Malegaon Mahanagar Palika Recruitment 2026 : मालेगाव महानगरपालिका भरती 2026; 63 जागांसाठी Best भरती! पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Malegaon Mahanagar Palika Recruitment 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. मालेगाव येथे महानगरपालिकेच्या एन.एन. वाडीया हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी प्रशासनाने भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. शहराच्या कार्यक्षेत्रामध्ये नव्याने कार्यन्वित होणाऱ्या या रुग्णालयामधील आरोग्य सेवांचा आणि कामांचं त्वरेने निपटारा हवामान महानगरपालिकेच्या आस्थापना भारतात थेट मुलाखती द्वारे विविध पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

मालेगाव महानगरपालिका भरती ही पूर्णपणे टोक मानधन तत्वावर आणि सहा महिन्यांच्या विशिष्ट कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये असणार असून, या भरती प्रक्रियेमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांपासून ते अगदी परिचारिका, तंत्रज्ञ आणि कक्षसेवकांपर्यंतच्या एकूण १८ वेगवेगळ्या पदांचा समावेश या भरती प्रक्रियेमध्ये आहे. महत्त्वाचे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा कोविड-19 च्या काळात यापूर्वी अनुभव घेतलेल्या अनुस्थानिक उमेदवारांना या भरतीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. या भरती बद्दल अधिक माहिती जाऊन घेण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचणे आवश्यक आहे.

    • महत्त्वाच्या तारखा :
      • पहिली फेरी (तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, सिस्टर इनचार्ज, परिचारिका व विविध तंत्रज्ञ पदे – अनुक्रमांक १ ते १२): मुलाखतीचा दिनांक ०७/०९/२०२६ रोजी, सकाळी ११ ते दुपारी २ (पदे ९ ते १२ साठी दुपारी ३ ते संध्याकाळी ५).
      • ​दुसरी फेरी (मिश्रक, ए.एन.एम., शस्त्रक्रिया गृह सहाय्यक, कक्ष सेवक, कक्षसेविका आणि ड्रेसर पदे – अनुक्रमांक १३ ते १८): मुलाखतीचा दिनांक ०८/०९/२०२६ रोजी, सकाळी ११ ते दुपारी २ (पदे १६ ते १८ साठी दुपारी ३ ते संध्याकाळी ५).

    Malegaon Mahanagar Palika Recruitment 2026 : पद संख्या आणि माहिती

    पदाचे नावएकूण जागा
    वैद्यकशास्त्र तज्ञ01
    बधिरीकरण तज्ञ02
    बालरोग तज्ञ02
    विकृतीशास्त्र तज्ञ01
    स्त्रीरोग तज्ञ02
    वैद्यकीय अधिकारी (MBBS)09
    वैद्यकीय अधिकारी (BAMS) 03
    सिस्टर इनचार्ज / नाईट सुपरवाइजर02
    सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN)01
    प्रयोगशाळा तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञ02
    क्ष-किरण तंत्रज्ञ02
    नर्स / नर्स स्टाफ मिडवाईफ09
    मिश्रक02
    ऑक्झलरी नर्स मिडवाईफ (ANM)09
    शस्त्रक्रिया गृह सहाय्यक02
    कक्ष सेवक06
    कक्षसेविका (महिला)06
    ड्रेसर02

    Malegaon Mahanagar Palika Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

    मालेगाव महानगरपालिका भरती 2026 या भरतीसाठी उमेदवाराकडे खालील शैक्षणिक पात्रता पदानुसार देण्यात आली आहे.

