Gramin Dak Sevak Recruitment 2026 : 10वी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांसाठी आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीचे सुवर्णसंधी. भारतीय डाक विभागाने ग्रामीण भागात पोस्टल सेवा अधिक बळकट करण्यासाठी ग्रामीण डाक सेवक भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून देशभरातील विविध पोस्टल सर्कल आणि विभागांमध्ये शाखा पोस्ट मास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक या पदांसाठी एकूण 23,757 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून अर्ज करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२६ ते २१ सप्टेंबर २०२६ असा असणार आहे. या प्रतीक प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जाणार नसून, उमेदवाराची निवड ही दहावीच्या बोर्ड परीक्षेतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.
- महत्त्वाच्या तारखा :
- ऑनलाइन नोंदणी (One-Time Registration): ३१ ऑगस्ट २०२६ ते १९ सप्टेंबर २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत)
- ऑनलाइन अर्ज आणि फी भरण्याची अंतिम तारीख: २ सप्टेंबर २०२६ ते २१ सप्टेंबर २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत)
- अर्ज दुरुस्ती (Edit/Correction) विंडो: २३ सप्टेंबर २०२६ ते २४ सप्टेंबर २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत)
Gramin Dak Sevak Recruitment 2026 : राज्यानुसार पदांचे नाव आणि एकूण जागांची माहिती
| सर्कल / राज्य | एकूण जागा |
| आंध्र प्रदेश सर्कल | 917 |
| आसाम सर्कल | 414 |
| बिहार सर्कल | 1,098 |
| छत्तीसगड सर्कल | 762 |
| दिल्ली सर्कल | 16 |
| गुजरात सर्कल | 419 |
| हरियाणा सर्कल | 87 |
| हिमाचल प्रदेश सर्कल | 335 |
| जम्मू आणि कश्मीर सर्कल | 340 |
| झारखंड सर्कल | 1,379 |
| कर्नाटक सर्कल | 1,116 |
| केरळ सर्कल | 1,373 |
| मध्य प्रदेश सर्कल | 1,450 |
| महाराष्ट्र सर्कल | 2,431 |
| उत्तर पूर्व सर्कल (North Eastern) | 2,500 |
| ओडिशा सर्कल | 1,353 |
| पंजाब सर्कल | 122 |
| राजस्थान सर्कल | 1,009 |
| तामिळनाडू सर्कल | 2,118 |
| तेलंगणा सर्कल | 419 |
| उत्तराखंड सर्कल | 452 |
| उत्तर प्रदेश सर्कल | 1,619 |
| पश्चिम बंगाल सर्कल | 1,763 |
| एकूण | 23,757 |
Gramin Dak Sevak Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
इंडिया पोस्ट जीडीएस (Gramin Dak Sevak) भरती २०२६ या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :
- १० वी परीक्षा उत्तीर्ण: उमेदवाराने भारत सरकार किंवा राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेशांच्या कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून गणित आणि इंग्रजी विषयांसह १० वी (Secondary School Examination) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. इतर बोर्डांची समतुल्य पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.
- स्थानिक भाषेचे ज्ञान: उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी १० वी पर्यंत स्थानिक भाषा शिकलेली असणे आवश्यक आहे.
- इतर आवश्यक पात्रता:
- संगणकाचे ज्ञान.
- सायकल चालवण्याचे ज्ञान.
- स्वतःच्या व कुटुंबाच्या निर्वाहासाठी उत्पन्नाचे योग्य साधन.
Gramin Dak Sevak Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
इंडिया पोस्ट जीडीएस (Gramin Dak Sevak) भरती २०२६ या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत :
- १० वी ची गुणपत्रिका व प्रमाणपत्राची मूळ प्रत.
- ओळख पटवण्यासाठी कोणतेही वैद्य ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate – लागू असल्यास).
- दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD Certificate – लागू असल्यास).
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र (EWS Certificate – लागू असल्यास).
- ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र (Transgender Certificate – लागू असल्यास)
- जन्मतारखेचा दाखला (Date of Birth Proof)
- सरकारी रुग्णालय किंवा दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने जारी केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
- काही विशिष्ट राज्यांसाठी (उदा. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, गोवा किंवा नागालँड) स्थानिक भाषा किंवा बोलीभाषेच्या ज्ञानाबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र.
