शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय , (Government College of Engineering) छत्रपती संभाजी नगर मधील ही एक अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेची कामगिरी हे तांत्रिक शिक्षण आणि संशोधनाच्या या क्षेत्रात उत्कृष्टपणे तज्ज्ञांना अध्यापनाशी जोडण्यासाठी पुढाकार घेतला असून आहे. या महाविद्यालयात अंतर्गत प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या तरुणांना महाविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून करिअर घडवायचे असेल तर ही संधी त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. या भरतीचा मुख्य उद्देश म्हणजेच विद्यार्थ्यांचे कौशल्यामध्ये सुधारणा करणे उद्योग आणि शिक्षण यांच्यातील दुरावा कमी करणे आणि संशोधनाला एक नवी दिशा करून देणे हा आहे.
प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या पदासाठी ज्या तरुणांना अर्ज करायचा असेल तर या लेखामध्ये खालील प्रमाणे सर्व माहिती दिली आहे पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पदासाठी अंदाजे पगार, अर्ज शुल्क आणि परीक्षा अभ्यासक्रम या सर्व गोष्टींची माहिती खालील लेखांमध्ये दिली आहे.
प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणजे काय ?
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (Government College of Engineering) या महाविद्यालयात अंतर्गत प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या पदासाठी भरती प्रक्रिया निघाली असून प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या पदाचे काम काय असते? याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
- ज्या व्यक्तीकडे तांत्रिक किंवा व्यावसायिक क्षेत्राचा मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव आहे, अशा व्यक्तींचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे आणि उद्योग व शिक्षण यामधील निर्माण झालेला अंतर कमी व्हावा हा या पदाचा मुख्य उद्देश असतो.
- या पदाचा अर्ज करण्यासाठी पारंपारिक शैक्षणिक पदवी पेक्षा या पदास संबंध कमीत कमी 15 वर्षाचा अनुभव त्या व्यक्तीकडे असणे महत्त्वाचे मानले जाते.
- प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या पदावरील व्यक्ती फक्त विद्यार्थ्यांना शिकवतच नाही, तर त्यांना नवीन नवीन कोर्सेस डिझाईन शिकवणे, स्टार्ट प्रकल्पामध्ये मार्गदर्शन करणे आणि संशोधन कामांमध्ये गरजेनुसार मदत करणे शी या पदाची जबाबदारी असते.
- या पदासाठी शैक्षणिक निकषांची अट लागून नाही, आणि या पदासाठी काम करणाऱ्यांना इतर नियमित प्राध्यापकांसाठी असलेले प्रकाशने लागू नसतात.
पात्रता (Eligibility)
शासकीय अभियांत्रिका महाविद्यालय (Government College of Engineering) या महाविद्यालयांमधील प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या पदासाठी जागा निघाली असून या जागेसाठी कोण पात्र ठरते याची संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये दिली आहे.
- या पदासाठी संबंधित क्षेत्रात (अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, उद्योजकता, कला, क्रीडा, प्रशासन) कमीत कमी १५ वर्षाचा अनुभव उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
- हा अनुभव वरिष्ठ स्तरावरील असल्यानंतर अधिक फायदेशीर ठरते.
- या पदाचा अर्ज करण्यासाठी औपचारिक शैक्षणिक पदवी असणे अनिवार्य नाही, एखाद्या वेळेस उमेदवाराकडे त्या क्षेत्रातील उत्कृष्ट व्यावहारिक अनुभव असे.
- प्राध्यापक पदासाठी आवश्यक की असलेली पात्रता किंवा इतर शैक्षणिक निकष या पदासाठी लागू नाहीत.
- या पदासाठी कोण पात्र ठरू शकत नाही : जे उमेदवार सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत किंवा निवृत्त नंतर शिक्षक आहेत.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (Government College of Engineering) या महाविद्यालयात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या पदासाठी अर्ज करताना खालील दिलेली आवश्यक कागदपत्रे सोबत असणे अनिवार्य आहे.
- भरलेला अर्ज आणि स्वाक्षरी केलेला अर्ज
- अद्ययावत बायोडाटा (Resume)
- पासपोर्ट आकाराचा डिजिटल फोटो
- शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
- कामाच्या अनुभवाचा दाखला (Professional Experience)
- मिळवलेली पदके, पुरस्कार किंवा इतर उपलब्धींची प्रमाणपत्रे
- संभाव्य योगदान (Write-up)
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (Government College of Engineering) या महाविद्यालय अंतर्गत निघाल्या पदासाठी अर्ज प्रक्रिया कशी करावी याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे:
- सर्वप्रथम अधिकृत पोर्टलवर भेट द्या https://forms.gle/jhNKpbGC8PP12mq69)
- सांगितलेली कागदपत्रे (अर्ज आणि स्वाक्षरी केलेला अर्ज, पासपोर्ट आकाराचा फोटो, शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव आणि इतर साध्य केलेले पुरस्कारांच्या प्रमाणपत्राची प्रत) अर्जासोबत योग्य साईज मध्ये अपलोड करा.
- या पदासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे २५ जून २०२६
- पात्र झालेल्या उमेदवारांना ई-मेल द्वारे मुलाखतीची तारीख आणि वेळ कळविण्यात येईल.
- निवड प्रक्रियेच्या वेळी सर्व कागदपत्रे मूळ ठेवा फोटो आयडी आणि अर्ज ची स्वाक्षरी केलेली हार्ड कॉपी सोबत असणे अनिवार्य आहे.
निवड प्रक्रिया
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (Government College of Engineering) या महाविद्यालय अंतर्गत प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या पदासाठी निवड प्रक्रिया खालील प्रमाणे दिली आहे.
- सर्वात अगोदर उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी केली जाते. पात्र आणि शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ईमेल द्वारे मुलाखतीसाठी बोलविण्यात येते.
- Round 1 हा राऊंड संबंधित विभागात होईल यामध्ये उमेदवारांच्या विषयातली स्किल आणि विज्ञान तपासले जाते.
- Round 2 हा राऊंड पहिल्या राउंड मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची संस्था स्तरावर वैयक्तिक मुलाखत घेण्यात येते.
- निवड प्रक्रियेसाठी उमेदवाराला कुठल्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही. आणि उमेदवारांनी काळजीपूर्वक सर्व कागदपत्रे मूळ आणि फोटो आयडी पुरावा सोबत असणे अनिवार्य आहे.
वेतन
| श्रेणी | कामाचे स्वरूप | मानधन |
| पूर्णवेळ नियुक्ती | पूर्णवेळ काम | १,००,०००/- रुपये |
| मानसेवी | १ तास अध्यापन | १,५००/- रुपये |
| मानसेवी | ४ तास अध्यापन | ६,०००/- रुपये |
| क्रेडिट आधारित | कौशल्य-आधारित कोर्सेस | ३०,०००/- रुपये |
कामाचे ठिकाण : छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (Government College of Engineering, Chhatrapati Sambhajinagar)

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती अधिकृत भरती जाहिरात, अधिसूचना आणि उपलब्ध सार्वजनिक माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित संस्थेची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून सर्व अटी, पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज प्रक्रिया आणि इतर तपशीलांची खात्री करून घ्यावी. भरती प्रक्रियेमध्ये किंवा जाहिरातीत वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे अंतिम आणि अचूक माहितीसाठी संबंधित संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरील अधिसूचनेलाच प्राधान्य द्यावे. या लेखातील माहितीच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी लेखक किंवा संकेतस्थळ जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “सोलापूर जनता सहकारी बँक भरती 2026” याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/solapur-janata-sahakari-bank-recruitment-2026/