Income Tax Department Mumbai Bharti 2025 : सरकारी क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. प्रधान मुख्य आयकर आयुक्त कार्यालय, मुंबई यांनी ‘यंग प्रोफेशनल’ (Young Professional) पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. विशेषतः कायदा (Law) आणि अकाउंटन्सी (Accountancy) क्षेत्रातील पदवीधरांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
या भरती प्रक्रियेद्वारे आयटीएटी (ITAT) मधील प्रकरणांच्या तयारीसाठी आणि कर विवादांशी संबंधित संशोधनासाठी कुशल तरुणांची नियुक्ती केली जाणार आहे.
रिक्त पदांचा तपशील (Vacancy Details)
- पदाचे नाव : यंग प्रोफेशनल (Young Professional)
- एकूण पदे : ११
- मानधन : ४०,००० रुपये प्रति महिना (एकत्रित)
- कामाचे ठिकाण : मुंबई
- कराराचा कालावधी : सुरुवातीला १ वर्ष (कामगिरीनुसार वाढविला जाऊ शकतो)
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा (Eligibility Criteria)
- शिक्षण :
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी पदवीधर (LLB) किंवा सीए (Chartered Accountant) असावा.
- गुण :
- एलएलबी किंवा सीए मध्ये किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा :
- अर्जदाराचे वय जाहिरातीच्या तारखेला ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- प्राधान्य :
- ज्या उमेदवारांना टॅक्सेशन क्षेत्रात अनुभवा किंवा विशेष कौशल्ये आहेत, त्यांना निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल.
सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक :
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया (Selection Process)
प्राप्त झालेल्या अर्जांमधून उमेदवारांची शॉर्टलिस्ट तयार केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ई-मेल किंवा स्पीड पोस्टद्वारे वैयक्तिक मुलाखतीसाठी (Personal Interview) बोलावले जाईल. मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
अर्ज कसा करावा? (How to Apply)
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन आणि ऑनलाइन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल:
- ऑफलाइन अर्ज : विहित नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे खालील पत्त्यावर ५ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
- पत्ता : Office of Addl. Commissioner of Income Tax (HQ) Coordination, Room No. 335, Aayakar Bhavan, Maharshi Karve Road, Mumbai 400 020.
- ई-मेल अर्ज : अर्जाची स्कॅन केलेली प्रत (PDF स्वरूपात) mumbai.dcit.hq.coord@incometax.gov.in या ई-मेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे.
- महत्त्वाची तारीख (Important Date)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: ५ जानेवारी २०२६ (सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत).
- अधिकृत माहिती आणि अर्जाचा नमुना मिळवण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
टिप: अपूर्ण अर्ज किंवा मुदतीनंतर आलेले अर्ज नाकारले जातील. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज पूर्ण करावा.
