License Porter (Helpler) Bharti 2026: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने आठ रेल्वे स्टेशनवर लायसन्स पोर्टर (सहाय्यक) म्हणजेच कुली म्हणून काम करण्यासाठी अर्ज मागवले आहेत. इतवारी, डोंगरगड, आमगाव, राजनांदगाव, बालाघाट, छिंदवाडा, सिवनी आणि नैनपूर या स्टेशनवर एकूण २४ जागा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०२६ आहे. Total Naukri वर या भरतीची सगळी माहिती सोप्या भाषेत वाचा.

License Porter (Helpler) Bharti 2026: भरतीची थोडक्यात माहिती
| तपशील | माहिती |
| विभाग | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळ |
| पदाचे नाव | लायसन्स पोर्टर (सहाय्यक) / कुली |
| एकूण जागा | 24 |
| अधिसूचना दिनांक | १६ नोव्हेंबर २०२६ |
| अर्जाची पद्धत | ऑफलाईन (रजिस्टर्ड पोस्टाने किंवा प्रत्यक्ष) |
| शेवटची तारीख | १८ डिसेंबर २०२६, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत |
| निवड पद्धत | शारीरिक कार्यक्षमता चाचणी (धावणे आणि वजन उचलणे) |
License Porter (Helpler) Bharti 2026: स्टेशननुसार जागांची माहिती
| क्र. | स्टेशन | जिल्हा | UR | OBC | EWS | SC | ST | एकूण |
| 1 | नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी | नागपूर | 2 | 1 | 1 | 1 | 0 | 5 |
| 2 | आमगाव | गोंदिया | 1 | 1 | 0 | 1 | 0 | 3 |
| 3 | डोंगरगड | राजनांदगाव | 1 | 1 | 0 | 0 | 0 | 2 |
| 4 | राजनांदगाव | राजनांदगाव | 1 | 0 | 0 | 1 | 0 | 2 |
| 5 | बालाघाट | बालाघाट | 2 | 1 | 0 | 1 | 0 | 4 |
| 6 | छिंदवाडा | छिंदवाडा | 1 | 0 | 0 | 0 | 0 | 1 |
| 7 | सिवनी | सिवनी | 1 | 0 | 0 | 0 | 1 | 2 |
| 8 | नैनपूर | मंडला | 2 | 1 | 1 | 0 | 1 | 5 |
| एकूण | 11 | 5 | 2 | 4 | 2 | 24 |
जिल्ह्याचा रकाना माझ्याकडून समजण्यासाठी दिला आहे, जाहिरातीत तो नाही. नेमका जिल्हा स्टेशनवर किंवा रेल्वे कार्यालयात खात्री करून घ्या.
License Porter (Helpler) Bharti 2026: पात्रता आणि अटी
- वय: १८ डिसेंबर २०२६ रोजी किमान १८ वर्षे पूर्ण असावीत.
- लिंग: पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.
- रहिवासी: स्टेशन ज्या जिल्ह्यात आहे, त्या जिल्ह्याचेच कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- शारीरिक क्षमता: लायसन्स धारकाला वजन उचलावे लागते, म्हणून शारीरिक तंदुरुस्ती तपासली जाईल.
- गर्भवती महिला: शारीरिक चाचणीच्या वेळी गर्भवती असल्यास त्यांना तात्पुरते अपंग मानले जाईल. वजन उचलण्याच्या क्षमतेचे सरकारी डॉक्टरांचे प्रमाणपत्र नंतर सादर केल्यास त्या पात्र मानल्या जातील.
- शैक्षणिक पात्रता: जाहिरातीत किमान शिक्षणाची अट स्पष्ट दिसत नाही, पण शैक्षणिक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना घेताना स्टेशनवर याची खात्री करा.
License Porter (Helpler) Bharti 2026: शारीरिक कार्यक्षमता चाचणी
चाचणी दोन टप्प्यांत होईल.
- पहिला टप्पा: धावण्याची परीक्षा
| उमेदवार | अंतर | वेळ |
| पुरुष | 1500 मीटर | 7 min |
| महिला | 400 मीटर | 3 min |
- दुसरा टप्पा: वजन उचलण्याची परीक्षा
पहिल्या टप्प्यात पास झालेल्यांनाच यात बसता येईल. उमेदवाराला ४० किलो वजन घेऊन २०० मीटर अंतर ठरलेल्या नियमांनुसार पार करावे लागेल.
License Porter (Helpler) Bharti 2026 : अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडायची?
