अंगणवाडी मदतनीस भरती 2026(Anganwadi Helper Recruitment 2026) महिलांसाठी नोकरीचे एक उत्तम संधी! ही भरती अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. अहिल्या नगर महापालिका क्षेत्रामध्ये अंगणवाडी मतदनीस भरती प्रक्रिया संबंधित आहे. ही भरती प्रक्रिया एकात्मिक बालविकास सेवा या योजनेअंतर्गत सन 2024 27 या कालावधीसाठी राबविण्यात येत आहे.
नागरी आणि ग्रामीण भागामध्ये बालविकास आणि आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. जर तुम्हाला या भरतीचा अर्ज करायचा असेल तर लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, वेतन आणि निवड प्रक्रिया याची सर्व माहिती खालील लेखामध्ये पाहू शकता:
शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
अंगणवाडी मदतनीस भरती 2026(Anganwadi Helper Recruitment 2026) या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.
- अर्जदार महिला केवळ 12 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- अर्जासोबत बारावीच्या गुणपत्रिका जोडणे अनिवार्य असते.
- जर अर्जदार महिलेचे शिक्षण 12 वी पेक्षा जास्त झाले असेल तर सर्व उत्तीर्ण परीक्षेचे मूळ कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिलांना संगणक ज्ञान किंवा MS-CIT प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
- उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे बंधनकारक आहे. जाहिराती प्रमाणे उमेदवाराला मराठी भाषा सोबतच हिंदी भाषेचेही ज्ञान असणे अनिवार्य असते.
आवश्यक कागदपत्रे – Required Documents
अंगणवाडी मदतनीस भरती 2026(Anganwadi Helper Recruitment 2026) या भरतीचा अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्राची यादी महिलेकडे असणे अनिवार्य आहे.
- १२ वी चे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
- जर अर्जदार महिन्याची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असेल तर त्याचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र सर्व वर्षाचे.
- MS-CIT किंवा तत्सम शासनमान्य संगणक प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी 10 वीचे बोर्ड सर्टिफिकेट किंवा शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला किंवा असेल तर जन्म दाखला.
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- अनुभव असेल तर अनुभव असलेले प्रमाणपत्र
- महिला विधवा असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आणि पुनर्विवाह न केल्याचा प्रतिज्ञापत्र.
- महिला किंवा बालविकास विभागाच्या उप आयुक्तांचे चे प्रमाणपत्र जर महिला अनाथ असेल तर.
वयोमर्यादा – Age limit
अंगणवाडी मदतनीस भरती 2026(Anganwadi Helper Recruitment 2026) :-
| प्रवर्ग | वयोमर्यादा |
| सर्वसाधारण महिला उमेदवार | १८ ते ३५ वर्षे |
| विधवा महिला उमेदवार | १८ ते ४० वर्षे |
कामे :
- अंगणवाडी मधील मुलांची काळजी घेणे आणि त्यांच्या दैनंदिन उपक्रमांत त्यांची मदत करून देणे.
- अंगणवाडी सेविकांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी मधील व्यवस्थापनात मदत करणे.
- अंगणवाडी परिसरामधील स्वच्छता राखणे आणि केंद्रातील शैक्षणिक साहित्यावर लक्ष ठेवणे.
- अंगणवाडी सेविकेला आरोग्य आणि पोषण विषयक सर्वेक्षणात मदत करणे.
अर्ज प्रक्रिया – How to Apply
अंगणवाडी मदतनीस भरती 2026(Anganwadi Helper Recruitment 2026) या भरतीची अर्ज प्रक्रिया कशी करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन खालील प्रमाणे देण्यात आले आहे.
- सर्वप्रथम जाहिरात मध्ये दिलेल्या विविध नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे हा अर्ज व हस्ताक्षरात भरलेला असणे बंधनकारक आहे. अधिकृत जाहिरात : Https://ahilyanagar.maharashtra.gov.in
- अर्जामधील उमेदवाराचा अलीकडचा पासपोर्ट साईज फोटो रंगीत असलेला चिटकवणे अनिवार्य आहे.
- वरील नमूद केलेले सर्व कागदपत्र शैक्षणिक पात्रता, रहिवासी प्रमाणपत्र, वयाचा दाखला, जात प्रमाणपत्र आणि इतर संबंधित प्रमाणपत्राची यादी अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
- उमेदवाराचे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, स्वयंघोषणा पत्र आणि विधवा किंवा अन्नात असल्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.
- अर्जामध्ये ज्या महानगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रासाठी अर्ज करत आहात त्या केंद्राचा स्पष्ट उल्लेख केलेला असावा.
- उमेदवारांनी एका वेळी एकाच स्पर्धासाठी अर्ज करणे अनिवार्य आहे.
- अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर खालील पत्त्यावर पाठविण्यात यावा :
पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी,
नागरी अहिल्यानगर शहर, वेदांत कॉलनी, पहिला मजला,
डॉ. साताळकर हॉस्पिटल शेजारी, बागरोजा हडको,
दिल्ली गेट, अहिल्यानगर – ४१४००१

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखातील माहिती विविध अधिकृत स्त्रोतांवर आधारित असून ती केवळ वाचकांच्या सर्वसाधारण माहितीसाठी देण्यात आली आहे. भरतीची पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत व महत्त्वाच्या तारखा यामध्ये संबंधित विभागाकडून वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित महिला व बाल विकास विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेली अधिकृत जाहिरात व सूचना काळजीपूर्वक वाचून त्यानुसारच पुढील कार्यवाही करावी. या लेखातील कोणत्याही त्रुटी, बदल किंवा अद्यतनांमुळे उद्भवणाऱ्या परिणामांसाठी लेखक अथवा संकेतस्थळ जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे सुरक्षा रक्षक भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/security-guard-recruitment-2026/