महाराष्ट्र लोकसेवा आयोग भारती (MPSC Group B and C Recruitment 2026) या आयोगाअंतर्गत प्रत्येक वर्षी घेतली जाणारी गट ‘ब’ आणि गट ‘क’ ही परीक्षा महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी सरकारी नोकरीचे महत्त्वाचे द्वार आहे. या परीक्षा द्वारे विविध पदांच्या नियुक्ती करण्यात येतात. 2026 च्या भरती प्रक्रियेमध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या नियोजित वेळापत्रक मिळाल्यामुळे उमेदवारांना आपल्या अभ्यासाची गती वाढवणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या स्पर्धेच्या काळात उमेदवारांनी आत्ताच अभ्यासाचे नियोजन लावले तर या पदामध्ये त्यांना यश मिळू शकते.
जर तुम्हाला या परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शन हवे असेल, तर तुम्ही योग्य आला आहात. या परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, पदांची नावे, या परीक्षेची निवड प्रक्रिया कशी होते?, अर्ज प्रक्रिया याची सर्व माहिती खाली लेखकांमध्ये दिली आहे.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती (MPSC Group B and C Recruitment 2026) या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दिली आहे.
- या भरती अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असणे अनिवार्य आहे.
- ज्या उमेदवारांना या भरतीचा अर्ज करायचा आहे आणि ते पदवीच्या शेवटच्या वर्षात आहेत, ते या भरतीसाठी पात्र ठरतात.
- या भरती मधील काही विशिष्ट पदांसाठी पदवी मध्ये संबंधित विषय असणे अनिवार्य असते.
- वयोमर्यादा (Age Limit)
- किमान = १८ – १९ वर्षे पदाच्या स्वरूपानुसार
- कमाल = ३८ = ४३ वर्षे – सरकारी नियमांनुसार यात सवलत मिळू शकते.
- उमेदवार भारताचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती (महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती (MPSC Group B and C Recruitment 2026) या भरतीसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत :
- पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)
- दहावी आणि बारावीचे गुणपत्रक
- पदवीधर असल्याचा पुरावा
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- पासपोर्ट साईज फोटो
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- जाती वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
- नॉन-क्रिमीलेयर (Non-Creamy Layer)
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS Certificate)
- दिव्यांग प्रमाणपत्र (असेल तर)
- माजी सैनिक प्रमाणपत्र (असेल तर)
- खेळाडू प्रमाणपत्र (असेल तर)
- नाव बदलल्याचा पुरावा (Gazette Notification)
निवड प्रक्रिया
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती (MPSC Group B and C Recruitment 2026) या भरतीची निवड प्रक्रिया उमेदवारांना माहीत असणे फायदेशीर ठरते.
पूर्व परीक्षा (Preliminary Examination)
- पूर्व परीक्षा ही उमेदवारांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी घेण्यात येते.
- या परीक्षेमध्ये Objective Multiple Choice (बहुपर्यायी) प्रश्न विचारले जातात.
- या पूर्व परीक्षेचे गुण अंतिम यादीत धरले जात नाहीत.
मुख्य परीक्षा (Main Examination)
- मुख्य परीक्षा हे पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी असते.
- या परीक्षेमध्ये विषयांची सखोल ज्ञान तपासण्यात येते. या मुख्य परीक्षेचे स्वरूप पदाच्या गरजेनुसार बदलू शकते.
- अंतिम निवड हे मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांवर अवलंबून असते.
शारीरिक चाचणी / मुलाखत (Physical Test / Interview)
- शारीरिक चाचणी पोलीस उपनिरीक्षक (PSI) यासारख्या पदांसाठी घेण्यात येते. यानंतर मुलाखत घेण्यात येते.
- इतर पदांसाठी काही तांत्रिक किंवा लिपिक पदासाठी फक्त मुख्य परीक्षा असते, काहींसाठी मुलाखत देखील असू शकते.
दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
- निवड प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्याचा आयोगाकडून उमेदवारांनी सादर केलेल्या शैक्षणिक आणि इतर प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येते.