    • वैद्यकशास्त्र तज्ञ (MD Medicine) या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून एम.डी. (मेडीसिन) किंवा समकक्ष पदवी आणि शासकीय/निमशासकीय/खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयांमधील तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
    • बधिरीकरण तज्ञ या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून एम.डी. किंवा एम.बी.बी.एस., डी.ए. किंवा समकक्ष पदवी अनिशा के न्यू शासकीय किंवा खाजगी रुग्णालया मधील कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
    • विकृतीशास्त्र तज्ञ (Pathology): मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी.डी.सी.एच/एम.डी. (शरीरशास्त्र), एम.बी.बी.एस., डी.सी.पी. (डिप्लोमा इन क्लिनिकल पॅथॉलॉजी) किंवा समकक्ष पदवी आणि शासकीय/निमशासकीय/खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभव.
    • स्त्रीरोग तज्ञ: मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. किंवा एम.बी.बी.एस., डी.जी.ओ. (स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र) किंवा समकक्ष पदवी आणि शासकीय/निमशासकीय/खाजगी रुग्णालयातील संबंधित ३ वर्षाचा अनुभव.
    • वैद्यकीय अधिकारी (MBBS): मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. किंवा शासन मान्य समकक्ष पदवी, शासकीय/निमशासकीय/खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील तीन वर्षाचा अनुभव, आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियमांतर्गत नोंदणी आवश्यक.
    • वैद्यकीय अधिकारी (BAMS): मान्यताप्राप्त विद्यापीठाची BAMS (आयुर्वेद) किंवा शासन मान्य समकक्ष पदवी, शासकीय/निमशासकीय/खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील तीन वर्षाचा अनुभव, आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियमांतर्गत नोंदणी आवश्यक.
    • सिस्टर इनचार्ज / नाईट सुपरवाइजर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची H.S.C. विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल जनरल नर्सिंग व मिडवाईफ (GNM) या विषयाची पदविका, शासकीय/निमशासकीय/खाजगी रुग्णालयातील परिचारिका म्हणून किमान ७ वर्षाचा अनुभव, आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
    • सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN): H.S.C. विज्ञान परीक्षा उत्तीर्ण, जीएनएम (GNM) पदविका, पब्लिक हेल्थ नर्सिंग या विषयाचा शासनमान्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी, आणि असा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर परिचारिका म्हणून ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
    • प्रयोगशाळा तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञ: मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र, जीवशास्त्र व सुक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी, मान्यताप्राप्त संस्थेची डी.एम.एल.टी. (DMLT) परीक्षा उत्तीर्ण, आणि वैद्यकीय प्रयोगशाळेतील किमान ३ वर्षाचा अनुभव.
    • क्ष-किरण तंत्रज्ञ (X-Ray Technician): मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र या विषयासह विज्ञान शाखेची पदवी, शासन मान्यताप्राप्त संस्थेतून क्ष-किरण तंत्रज्ञ या विषयाचे प्रशिक्षण पूर्ण, आणि वैद्यकीय प्रयोगशाळेतील कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
    • नर्स / नर्स स्टाफ मिडवाईफ: १२ वी विज्ञान शाखा परीक्षा उत्तीर्ण, जनरल नर्सिंग व मिडवाईफ पदविका, शासकीय/निमशासकीय/खाजगी रुग्णालयातील परिचारिका म्हणून किमान ३ वर्षाचा अनुभव, आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
    • मिश्रक (Pharmacist): उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा (विज्ञान शाखा) उत्तीर्ण, औषध निर्माण शास्त्रातील पदविका (डि. फार्म.), औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर उमेदवारास प्राधान्य, आणि संबंधित कामाचा ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
    • ऑक्झलरी नर्स मिडवाईफ (ANM): माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण, शासन मान्यताप्राप्त संस्थेचा ए.एन.एम. (ANM) अभ्यासक्रम पूर्ण व त्यानंतर कामाचा ०२ वर्षाचा अनुभव, आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
    • शस्त्रक्रिया गृह सहाय्यक: विज्ञान शाखेतील जीवशास्त्र विषयासह १२ वी परीक्षा उत्तीर्ण, आणि शासकीय/निमशासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह सहाय्यक कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
    • कक्ष सेवक: इयत्ता ७ वी उत्तीर्ण, मराठी लिहिता, बोलता व वाचता येणे आवश्यक, आणि शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/मान्यवर ट्रस्टच्या रुग्णालयातील कामाचा ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
    • कक्षसेविका (महिला): इयत्ता ७ वी उत्तीर्ण, मराठी लिहिता, बोलता व वाचता येणे आवश्यक, आणि शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/मान्यवर ट्रस्टच्या रुग्णालयातील कामाचा ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
    • ड्रेसर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची (१० वी) परीक्षा उत्तीर्ण, आणि शासकीय/निमशासकीय रुग्णालयातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.

    Malegaon Mahanagar Palika Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

    मालेगाव महानगरपालिका भरती 2026 या भरतीसाठी मुलाखतीवेल लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत:

    • अर्ज संपूर्ण भरलेला असावा. ज्यामध्ये पदाचे नाव, उमेदवाराचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर (अनिवार्य), ईमेल आयडी अचूक असावे.
    • जन्मतारीख पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
    • एस.एस.सी. गुणपत्रिका, एच.एस.सी. गुणपत्रिका, संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता आणि उच्च शैक्षणिक अर्हतेची गुणपत्रिका, उत्तीर्ण वर्ष व टक्केवारी दर्शवणारे प्रमाणपत्र.
    • शासकीय आयटीआयचे प्रमाणपत्र, औषध निर्माण शास्त्राची पदविका/पदवी, किंवा इतर आवश्यक तांत्रिक पात्रता प्रमाणपत्रे.
    • अनुभव प्रमाणपत्र
    • पासपोर्ट साईज फोटो आणि सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षात प्रती असणे बंधनकारक आहे.
    पदाचे नावमानधन (प्रति महिना)
    वैद्यकशास्त्र तज्ञ (MD Medicine)₹ ६०,०००/-
    बधिरीकरण तज्ञ₹ ६०,०००/-
    बालरोग तज्ञ₹ ६०,०००/-
    विकृतीशास्त्र तज्ञ₹ ६०,०००/-
    स्त्रीरोग तज्ञ
    ₹ ८०,०००/-
    वैद्यकीय अधिकारी (MBBS)₹ ६०,०००/-
    वैद्यकीय अधिकारी (BAMS)₹ ३०,०००/-
    सिस्टर इनचार्ज / नाईट सुपरवाइजर₹ २०,०००/-
    सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN)
    ₹ २०,०००/-
    प्रयोगशाळा तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञ₹ १४,०००/-
    क्ष-किरण तंत्रज्ञ
    ₹ १४,०००/-
    नर्स / नर्स स्टाफ मिडवाईफ₹ २०,०००/-
    मिश्रक₹ १४,०००/-
    ऑक्झलरी नर्स मिडवाईफ (ANM)₹ १८,०००/-
    शस्त्रक्रिया गृह सहाय्यक₹ १३,०००/-
    कक्ष सेवक₹ ११,०००/-
    कक्षसेविका (महिला)₹ ११,०००/-
    ड्रेसर
    ₹ ११,०००/-

