कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2026 (APMC Recruitment 2026) Agricultural Produce Market Committee (APMC) :- शेतकरी आणि बाजारपेठ यांच्यातील संबंध म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समिती. ही संस्था पूर्णपणे शेतीशी जोडलेली आहे कारण शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे आणि व्यापाराची योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी या योजनेची महत्त्वाची भूमिका आहे. जर तुम्हाला सरकरी नोकरी हवी असेल तर हे पद उत्तम ठरेल कारण बाजार समितीमध्ये काम करणे हे अभिमानास्पद आहे. या भरतीमध्ये लिपिक, संगणक ऑपरेटर, चालक आणि तांत्रिक या सर्व पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येते.
APMC Recruitment 2026 :- कृषी उत्पन्न बाजार समिती भरतीची तयारी करायची आहे का? असेल तर, ही माहिती तुमच्यासाठीच आहे. रिक्त होणारी पदे, परीक्षेचा अभ्यासक्रम, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया आणि अर्ज प्रक्रिया याची सर्व माहिती खालील लेखांमध्ये सविस्तर दिलेली आहे.
APMC मध्ये कोणकोणती पदे भरली जातात?
कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2026 (APMC Recruitment 2026) या भरतीमध्ये खालील पदे भरली जातात:
प्रशासकीय मधील पदे
- बाजार समितीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणजेच सचिव (Secretary)
- समितीचा हिशोब ठेवणारे आणि आर्थिक व्यवहाराचे व्यवस्थापन करणारे म्हणजेच लेखापाल (Accountant)
- कार्यालयीन दस्तऐवजीकरण आणि दैनंदिन कामकाज सांभाळणारे कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)
- वरिष्ठ स्तरावरील प्रशासकीय काम पाहणारे वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) असतात.
तांत्रिक आणि फील्ड मधील पदे
- बाजार निरीक्षक / पर्यवेक्षक (Market Inspector/Supervisor), संगणक ऑपरेटर (Computer Operator),चालक (Driver) आणि वायरमन व प्लंबर
- चतुर्थ श्रेणी पदे : शिपाई / वॉचमन, नाईक (Head Peon), सफाई कर्मचारी व माळी
टिप : वरील पदे बाजार समितीच्या ब वर्ग क वर्ग किंवा ड वर्ग अशा वर्गीकरण नुसार असतात. आणि ग्रेटर किंवा तौलारी अशी पदे मोठ्या बाजार समितीमध्ये भरली जातात.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2026 (APMC Recruitment 2026) या पदाचा अर्ज भरण्यासाठी खालील शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.
लिपिकवर्गीय पदे (Clerical Posts):
- उमेदवार हा १० वी किंवा १२ वी पास असावा.
- उमेदवाराकडे MS-CIT प्रमाणपत्र किंवा संगणक हाताळण्याचे प्रशिक्षण घेतलेले असावे.
- काही ठिकाणी लिपिक पदासाठी मराठी आणि इंग्रजी टायपिंग चे प्रमाणपत्र असणे आवश्यक असते.
तांत्रिक पदासाठी (Technical Posts) पात्रता
- उमेदवार हा १२ वी उत्तीर्ण असावा किंवा पदवीधर आणि सोबतच डी. सी. ए. किंवा तत्सम संगणक कोर्स केलेला असावा.
- संबंधित आयटीआय ट्रेडमधील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- उमेदवार हा १० वी उत्तीर्ण असावा आणि वाहन चालवण्याचे वैद्य परवा नाही सोबत असणे अनिवार्य आहे.
चतुर्थ श्रेणी पदे (Class IV Posts)
- उमेदवार हा ७ वी ते १० वी उत्तीर्ण असावा काही विभागांमध्ये १० वी उत्तीर्ण असणे अट ठेवण्यात येते.
प्रशासकीय पदे (Administrative Posts) :\
- उमेदवाराने वाणिज्य शाखेतील पदवी आणि लेखापाल कामाचा अनुभव घेतलेला असावा.
- कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण असणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा (Age limit)
| प्रवर्ग | किमान वयोमर्यादा |
| खुला प्रवर्ग (General) | 18 वर्षे ते 38 वर्षे |
| आरक्षित प्रवर्ग (SC/ST/OBC/NT) | 18 वर्षे ते 43 वर्षे |
| दिव्यांग उमेदवार | 18 वर्षे ते शासन नियमानुसार सवलत |
निवड प्रक्रिया
कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2026 (APMC Recruitment 2026) या पदासाठी निवड प्रक्रिया पाच टप्प्यात खालील प्रमाणे दिलेली आहे.
जाहिरात व ऑनलाइन/ऑफलाइन अर्ज
- सर्वप्रथम बाजार समितीकडून रिक्त पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते.
- उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज करावा लागतो. त्यांनी अर्जा सोबत सांगितलेली आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक असते. https://www.msamb.com/
लेखी परीक्षा (Written Examination)
- बहुतेक पदांसाठी लेखी परीक्षाही घेण्यात येते आणि यामध्ये विचारले जाणारे विषय पुढीलप्रमाणे आहेत: सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता
- तांत्रिक पदासाठी संबंधित विषयाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात.
