MPKV Rahuri Bharti 2026: विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

MPKV Rahuri Bharti 2026: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी अर्थशास्त्र विभागामध्ये विविध पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे सीनियर रिसर्च फेलो, ज्युनियर रिसर्च फेलो, क्षेत्र सहाय्यक आणि कनिष्ठ लिपिक या पदांच्या एकूण 13 जागा भरल्या जाणार आहेत. ही पदे पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

रिक्त पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता

विद्यापीठाने जाहीर केलेल्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

  1. सीनियर रिसर्च फेलो (Field Supervisor)
    • एकूण पदे: 02
    • पात्रता: एम.एससी. (कृषी अर्थशास्त्र) आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक.
    • मानधन: 41,800 रुपये + एच.आर.ए. प्रति महिना
  2. ज्युनियर रिसर्च फेलो (Computer)
    • एकूण पदे: 01
    • पात्रता: बी.एससी. (कृषी/उद्यानविद्या/वनशास्त्र/एबीएम) आणि संगणकाचे ज्ञान.
    • मानधन: 35,400 रुपये + एच.आर.ए. प्रति महिना
  3. क्षेत्र सहाय्यक (Field Assistant)
    • एकूण पदे: 09
    • पात्रता: बी.एससी. (कृषी/उद्यानविद्या/वनशास्त्र/एबीएम) किंवा कृषी पदविका (Diploma in Agriculture) आणि संगणकाचे ज्ञान.
    • मानधन: 25,500 रुपये + एच.आर.ए. प्रति महिना
  4. कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)
    • एकूण पदे: 01
    • पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. सह संगणकाचे ज्ञान.
    • मानधन: 19,900 रुपये + एच.आर.ए. प्रति महिना

सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक :

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
ऑफलाइन अर्जयेथे क्लिक करा

भरतीचे वेळापत्रक (महत्त्वाच्या तारखा)

  • अर्ज करण्याची मुदत: 26 फेब्रूवारी 2026 ते 13 मार्च 2026 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
  • पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी जाहीर करणे: 20 मार्च 2026
  • हरकती नोंदवण्याचा कालावधी: 21 ते 23 मार्च 2026
  • अंतिम पात्र यादी प्रसिद्ध करणे: 25 मार्च 2026
  • मुलाखतीची संभाव्य तारीख: 30 मार्च 2026 (सकाळी 9:00 वाजता)

अर्ज प्रक्रिया आणि पत्ता

इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज विहित नमुन्यात भरून आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसह खालीलपैकी एका मार्गाने पाठवावा:

  • ई-मेल पत्ता: mhfompkv@gmail.com.
  • टपाल किंवा प्रत्यक्ष अर्ज सादर करण्याचा पत्ता: Field Officer (I), Comprehensive Scheme, Department of Agricultural Economics, MPKV, Rahuri, Pin – 413722

महत्त्वाच्या अटी व शर्ती

  • वयोमर्यादा: सर्वसाधारण उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे आहे, तर विद्यापीठातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा 65 वर्षांपर्यंत असेल.
  • निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता, अनुभव, प्रकाशन आणि विशेष योगदान (40 गुण) तसेच मुलाखत (60 गुण) या आधारावर केली जाईल.
  • कालावधी: ही नियुक्ती सुरुवातीला 6 महिन्यांच्या कालावधीसाठी असेल.
  • मुलाखतीचे ठिकाण: प्लेसमेंट सेल, संशोधन संचालनालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहिल्यानगर

उमेदवारांना अधिक माहितीसाठी आणि अर्जाचा नमुना मिळवण्यासाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.mpkv.ac.in) भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPKV Rahuri Bharti 2026
MPKV Rahuri Bharti 2026

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!