महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती (MPSC Group-C Recruitment 2026) पदवी झालेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती (MPSC Group-C Recruitment 2026) या भरती मध्ये अंतर्गत एकूण २,६१९ रिक्त पदासाठी निघाली आहे. जे तरुण सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत होते त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेत मार्फत लिपिक टंकलेखन, दुय्यम निरीक्षण, कर सहाय्यक आणि तांत्रिक साहाय्यक अशा विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या भरतीची अधिसूचना, निवड प्रक्रिया आणि अर्ज प्रक्रिया किंवा परीक्षेचे स्वरूप उमेदवारांनी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या स्पर्धेच्या काळामध्ये यश मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे, यामुळे या परीक्षेच्या तयारीला आत्ताच लागा आणि या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन आणि निवड प्रक्रिया त्याची संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये दिली आहे.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती (MPSC Group-C Recruitment 2026) या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे असेल तरच ते पात्र ठरू शकता.

  • सर्व पदांसाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
  • लिपिक टंकलेखन पदासाठी : पदवी उत्तीर्ण असणे सोबतच टायपिंग प्रमाणपत्र (मराठी: ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी: ४० श.प्र.मि.) असणे अनिवार्य आहे.
  • कर सहाय्यक (Tax Assistant) पदासाठी : या पदासाठी पदवी सोबतच मराठी किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग ताशी ३० शब्द असणे अनिवार्य आहे.
  • सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पदासाठी : मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा पदविका असणे अनिवार्य आहे.
  • उद्योग निरीक्षण (Industry Inspector) : पदवी किंवा पदवीका विज्ञान शाखेमध्ये पदवी असणे अनिवार्य आहे (काही विशिष्ट पदांसाठी)

नियम

  • उमेदवार हा साधारणपणे १८ ते ३८ वर्षे या वयोगटातील असावा.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे.
  • उमेदवाराला मराठी भाषा वाचता लिहिता आणि बोलता येणे अनिवार्य असते.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती (MPSC Group-C Recruitment 2026) या भरतीचा अर्ज भरण्यासाठी उमेदवाराकडे खालील दिलेल्या आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
  • दहावीचे गुणपत्रक/प्रमाणपत्र
  • पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)
  • टायपिंग प्रमाणपत्र
  • पदवी/पदविका (AMVI साठी)
  • जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer)
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • ​फोटो आणि स्वाक्षरी
  • डोमिसिल प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र

वेतन

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती (MPSC Group-C Recruitment 2026) या भरतीतील पदांसाठी वेतन अंदाजे खालील प्रमाणे दिले आहे.

पदाचे नाववेतनश्रेणी (Pay Scale)
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक38,600 – 1,22,800
उद्योग निरीक्षक35,400 – 1,12,400
तांत्रिक साहाय्यक29,200 – 92,300
कर साहाय्यक25,500 – 81,100
लिपिक-टंकलेखक19,900 – 63,200

अभ्यासक्रम (Syllabus)

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती (MPSC Group-C Recruitment 2026) या भरतीच्या परीक्षेसाठी अभ्यासक्रम हा खालील प्रमाणे पाहू शकता:

पूर्वपरीक्षा

  • चालू घडामोडी (Current Affairs): जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी, महाराष्ट्राच्या संदर्भातील विशेष घडामोडी.
  • नागरिकशास्त्र (Political Science) : भारताची राज्यघटना, राजकीय व्यवस्था, प्रशासन आणि केंद्र-राज्य संबंध आणि स्थानिक स्वराज्य संस्था
  • इतिहास (History) : आधुनिक भारताचा इतिहास
  • भूगोल (Geography) : महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक), हवामान, नद्या, उद्योग, शेती आणि लोकसंख्या
  • अर्थव्यवस्था (Economics) : भारतीय अर्थव्यवस्था (राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य आणि बेरोजगारी), शासकीय अर्थसंकल्प, लेखा व लेखापरीक्षण
  • सामान्य विज्ञान (General Science) : भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणीशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany) आणि आरोग्यशास्त्र (Hygiene)
  • अंकगणित व बुद्धिमत्ता (Arithmetic & Reasoning) : अंकगणित: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी आणि बुद्धिमापन चाचणी: तार्किक विचार, वेगाची आणि अचूकतेची चाचणी

परीक्षा स्वरूप :
एकूण प्रश्न 100 असतात
एकूण गुण 100 असतात
वेळ एक तास
या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते प्रतीक चुकीच्या उत्तरासाठी १/४ (०.२५) गुण कापला केला जातो. परीक्षा हे मराठ्याने इंग्रजी दोन्ही भाषा मध्ये असते

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती (MPSC Group-C Recruitment 2026) या भरतीचा अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

  • सर्वप्रथम तुम्ही या mpsconline.gov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
  • यानंतर New User Registration या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर आणि पॅन कार्ड नंबर चा वापर करून प्रोफाइल तयार करा.
  • नंतर तुमची वैयक्तिक माहिती नाव, जन्मतारीख आणि पत्ता, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक ती माहिती अचूक भरा.
  • त्यानंतर नमूद केलेली सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • यानंतर तुमची प्रोफाइल तयार होईल प्रोफाइल तयार झाल्यानंतर डॅशबोर्ड वर जा.
  • चालू असलेला भरती प्रक्रियेचा यादीतून संबंधित जाहिरात निवडा आणि Apply बटनवर क्लिक करा
  • यानंतर तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद निवडा.
  • तुम्ही त्या पदासाठी पात्र आहात का याची खात्री करा आणि सर्व माहिती अचूक भरली आहे याची खात्री करा.
  • माहिती पाहून झाल्यानंतर अर्जाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट करा.
  • अर्ज सबमिट करून झाल्यानंतर अर्जाची प्रत काढून घ्या.
MPSC Group-C Recruitment 2026 feature image
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती (MPSC Group-C Recruitment 2026)

तुम्ही येथे “स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2026” याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/sbi-recruitment-2026-2/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!