Income Tax Department Odisha Recruitment 2026: जर तुम्ही एक उत्तम खेळाडू (Sportsperson) असाल आणि केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित विभागात सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आली आहे. भारत सरकारच्या आयकर विभागाने (Odisha Region) मेधावी खेळाडूंसाठी स्पोर्ट्स कोटा (Sports Quota) अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे.
ही भरती पूर्णपणे नियमित स्वरूपाची असून, याद्वारे टॅक्स असिस्टंट (Tax Assistant), स्टेनोग्राफर (Stenographer Gr-II) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) ही पदे भरली जाणार आहेत. चला तर मग, या भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज करण्याची पद्धत याबद्दलची संपूर्ण माहिती सोप्या गावरान भाषेत समजून घेऊया.
Recruitment Overview (भरतीचा संक्षिप्त गोषवारा)
- विभाग (Organization): प्रधान मुख्य आयकर आयुक्त कार्यालय, ओडिशा क्षेत्र, भुवनेश्वर.
- पदांची नावे (Post Names): टॅक्स असिस्टंट, स्टेनोग्राफर ग्रेड-II, आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS).
- एकूण जागा (Total Vacancies): १२ जागा.
- नोकरीचे ठिकाण (Job Location): ओडिशा क्षेत्र (Odisha Region).
- अर्जाची पद्धत (Application Mode): फक्त Offline (स्पीड पोस्ट किंवा नोंदणीकृत टपालाने).
- अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख: ३१ जुलै २०२६ (सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत).
पूर्वोत्तर राज्ये, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीरमधील उमेदवारांसाठी अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२६ आहे.
Vacancy & Salary Details (पदांचा तपशील आणि पगार)
| पदनाम (Post Name) | एकूण जागा | वेतन श्रेणी (7th CPC नुसार) | वयोमर्यादा (दि. 01.08.2026 रोजी) |
|---|---|---|---|
| टॅक्स असिस्टंट (Tax Assistant) | 07 | पे-लेव्हल 4 (₹25,500 ते ₹81,100) | 18 ते 27 वर्षे |
| स्टेनोग्राफर ग्रेड-II (Stenographer) | 01 | पे-लेव्हल 4 (₹25,500 ते ₹81,100) | 18 ते 27 वर्षे |
| मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) | 04 | पे-लेव्हल 1 (₹18,000 ते ₹56,900) | 18 ते 25 वर्षे |
| एकूण | 12 | — | — |
वयोमर्यादेत सूट: सर्वसाधारण खेळाडूंसाठी उच्च वयोमर्यादेत ५ वर्षांपर्यंत, तर अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील खेळाडूंसाठी १० वर्षांपर्यंतची सूट केंद्र सरकारच्या नियमांनुसार लागू राहील.
Educational Eligibility (शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता)
- टॅक्स असिस्टंट: मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी (Bachelor’s Degree) उत्तीर्ण असावी. त्यासोबतच संगणकावर प्रति तास ८००० की-डिप्रेशन (Key Depressions) एवढी डेटा एंट्रीची गती असणे आवश्यक आहे.
- स्टेनोग्राफर ग्रेड-II: उमेदवार किमान १२ वी उत्तीर्ण असावा. तसेच डिक्टेशन १० मिनिटांत ८० शब्द प्रति मिनिट आणि ट्रान्सक्रिप्शन ५० मिनिटे (इंग्रजी) किंवा ६५ मिनिटे (हिंदी) संगणकावर पूर्ण करता आले पाहिजे.
- मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS): उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण (Matriculation) असावा.
Sports Eligibility (खेळाडू संदर्भातील पात्रता)
या भरतीसाठी केवळ तेच खेळाडू पात्र ठरतील ज्यांनी खालील स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे किंवा पदक जिंकले आहे (दिनांक ३१.०३.२०२६ पर्यंतचेच क्रीडा प्राविण्य विचारात घेतले जाईल):
- आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्पर्धेत देश किंवा राज्याचे प्रतिनिधित्व केलेले असावे.
- ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप, खेलो इंडिया युथ गेम्स (१८ वर्षांवरील प्रवर्ग), खेलो इंडिया विंटर/पैरा/युनिव्हर्सिटी गेम्समध्ये पदक विजेते असावेत.
