DSSSB MTS Bharti 2025 : दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) ने विविध सरकारी विभागांमध्ये मल्टी-टास्किंग स्टाफ (Multi-Tasking Staff – MTS) या पदांसाठी मोठी भरती जाहिरात (जाहिरात क्र. ०७/२०२५) प्रसिद्ध केली आहे. दहावी (मॅट्रिक्युलेशन) उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. एकूण ७१४ हून अधिक रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. जर तुम्ही केंद्रशासित प्रदेश दिल्ली सरकार (Govt. of NCT of Delhi) अंतर्गत प्रशासकीय विभागात करिअर करू इच्छित असाल, तर खालील तपशील काळजीपूर्वक वाचा.
अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने (Online Mode) स्वीकारले जातील. पोस्टाने, हाताने किंवा ईमेलद्वारे आलेले अर्ज थेट फेटाळले जातील.
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत DSSSB पोर्टलवर https://dsssbonline.nic.in जावून नोंदणी करावी.
अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
अर्ज सबमिट करण्याच्या अंतिम तारखेची (१५/०१/२०२६) वाट न पाहता, लवकरात लवकर अर्ज करावा.
लक्ष द्या: एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवाराचे नाव, वडिलांचे नाव, लिंग, किंवा श्रेणी (Category) यांसारख्या तपशीलांमध्ये कोणताही बदल किंवा सुधारणा करता येणार नाही.
DSSSB MTS Bharti 2025
महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.
नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.