DRDO Recruitment 2026 या भरतीची प्रक्रिया ही भारताची अग्रगण्य संरक्षण संशोधन संस्था राबवत असते. प्रत्येक वर्षी डीआरडीओ विविध तांत्रिक आणि अंतरिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत असतो यामध्ये शास्त्रज्ञ, तांत्रिक सहाय्यक आणि शिकाऊ उमेदवार इत्यादी पदांसाठी अर्ज मागवले जातात. 2026 च्या चालू वर्षात हे डीआरडीओने त्यांच्या विविध प्रयोग शाळांमार्फत पदवीधर आणि डिप्लोमा झालेल्या उमेदवारांसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया प्रामुख्याने देशाचे संरक्षण क्षेत्रात योगदान देण्याची आणि प्रगत तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी देत असते.
या भरतीसाठी ज्यांना अर्ज करायचा आहे, त्यांच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, वेतन, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया या सर्व गोष्टींची माहिती खालील लेखामध्ये दिली आहे.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
DRDO Recruitment 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे. उमेदवाराकडे असणे अनिवार्य असते याची सर्व माहिती खालीलप्रमाणे पाहू शकता.
- पदवीधर : संबंधित शाखेत अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- डिप्लोमा : संबंधित अभियांत्रिकी शाखेत कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेमधून डिप्लोमा पूर्ण असणे.
- आयटीआय : संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र असावे लागते.
- शास्त्रज्ञ : संबंधित विषयात इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, गणित प्रथम श्रेणीमध्ये पदवी उत्तीर्ण असणे.
- काही विशिष्ट पदांसाठी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असणे अनिवार्य असू शकते.
- तांत्रिक कर्मचारी : Senior Technical Assistant (या पदासाठी संबंधित विषयात विज्ञान शाखेमध्ये पदवी किंवा अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा पूर्ण असावा लागतो)
- Technician (Technician-A) (१० वी आयटीआय पूर्ण असावा लागतो)
टीप : प्रत्येक भरती प्रक्रियेनुसार वयोमर्यादा आणि विषयामध्ये अदल बदल होऊ शकते. यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर हा विभाग लक्षात घ्या.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
DRDO Recruitment 2026: या भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे दिली आहेत ते उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.
- दहावी आणि बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र.
- पदवी किंवा डिप्लोमा अंतिम वर्षाचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.
- आयटीआय पूर्ण असलेले प्रमाणपत्र
- पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- दिव्यांग प्रमाणपत्र (असेल तर)
- अनुभव प्रमाणपत्र
- रेझ्युमे (आवश्यक असतो फक्त मुलाखतीच्या वेळी)
वयामेर्यादा (Age limit)
DRDO Recruitment 2026: या भरतीचा अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे दिली आहे.
| पदाचा प्रकार | वयोमर्यादा |
| शिकाऊ उमेदवार (Apprentice) | १८ ते २७ वर्षे |
| शास्त्रज्ञ (Scientist – RAC) | २८ ते ३० वर्षे |
| तांत्रिक कर्मचारी (CEPTAM) | १८ ते २८ वर्षे |
निवड प्रक्रिया
DRDO Recruitment 2026: या भरतीची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे दिलेले आहे पाहू शकता :
शास्त्रज्ञ
- स्क्रीनिंग : शास्त्रज्ञ या पदासाठी गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाते.
- मुलाखत (Interview) : शॉर्टलिस्ट केल्यानंतर उमेदवारा डायरेक्ट मुलाखतीसाठी बोलण्यात येते.
- अंतिम निवड : मुलाखतीतील कामगिरीवर आधारित अंतिम यादी जाहीर केली जाते.
तांत्रिक कर्मचारी
- लेखी परीक्षा : या पदासाठी लेखी परीक्षा आहे दोन टप्प्यांमध्ये असू शकते
- टप्पा एक : सामान्य बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, सामान्य ज्ञान आणि तांत्रिक विषयावर आधारित बहुपर्यायी प्रश्न (यामधील सर्व प्रश्न MCQs टाईपचे असतात).
- टप्पा दोन : ट्रेड-आधारित तांत्रिक कौशल्य परीक्षा
शिकाऊ उमेदवार (Apprentice)
- या पदासाठी निवड प्रक्रिया परीक्षेच्या आधारे नसते. या पदाची निवड प्रक्रिया १० वी, १२ वी आणि संबंधित तांत्रिक पदवी डिप्लोमा किंवा आयटीआय मधील गुणांच्या आधारे निवड केली जाते.
- डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन : निवड झाल्यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत.
टीप : कोणत्याही निवड प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जाहिरातीमधील सेलेक्शन प्रोसेस हा विभाग लक्षपूर्वक वाचावा कारण डीआरडीओ या भरतीमध्ये बदल होऊ शकतो.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
DRDO Recruitment 2026: डीआरडीओ मध्ये विविध पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन असते. याची सर्व माहिती अर्ज कसा करावा खालीलप्रमाणे पाहू शकता :
- अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम या अधिकृत पोर्टलला भेट द्या https://rac.gov.in
- यानंतर New User किंवा Register या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुमची मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि आधार नंबर टाकून नोंदणी करा.
- यानंतर तुम्हाला युजर आणि पासवर्ड मिळेल त्या आधारे नोंदणी करून घ्या.
- यानंतर अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, जन्मतारीख आणि आधार नंबर), शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव काळजीपूर्वक भरा.
- कर्ज मध्ये नमूद केलेली सर्व कागदपत्र (फोटो साक्षर शैक्षणिक गुणपत्र जातीचा प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे) योग्य साईजमध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- यानंतर पदासाठी शुल्क असेल तर ऑनलाइन द्वारे भरा. आणि अर्ज चूक भरण्याचे खात्री करून घ्या जर अर्जामध्ये चुकीची माहिती आढळल्यास अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही.
- सर्व माहिती तितापासून झाल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : भरती प्रक्रियेत वेळोवेळी बदल होऊ शकतात. उमेदवारांना विनंती आहे की, त्यांनी कोणत्याही अर्जासाठी डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइटला (www.drdo.gov.in) भेट द्यावी आणि अधिकृत जाहिरात (Notification) काळजीपूर्वक वाचावी. या माहितीच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची जबाबदारी संबंधित उमेदवाराची असेल.
तुम्ही येथे “अग्नीवीर वायू भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/indian-air-force/