- इंटर-युनिव्हर्सिटी टूर्र्नामेंटमध्ये युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधित्व केलेले असावे.
- स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (SGFI) द्वारे आयोजित राष्ट्रीय शालेय स्पर्धांमध्ये राज्याच्या शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले असावे.
- पात्र खेळांची उदाहरणे: एकूण ६५ खेळ यामध्ये पात्र आहेत; जसे की कबाडी, खो-खो, क्रिकेट, ॲथलेटिक्स, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बुद्धिबळ, योगासन, मल्लखांब इत्यादी.
सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक :
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
Required Documents List (अर्जासोबत जोडायची कागदपत्रे)
खालील सर्व कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित (Self-Attested) छायांकित प्रती अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे:
- वयाचा पुरावा (१० वीचे प्रमाणपत्र / गुणपत्रक).
- शैक्षणिक पात्रतेची सर्व प्रमाणपत्रे व मार्कशीट (१० वी, १२ वी, पदवी).
- क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्र (क्रीडा प्राधिकरणाचे विहित नमुन्यातील फॉर्म १ ते ५ पैकी जो लागू असेल तो).
- जातीचे प्रमाणपत्र (SC/ST/OBC उमेदवारांसाठी).
- आधार कार्ड किंवा इतर कोणतेही सरकारी ओळखपत्र.
- दोन नजीकचे पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो.
- उमेदवार सरकारी नोकरीत असल्यास सध्याच्या विभागाचे अनापत्ति प्रमाणपत्र (NOC).
How to Apply (अर्ज कसा करावा?)
हा अर्ज पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातील (Annexure-II) अर्ज काळजीपूर्वक भरून पाठवायचा आहे.
- Step 1: अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करून तो इंग्रजी मोठ्या अक्षरात (BLOCK LETTERS) नीळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनने स्पष्ट भरा.
- Step 2: अर्ज भरताना पदांचा पसंतीक्रम (Preference) व्यवस्थित नमूद करा (उदा. पहिल्या पसंतीसाठी ‘१’, दुसऱ्यासाठी ‘२’ आणि ज्या पदासाठी रस नसेल तिथे ‘X’ लिहा).
- Step 3: सर्व आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींवर स्वतःची स्वाक्षरी (Self-Attested) करून अर्जासोबत जोडा.
- Step 4: संपूर्ण भरलेला अर्ज आणि कागदपत्रे एका बंद लिफाफ्यात टाका. लिफाफ्यावर स्पष्ट आणि ठळक अक्षरात इंग्रजीत खालीलप्रमाणे लिहा: “Application for appointment of meritorious sportsperson in Income Tax Department, Odisha Region- 2026”
- Step 5: हा लिफाफा केवळ स्पीड पोस्ट (Speed Post) किंवा रजिस्टर्ड पोस्टाने खालील दिलेल्या पत्त्यावर अंतिम तारखेच्या आधी पोहोचेल अशा बेताने पाठवा.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: Deputy Commissioner of Income Tax (Hqrs.) (Admn. & Vig.), Office of the Pr. Chief Commissioner of Income Tax, 1st Floor, Aayakar Bhawan, Rajaswa Vihar, Bhubaneswar – 751007
Selection Process (निवड प्रक्रिया)
- प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी करून उमेदवारांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीच्या (Sports Achievements) गुणांच्या आधारे त्यांना शॉर्टलिस्ट केले जाईल.
- टॅक्स असिस्टंट आणि स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवारांना पहिल्या टप्प्यात शॉर्टलिस्ट करून दुसऱ्या टप्प्यात कौशल्य चाचणी (Skill Test) द्यावी लागेल.
- MTS (मल्टी-टास्किंग स्टाफ) पदासाठी कोणतीही परीक्षा किंवा चाचणी असणार नाही, थेट क्रीडा गुणांच्या गुणवत्तेवर (Merit List) निवड केली जाईल.
- अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना २ वर्षांच्या परिवीक्षा कालावधीवर (Probation) ठेवले जाईल आणि त्यांना कमतीकमी पुढील ५ वर्षे विभागाकडून खेळांमध्ये भाग घेणे बंधनकारक असेल.
