ: सायंकाळी ५ वाजेपर्यंत

कोण अर्ज करू शकतात?
जाहिरातीनुसार अर्जदार किमान १०वी परीक्षा उत्तीर्ण असावा. याशिवाय खालील व्यक्ती अर्ज करू शकतात:
1. शिक्षक — निवृत्त शिक्षकांसह
2. एम.एस.डब्ल्यू.चे विद्यार्थी आणि शिक्षक
3. अंगणवाडी सेविका / कार्यकर्त्या
4. विद्यार्थी किंवा कायद्याचे विद्यार्थी — वकील म्हणून नोंदणी होईपर्यंत
5. बिगर-राजकीय सेवाकेंद्रे, बिगर-शासकीय स्वयंसेवी संस्था आणि क्लबचे सदस्य
6. परिसरातील महिला गट, मैत्री संघ आणि दुर्लक्षित किंवा दुर्बल गटांसह इतर स्वयंसेवी गटांचे सदस्य
7. चांगली वागणूक असलेले आणि कारागृहात दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेले सुशिक्षित कैदी
8. इतर कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती
अर्ज कसा करायचा?
इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज आणि स्वयंघोषणापत्र भरावे. अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे जोडावीत.
भरलेला अर्ज ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा यांच्या कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्जासोबत दिलेला QR कोड स्कॅन करून त्यामध्ये मागितलेली माहितीही भरावी. अंतिम तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
महत्त्वाच्या लिंक्स
| जाहिरात पीडीएफ पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज कुठे सादर करायचा?
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा
विधी सेवा सदन, जिल्हा व सत्र न्यायालय,
सिव्हिल लाईन्स, सेवाग्राम रोड, वर्धा.
मानधन किती मिळेल?
जाहिरातीनुसार विधी स्वयंसेवकांना “नालसा” विधी स्वयंसेवक योजनेनुसार ज्या-ज्या वेळी काम नेमून दिले जाईल, त्या त्या वेळी मानधन देण्यात येईल. मात्र, जाहिरातीत मानधनाची निश्चित रक्कम नमूद केलेली नाही. याशिवाय पगार, मोबदला किंवा मजुरी मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
महत्त्वाची सूचना
ही नेमणूक नियमित सरकारी नोकरी नसून विधी स्वयंसेवक योजनेअंतर्गत आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीत दिलेल्या अटी, अर्जाचा नमुना आणि QR कोडवरील सूचना काळजीपूर्वक तपासाव्यात.
सध्या चालू असलेले ONGC भरती २०२६ डायरेक्ट माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👉 https://totalnaukri.com/ongc-bharti-2026/