कौशल्य चाचणी (Skill Test)
- कौशल्य चाचणी सर्व पदासाठी नसते, त्या त्या पदाच्या स्वरूपानुसार घेण्यात येते.
- लिपिक पदासाठी टायपिंग केस तर संगणक ऑपरेटर साठी टायपिंग आणि संगणक हाताळण्याचे प्रशिक्षण असावे लागते. आणि चालक पदासाठी वाहन चालवण्याचे शिक्षण असावे लागते.
अंतिम मेरिट लिस्ट (Final Merit List)
- लेखी परीक्षेतील गुण आणि कौशल्य चाचणी यांचे गुण एकत्रित करून अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येते.
टिप : या भरतीची जाहिरात आल्यानंतर त्यामध्ये निवड प्रक्रियेची तपशील लक्ष करून वाचावा.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड
- रहिवासी दाखला (Domicile Certificate)
- १० वी चे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
- १२ वी चे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
- पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रक (पदवी पूर्ण झालेली असेल तर)
- तांत्रिक प्रमाणपत्रे
- MS-CIT प्रमाणपत्र (लिपिक ऑपरेटर पदासाठी आवश्यक आहे)
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer)
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र
- दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास)
- माजी सैनिक प्रमाणपत्र (सैनिकाच्या पाण्यासाठी किंवा स्वतः सैनिकांसाठी)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- अनुभव प्रमाणपत्र (जर अगोदर अनुभव घेतलेला असेल तर)
- वैध वाहन परवाना (Driving License) (चालक पदासाठी)
टिप : कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2026 (APMC Recruitment 2026) या पदाचा अर्थ करण्यासाठी वरील सर्व कागदपत्रे स्पष्ट स्कॅन प्रती असावीत याची काळजी घ्या कागदपत्रांमध्ये काही चूक झाल्यास अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही.
अभ्यासक्रम
कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2026 (APMC Recruitment 2026) या पदांमध्ये यश मिळवण्यासाठी खालील अभ्यासक्रम पूर्ण असावा लागतो.
- मराठी व्याकरण : शब्दसंग्रह, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, व्याकरण (प्रयोग, समास, संधी), उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे.
- इंग्रजी व्याकरण : Vocabulary, Synonyms/Antonyms, Grammar (Tenses, Articles, Prepositions), Sentence Structure, Spelling Errors.
- अंकगणित : बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, नफा-तोटा, टक्केवारी, गुणोत्तर-प्रमाण, काळ-काम-वेग.
- बुद्धिमत्ता चाचणी : तर्कक्षमता, श्रेणी पूर्ण करणे, नातेसंबंध, कोडिंग-डिकोडिंग, वेन आकृती, दिशाज्ञान.
- सामान्य ज्ञान : महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, राज्यघटना, पंचायतराज, कृषीविषयक माहिती, बाजार समितीचे कामकाज.
- चालू घडामोडी : गेल्या ६ महिने ते १ वर्षातील महत्त्वाच्या चालू घडामोडी, क्रीडा, पुरस्कार, सरकारी योजना.
- संगणक ज्ञान : MS-Office (Word, Excel, PowerPoint), इंटरनेटचा वापर, ईमेल, बेसिक हार्डवेअर/सॉफ्टवेअर माहिती.
पगार
कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2026 (APMC Recruitment 2026) या पदासाठी खालील प्रमाणे अंदाजे पगार देण्यात आली आहे.
| पद | अंदाजे मासिक वेतन |
| चतुर्थ श्रेणी (शिपाई, माळी, सफाई कर्मचारी) | 15,000 ते 25,000 |
| लिपिकवर्गीय (कनिष्ठ लिपिक, संगणक ऑपरेटर) | 20,000 ते 35,000 |
| तांत्रिक पदे (वायरमन, प्लंबर, चालक) | 18,000 ते 30,000 |
| प्रशासकीय पदे (लेखापाल, बाजार निरीक्षक) | 30,000 ते 47,600+ |

सूचना (Disclaimer) : सध्या महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) भरतीची कोणतीही नवीन अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. वरील माहिती ही मागील भरती प्रक्रिया आणि उपलब्ध माहितीनुसार मार्गदर्शनासाठी देण्यात आली आहे. पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि निवड प्रक्रियेमध्ये भविष्यात बदल होऊ शकतो. त्यामुळे भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच अंतिम माहिती ग्राह्य धरावी.
महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये वेळोवेळी रिक्त पदांनुसार भरती प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे येत्या काही महिन्यांत नवीन भरती जाहीर होण्याची शक्यता आहे. अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर सविस्तर माहिती स्वतंत्रपणे अपडेट करता येईल.
तुम्ही येथे “शिपाई भरती 2026” या पदाची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/peon-recruitment-2026/