इंडियन ओव्हरसीज बँक भरती (Indian Overseas Bank Recruitment 2026) या भरतीमध्ये अप्रेंटिस या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. ज्या तरुणांचे स्वप्न आहे बँकिंग क्षेत्रामध्ये आपले करिअर घडवावे अशा तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी चालून आली आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवणाऱ्या तरुणांकडून आणि पात्र उमेदवाराने 20 जुलै 2026 या तारखेच्या आत अर्ज मागवण्यात आले आहेत.
ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पडण्यासाठी BFSI Sector Skill Council of India (BFSI SSC) च्या ‘BEEP’ संकेतस्थळाचा वापर करण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया Apprentices Act, 1961 अंतर्गत राबविण्यात येत आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आवश्यक कागदपत्रे वयोमर्यादा, पदांचे स्वरूप अर्ज प्रक्रिया निवड प्रक्रिया आणि वेतन याची सविस्तर माहिती खालील लेखांमध्ये पाहू शकता….
पदाचे स्वरूप
इंडियन ओव्हरसीज बँक भरती (Indian Overseas Bank Recruitment 2026) या भरती प्रक्रिये मधील अप्रेंटिस या पदासाठी भरती प्रक्रिया चालू असून पदाचे स्वरूप खालील प्रमाणे दिले आहे.
- पदाचा प्रकार : अप्रेंटिस पद अप्रेंटिसशिप स्वरूपाचे आहे म्हणजेच अप्रेंटिस कायदा 1961 अंतर्गत येतो.
- कालावधी : एप्रिल पदासाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना एक वर्षाच्या करारावर घेण्यात येते.
- कामाचे स्वरूप : हे प्रशिक्षणार्थी पद आहे, बँकिंग क्षेत्रामधील कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आणि कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते.
- मानधन : एक वर्षाचे प्रशिक्षण कालावधी मध्ये उमेदवारांना दरमहा ठराविक मानधन देण्यात येते. हे मानधन बँकेच्या शाखे स्थानावर अवलंबून असते. मेट्रो शहरातील मानधन हे ₹15,500 असते.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
इंडियन ओव्हरसीज बँक भरती (Indian Overseas Bank Recruitment 2026) या पदासाठी उमेदवारांकडे खालील दिलेल्या शैक्षणिक पात्रता असणे अनिवार्य आहे.
- उमेदवाराकडे भारत सरकारने मान्यता दिलेल्या कोणतेही विद्यापीठांमधून कुठल्याही शाखेमध्ये पदवी असणे अनिवार्य आहे.
- उमेदवाराच्या पदवी परीक्षेचा निकाल हा 31 जुलै 2026 किंवा या अगोदर लागलेला असावा.
- लक्षात घ्या, उमेदवारांनी जर नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम या द्वारे नोंदणी केली असेल, तर त्यांच्या पदवीचा निकाल हा एक मार्च 2022 ते 31 जुलै 2026 या दरम्यान लागलेला असावा.
- बँकेने जर मागितले तर उमेदवाराला पदवीचे मार्कशीट आणि डिग्री प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
इंडियन ओव्हरसीज बँक भरती (Indian Overseas Bank Recruitment 2026) या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे याची यादी खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
- पदवी परीक्षेचे गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
- जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र वयाची तपासणी करण्यासाठी.
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- EWS प्रमाणपत्र
- दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र (PwBD) (असेल तर)
- तुम्ही निवडलेल्या राज्यातील स्थानिक भाषा बोलता वाचता आणि लिहिता येणे अनिवार्य असते त्यासाठी 10 वी किंवा 12 वी मधील गुणपत्रिकेची प्रत (ज्यामध्ये भाषा उमेदवाराने शिकलेली असावी)
- वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical Fitness)
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
इंडियन ओव्हरसीज बँक भरती (Indian Overseas Bank Recruitment 2026) या भरतीची परीक्षा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने असते याची संपूर्ण प्रक्रिया खालील प्रमाणे दिली आहे.
पूर्व नोंदणी :
- सर्वप्रथम तुम्ही या भरतीच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या https://nats.education.gov.in किंवा https://www.apprenticeshipindia.gov.in (NAPS)
- यानंतर ईमेल आयडी आणि चालू असलेला मोबाईल नंबर असणे अनिवार्य आहे.
- अर्ज करण्याअगोदर www.iob.in या वेबसाईट वरील सर्व जाहिराती लक्षपूर्वक वाचा
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्ही अर्ज करण्यासाठी समोरील लिंक ला भेट द्या www.bfsissc.com
- कर्जमाफी विचारलेली वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख) अन्य शैक्षणिक माहिती सर्व अचूक भरा.
- अर्ज भरताना तुम्हाला NATS किंवा NAPS नोंदणी क्रमांक देणे अनिवार्य असते.
- सांगितलेली सर्व कागदपत्रे योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरून घ्या, अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज पूर्ण होणार नाही.
- वरील सर्व माहिती अचूक आहे याची खात्री करून घ्या, कारण माहिती एकदा सबमिट केल्यानंतर दुरुस्त करता येत नाही.
- अर्ज सबमिट करा आणि अर्ज संपूर्ण सबमिट झाल्यानंतर अर्जाची एक प्रिंट आऊट काढून ठेवा.
- अंतिम तारीख : 20 जुलै 2026.
वयोमर्यादा – Age limit
| प्रवर्ग (Category) | वयोमर्यादा (Age Limit) |
| General/EWS | २० वर्षे – २८ वर्षे |
| SC / ST उमेदवार | ३३ वर्षे (५ वर्षांची सवलत) |
| OBC (Non-Creamy Layer) | ३१ वर्षे (३ वर्षांची सवलत) |
| दिव्यांग उमेदवा | ३८ वर्षे (१० वर्षांची सवलत) |

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखातील माहिती अधिकृत अधिसूचना व उपलब्ध स्रोतांच्या आधारे देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित बँकेची अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावरील अद्ययावत सूचना काळजीपूर्वक तपासून घ्याव्यात. जाहिरातीतील अटी, पात्रता, तारखा किंवा इतर बाबींमध्ये बदल झाल्यास अधिकृत माहितीच अंतिम व बंधनकारक राहील.
तुम्ही येथे “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/jalgaon-recruitment-2026/