सगळ्या कागदपत्रांच्या साक्षांकित (Attested) प्रती जोडाव्या लागतील:
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- वैद्यकीय प्रमाणपत्र (नोंदणीकृत MBBS डॉक्टरांनी दिलेले)
- पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र (राहत्या भागातील पोलीस ठाण्याकडून, कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नसल्याबद्दल)
- कायम रहिवासी प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र (हॉटेल, विमानतळ किंवा बस स्थानकावर काम केले असल्यास)
- स्काउट्स आणि गाईड्समध्ये सेवा केल्याचा पुरावा, किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांचे आश्रित, माजी सैनिक किंवा लायसन्स धारक पोर्टरचे आश्रित असल्याचा पुरावा
राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथे बारा पदांची भरती! : https://totalnaukri.com/nfsc-nagpur-recruitment-2026/
फोटोबद्दल महत्त्वाचे:* अर्जावरील फोटो राजपत्रित अधिकारी, सरकारी शाळेचे मुख्याध्यापक, सरपंच, आमदार, खासदार किंवा जवळच्या रेल्वे स्टेशनचे स्टेशन अधीक्षक यांच्यापैकी कोणाकडून साक्षांकित करून घ्या. सही अर्धी फोटोवर आणि अर्धी अर्जावर असावी आणि शिक्काही तसाच लावलेला असावा.
अर्ज कसा आणि कुठे पाठवायचा?
- इच्छुक उमेदवारांनी अर्जाचा नमुना ज्या स्टेशनसाठी अर्ज करायचा आहे तिथून मिळवायचा आहे.
- अर्ज पूर्ण भरा, फोटो साक्षांकित करा आणि सर्व कागदपत्रे जोडा.
- अर्ज सीलबंद लिफाफ्यात ठेवा. लिफाफ्यावर ठळक अक्षरात लिहा: “___ स्टेशन वर लायसन्स पोर्टर (सहाय्यक) ची भरती साठी अर्ज पत्र”.
- लिफाफा रजिस्टर्ड पोस्टाने किंवा प्रत्यक्ष वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक, नागपूर मंडळ, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर यांच्या कार्यालयात पाठवा.
- प्रत्यक्ष द्यायचा असल्यास कोणत्याही कामकाजाच्या दिवशी १८ डिसेंबर २०२६ च्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालयात ठेवलेल्या पेटीत टाका.
टपाल विलंबाची जबाबदारी रेल्वेची नाही. अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज सुरुवातीलाच नाकारले जातील. कार्यालयात अर्ज पोहोचल्यानंतर कोणतीही कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.
महत्त्वाच्या लिंक्स
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Official website | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी काही सूचना
- शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. रजिस्टर्ड पोस्टाला वेळ लागू शकतो, म्हणून अर्ज लवकर पाठवा.
- पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र मिळायला वेळ लागतो. आजपासूनच ते काढायला सुरुवात करा.
- एका वेळी एकाच स्टेशनसाठी अर्ज करणे सोयीचे ठरेल, कारण तुम्ही फक्त तुमच्या जिल्ह्यातील स्टेशनसाठीच पात्र आहात.
- धावण्याचा आणि ४० किलो वजन उचलण्याचा सराव आधीपासून सुरू करा.
- नोकरीच्या नावाखाली कोणी पैसे मागत असेल तर देऊ नका. अर्जासाठी कोणत्याही शुल्काचा उल्लेख जाहिरातीत नाही.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
लायसन्स पोर्टर म्हणजे काय?
रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचे सामान उचलण्याचे अधिकृत लायसन्स असलेला कुली.
ही भरती कायमस्वरूपी नोकरीची आहे का?
नाही. जाहिरातीनुसार लायसन्स मिळाल्यावर रेल्वेत नोकरीचा किंवा कायम नियुक्तीचा हक्क मिळत नाही.
महिला अर्ज करू शकतात का?
हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.
दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवार अर्ज करू शकतात का?
नाही. स्टेशन ज्या जिल्ह्यात आहे, त्या जिल्ह्याचे कायमचे रहिवासीच पात्र आहेत.
अर्जाचा नमुना कुठे मिळेल?
ज्या स्टेशनसाठी अर्ज करायचा आहे, तिथून.
अधिक माहितीसाठी कुठे संपर्क करायचा?
वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक, नागपूर मंडळ यांच्या कार्यालयात.
अशाच रेल्वे, सरकारी आणि खासगी नोकरीच्या ताज्या अपडेट्ससाठी Total Naukri ला रोज भेट द्या.