Gramin Dak Sevak Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
इंडिया पोस्ट जीडीएस (Gramin Dak Sevak) भरती २०२६ या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाण आहे :
- इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत पोर्टलला भेट देऊन मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून वन टाइम रजिस्ट्रेशन करावे.
- रजिस्ट्रेशन पूर्णपणे झाल्यानंतर मिळालेल्या युनिक नंबर आणि पासवर्ड सहाय्याने लॉगिन करून घ्या.
- लॉगिन केल्यानंतर अर्जामधील वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
- अर्जासोबत कोणतेही कागदपत्रे जोडण्याची गरज नाही, परंतु पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी ठरवून दिलेल्या साईजमध्ये योग्य स्वरूपात अपलोड करा.
- सर्वसाधारण (UR), OBC आणि EWS प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे, तर सर्व महिला, SC/ST, दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. शुल्क ऑनलाइन माध्यमातून (Credit/Debit Card, Net Banking, UPI) भरावे.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जामधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करा आणि नंतरच अर्ज सबमिट करा.
- अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआऊट काढून ठेवा.
Gramin Dak Sevak Recruitment 2026 : वेतनश्रेणी – Salary
| पदाचा प्रवर्ग | वेतनश्रेणी |
| शाखा पोस्टमास्टर (BPM) | रुपये १२,०००/- ते २९,३८०/- |
| सहाय्यक शाखा पोस्टमास्टर / डाक सेवक (ABPM / Dak Sevak) | रुपये १०,०००/- ते २४,४७०/- |
| Online apply | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Vacancy details PDF | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |
इंडिया पोस्ट GDS भरती 2026 – FAQ प्रश्न व उत्तरे
- इंडिया पोस्ट GDS भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: इंडिया पोस्ट GDS भरती 2026 मध्ये 23,757 पदे असल्याचे नमूद केले आहे. - GDS भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक असते. - GDS भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: सामान्यतः वय 18 ते 40 वर्षे असते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळते. - GDS भरतीमध्ये कोणती पदे असतात?
उत्तर: Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Dak Sevak या पदांसाठी भरती केली जाते. - GDS भरतीमध्ये परीक्षा घेतली जाते का?
उत्तर: GDS निवड प्रक्रिया प्रामुख्याने 10वीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्टद्वारे केली जाते. - GDS भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: उमेदवारांना इंडिया पोस्टच्या अधिकृत GDS भरती पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो. - GDS भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्क प्रवर्गानुसार वेगळे असू शकते. महिला, SC/ST, PwBD आणि इतर पात्र सवलतप्राप्त उमेदवारांना शुल्कातून सूट लागू असू शकते. - GDS भरतीमध्ये निवड झाल्यानंतर नोकरी कुठे मिळते?
उत्तर: उमेदवाराची निवड संबंधित पोस्टल सर्कल/डिव्हिजनमधील उपलब्ध पदानुसार केली जाते. - GDS भरतीसाठी स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक आहे का?
उत्तर: होय. संबंधित पोस्टल सर्कलसाठी निर्धारित स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक असते. - GDS भरतीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?
उत्तर: शैक्षणिक प्रमाणपत्र, जन्मतारीख पुरावा, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), फोटो, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रे अर्जाच्या सूचनेनुसार आवश्यक असतात.

महत्त्वाची सूचना : या लेखामध्ये इंडिया पोस्ट GDS (Gramin Dak Sevak) भरती 2026 संदर्भातील माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. भरतीतील पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क, निवड प्रक्रिया आणि अंतिम तारखांमध्ये अधिकृत अधिसूचनेनुसार बदल होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध झालेली जाहिरात व अधिकृत सूचना काळजीपूर्वक तपासावी. या लेखातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली असून कोणतीही माहिती चुकीची आढळल्यास अधिकृत अधिसूचनेतील माहिती अंतिम मानावी.
तुम्ही येथे “डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/dr-d-y-patil-institute-of-technology-recruitment/