- कागदपत्रे सर्व मूळ आणि अर्जातील माहिती जुळणे अनिवार्य असते यात कुठल्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
अंतिम गुणवत्ता यादी (Final Selection List)
- सर्व टप्पे पार पडल्यानंतर, आयोगाद्वारे अंतिम यादी जाहीर करण्यात येते. या नंतर संबंधित विभागामार्फत उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येते.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती (MPSC Group B and C Recruitment 2026) या भरतीचे अर्ज प्रक्रिया आहे पूर्णपणे ऑनलाइन केली जाते. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ही खालील प्रमाणे सविस्तर दिली आहे.
- सर्वप्रथम उमेदवारांना या भरतीच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी mpsconline.gov.in
- यानंतर मुख्य पानावर New Registration या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर तुमचा आधार नंबर, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून प्रोफाइल तयार करा.
- प्रोफाइल तयार केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
- त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती (नाव, जन्म दिनांक, आधार नंबर आणि पत्ता), शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती अचूक भरा.
- या नंतर तुमचा फोटो आणि स्वाक्षरी योग्य आकारामध्ये अपलोड करा.
- प्रोफाईल मध्ये लॉगिन केल्यानंतर Available Advertisements या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला ज्या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे ते गट निवडा (गट ‘ब’ किंवा ‘क’)
- निवडल्यानंतर जाहिरातीनुसार माहिती पुन्हा एकदा तपासा आणि अर्जाची शुल्क ऑनलाइन द्वारे भरा.
- सर्व माहिती योग्य असला सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवा.
टिप : अर्ज मध्ये माहिती भरल्यानंतर पुन्हा दुरुस्त करण्यात येत नाही यामुळे अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या. माहिती चुकीची आढळल्यास अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही.
पदे आणि कामे
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती (MPSC Group B and C Recruitment 2026) :-
गट ‘ब’ (Group B)
- पोलीस उपनिरीक्षक (PSI): सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांची तपासणी करणे, एफआयआर नोंदवून घेणे आणि पोलीस ठाण्याचे दररोजचे कामकाज पाहणे.
- राज्य कर निरीक्षक (STI): कर चूकवेगिरी शोधणे, कर संकलन करणे, जीएसटी आणि इतर कर विभागांशी संबंधित लेखी परीक्षण करणे.
- सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO): मंत्रालय स्तरावर प्रशासकीय फाईल तपासणे, सरकारी धोरणांची मसुदा तयार करणे आणि मंत्रालयीन विभागाचे समन्वय साधणे सहाय्यक कक्ष अधिकारी यांचे काम असते.
गट ‘क’ (Group C)
- दुय्यम निरीक्षक : रंजू उत्पादन शुल्क विभागाचे नियमाची अंमलबजावणी करणे, उत्पन्नावर देखरेख ठेवणे आणि मध्ये विक्री वर देखरेक ठेवणे, बेकायदेशीर मद्यविक्री रोखण्यासाठी धाडी टाकणे.
- कर सहाय्यक (Tax Assistant): कर विभागाच्या डेटा एंट्री, कर निर्धारण वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यकते नुसार मदत करणे.
- लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist): कार्यालयामधील पत्रव्यवहार, फाइल्सचे व्यवस्थापन करणे, डेटा एन्ट्री, टायपिंग आणि प्रशासकीय मदत करणे.
- तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant): संबंधित तांत्रिक विभागाच्या तांत्रिक माहितीचे संकलन करणे, अहवाल तयार करणे.

Disclaimer : या लेखामध्ये दिलेली भरतीविषयक माहिती विविध अधिकृत स्त्रोतांवर आधारित आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित भरतीची अधिकृत जाहिरात (Notification) काळजीपूर्वक वाचावी. या महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती (MPSC Group B and C Recruitment 2026) पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया किंवा इतर कोणत्याही बाबतीत बदल झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागाची राहील. आम्ही केवळ माहिती पुरविण्याचे कार्य करीत आहोत. अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
तुम्ही येथे “डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/pdkv-akola-bharati-2026/