IIMC Recruitment 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. भारतीय जन संचार संस्थान (IIMC), नवी दिल्ली यांनी विविध प्रशासकीय आणि तांत्रिक पदांच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये लायब्ररी ऑफिसर, असिस्टंट, युडीसी (UDC), स्टेनोग्राफर आणि इतर महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. या नोकरीबद्दलची संपूर्ण माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शुल्क आणि अर्ज करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.
रिक्त पदांचा तपशील (Vacancy Details)
एकूण 51 पदांची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात आली आहे:
| अ.क्र. | पदाचे नाव | एकूण जागा | पे-लेव्हल |
|---|---|---|---|
| 1 | लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन ऑफिसर | 01 | लेव्हल – 11 |
| 2 | असिस्टंट एडिटर (डेप्युटेशन) | 01 | लेव्हल – 10 |
| 3 | असिस्टंट रजिस्ट्रार | 05 | लेव्हल – 10 |
| 4 | सेक्शन ऑफिसर | 04 | लेव्हल – 7 |
| 5 | सीनियर रिसर्च असिस्टंट | 01 | लेव्हल – 6 |
| 6 | असिस्टंट (Assistant) | 11 | लेव्हल – 6 |
| 7 | प्रोफेशनल असिस्टंट | 05 | लेव्हल – 6 |
| 8 | ज्युनियर प्रोग्रामर | 05 | लेव्हल – 6 |
| 9 | अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) | 12 | लेव्हल – 4 |
| 10 | स्टेनोग्राफर | 06 | लेव्हल – 4 |
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 13 डिसेंबर 2025
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2026
- अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2026 (संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत)
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- विविध पदांसाठी पात्रता वेगळी आहे, त्यातील काही मुख्य पदे खालीलप्रमाणे:
- UDC/असिस्टंट/स्टेनोग्राफर: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Degree) आणि संबंधित कामाचा अनुभव.
- सेक्शन ऑफिसर: पदवी + 3 वर्षे असिस्टंट म्हणून अनुभव.
- ज्युनियर प्रोग्रामर: B.E./B.Tech (CS/IT) किंवा M.C.A./M.Sc. आणि प्रोग्रामिंगचा अनुभव.
- लायब्ररी ऑफिसर: लायब्ररी सायन्समध्ये मास्टर डिग्री आणि 5 वर्षांचा अनुभव.
- (टीप: प्रत्येक पदासाठी सविस्तर पात्रता पाहण्यासाठी अधिकृत PDF जाहिरात नक्की वाचा.)
वयोमर्यादा (Age Limit)
- (टीप: प्रत्येक पदासाठी सविस्तर पात्रता पाहण्यासाठी अधिकृत PDF जाहिरात नक्की वाचा.)
- लायब्ररी ऑफिसर/असिस्टंट रजिस्ट्रार: जास्तीत जास्त 40 वर्षे.
- सेक्शन ऑफिसर/असिस्टंट/प्रोग्रामर: जास्तीत जास्त 35 वर्षे.
- UDC/स्टेनोग्राफर: जास्तीत जास्त 32 वर्षे.
- (सरकारी नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल).
सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक :
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
परीक्षा शुल्क (Application Fee)
| प्रवर्ग (Category) | ग्रुप A पदे | ग्रुप B पदे | ग्रुप C पदे |
|---|---|---|---|
| UR / OBC | ₹ 1500/- | ₹ 1000/- | ₹ 500/- |
| SC / ST / Women / EWS / PwD | ₹ 750/- | ₹ 500/- | ₹ 250/- |
(डेप्युटेशन पदांसाठी कोणतेही शुल्क नाही).
अर्ज कसा करावा? (How to Apply)
- सर्वप्रथम उमेदवाराने https://iimc.samarth.edu.in/ या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढावी.
- अर्जाच्या प्रिंटसोबत सर्व शैक्षणिक कागदपत्रे, अनुभवाचे दाखले आणि डिमांड ड्राफ्ट (DD) जोडावा.
- हा अर्ज एका बंद पाकिटात भरून “The Deputy Registrar, Indian Institute of Mass Communication, Aruna Asaf Ali Marg, New JNU Campus, New Delhi 110067” या पत्त्यावर स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवावा.
- पाकिटावर ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्याचे नाव स्पष्ट लिहावे.
महत्त्वाची लिंक: - निवड प्रक्रिया: ही पदे लेखी परीक्षा, स्किल टेस्ट आणि मुलाखतीद्वारे (पदांनुसार) भरली जातील.
अधिक माहितीसाठी आणि अर्जाचा नमुना पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचा किंवा IIMC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