    Malegaon Mahanagar Palika Recruitment 2026 : मुलाखत – Interview

    मालेगाव महानगरपालिका भरती 2026 या भरतीसाठी असणारी मुलाखत खालील प्रमाणे आहे.

    • मुलाखतीचे ठिकाण: मनपा मुख्यालय, किल्ला समोर, मालेगाव.
    • वेळापत्रक व सत्र:
      • ​दिनांक ०७/०९/२०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ (पदे क्र. १ ते ८) आणि दुपारी ३ ते संध्याकाळी ५ (पदे क्र. ९ ते १२).
      • ​दिनांक ०८/०९/२०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ (पदे क्र. १३ ते १५) आणि दुपारी ३ ते संध्याकाळी ५ (पदे क्र. १६ ते १८).
    • उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची छानणी केल्यानंतर केवळ पात्र उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल, अपात्र उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
    • ​मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता (TA) किंवा इतर भत्ते दिले जाणार नाहीत.
    • ​सदर भरती प्रक्रियेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दबाव आणल्यास संबंधित उमेदवारास भरती प्रक्रध्यातून बाद केले जाईल.
    Official Websiteयेथे क्लिक करा
    Application formयेथे क्लिक करा
    Notification PDFयेथे क्लिक करा

    मालेगाव महानगरपालिका भरती 2026 – FAQ

    प्रश्न 1: मालेगाव महानगरपालिका भरती 2026 मध्ये किती जागा आहेत?
    उत्तर: मालेगाव महानगरपालिका भरती 2026 मध्ये एकूण 63 जागा आहेत.

    प्रश्न 2: मालेगाव महानगरपालिका भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांनी संबंधित पदासाठी दिलेली शैक्षणिक पात्रता अधिकृत जाहिरातीत तपासावी.

    प्रश्न 3: या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    उत्तर: पदानुसार वयोमर्यादा वेगळी असू शकते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयाची सवलत मिळू शकते.

    प्रश्न 4: मालेगाव महानगरपालिका भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
    उत्तर: उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.

    प्रश्न 5: भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
    उत्तर: पदानुसार निवड प्रक्रिया बदलू शकते. लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी, मुलाखत किंवा कागदपत्र पडताळणी यापैकी प्रक्रिया लागू होऊ शकते.

    प्रश्न 6: अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
    उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केली जाते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

    प्रश्न 7: या भरतीमध्ये कोणकोणती पदे आहेत?
    उत्तर: 63 पदांमध्ये कोणती पदे समाविष्ट आहेत, याची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत दिली जाते.

    प्रश्न 8: अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
    उत्तर: साधारणपणे शैक्षणिक प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), रहिवासी प्रमाणपत्र, फोटो व स्वाक्षरी आवश्यक असू शकतात.

    प्रश्न 9: मालेगाव महानगरपालिका भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
    उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात, पात्रता, अर्ज प्रक्रिया, शुल्क आणि महत्त्वाच्या तारखांसाठी मालेगाव महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

    प्रश्न 10: 63 जागांसाठी सर्व उमेदवार अर्ज करू शकतात का?
    उत्तर: नाही. प्रत्येक पदासाठी निश्चित केलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी पूर्ण करणारे उमेदवारच अर्ज करू शकतात.

    Malegaon Mahanagar Palika Recruitment 2026 feature image
    Malegaon Mahanagar Palika Recruitment 2026

    महत्वाची सूचना : मालेगाव महानगरपालिका भरती 2026 मधील पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क व महत्त्वाच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

    तुम्ही येथे “ग्रामीण डाक सेवक भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/gramin-dak-sevak-gds-recruitment/

    YouTube Channel Join Now

    Suyash Gochade

    नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

    Follow me on Instagram

    Leave a Comment

    error: Content is protected !!