National Insurance Company Recruitment 2026: सरकारी संस्थेत कामाचा अनुभव मिळवू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) अंतर्गत 200 पदवीधर अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे, या प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा ₹15,000 स्टायपेंड दिले जाणार आहे.
भरतीचा थोडक्यात तपशील
- भरती संस्था: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL)
- एकूण जागा: 200
- पदाचे नाव: ग्रॅज्युएट अप्रेंटिस
- प्रशिक्षणाचा कालावधी: 12 महिने
- स्टायपेंड: दरमहा ₹15,000
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील नियमित पूर्णवेळ पदवी
- वयोमर्यादा: 21 ते 30 वर्षे
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 4 नोव्हेंबर 2026
- अर्जाची शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2026

शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील नियमित पूर्णवेळ पदवी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराकडे 1 एप्रिल 2026 रोजी पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
NATS पोर्टलवर 100 टक्के पूर्ण प्रोफाइल असलेल्या उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे. यापूर्वी कोणत्याही संस्थेत अप्रेंटिसशिप प्रशिक्षण घेतलेले किंवा सध्या प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार पात्र ठरणार नाहीत. पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेले तसेच 1 एप्रिल 2026 रोजी सरकारी, सरकारी उपक्रम किंवा खासगी संस्थेत एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कामाचा अनुभव असलेले उमेदवारही या भरतीसाठी पात्र नाहीत.
वयोमर्यादा किती आहे?
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2026 रोजी किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे.
SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, OBC नॉन-क्रीमी लेयर उमेदवारांना 3 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू आहे. अर्ज करण्यापूर्वी संबंधित प्रवर्गासाठी लागू असलेली वयोमर्यादा तपासावी.
महाराष्ट्रात किती जागा आहेत?
या भरतीमध्ये महाराष्ट्रासाठी एकूण 10 अप्रेंटिस जागा देण्यात आल्या आहेत. उमेदवारांना केवळ एका राज्यासाठी अर्ज करता येणार आहे. निवड झाल्यानंतर संबंधित राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात नियुक्ती देण्याचा अधिकार कंपनीकडे राहणार आहे.
स्टायपेंड किती मिळणार?
निवड झालेल्या उमेदवारांना 12 महिन्यांच्या अप्रेंटिसशिप प्रशिक्षणादरम्यान दरमहा ₹15,000 स्टायपेंड दिले जाणार आहे. यामध्ये कंपनीकडून ₹8,850 आणि केंद्र सरकारच्या वाट्याचे ₹6,150 उमेदवाराच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.
ही अप्रेंटिसशिप आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीकडून नियमित नोकरी देण्याची हमी किंवा बंधन नाही.
निवड प्रक्रिया कशी असेल?
या भरतीसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग पदवी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे केली जाणार आहे. गुणांची टक्केवारी समान असल्यास वयाने मोठ्या उमेदवाराला गुणवत्ता यादीत प्राधान्य दिले जाईल.
शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे कळवले जाईल. त्यानंतर संबंधित कार्यालयात मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. केवळ कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले म्हणजे निवड निश्चित झाली असे समजायचे नाही.
महत्त्वाच्या लिंक्स
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज कसा आणि कुठे करायचा?
या भरतीसाठी NATS पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. आधीपासून NATS पोर्टलवर नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉगिन करून “Apply against advertised vacancies” या विभागात “NATIONAL INSURANCE COMPANY LTD” शोधून अर्ज करावा.
नवीन उमेदवारांनी प्रथम NATS पोर्टलवर विद्यार्थी म्हणून नोंदणी करून आपला एनरोलमेंट क्रमांक मिळवावा. त्यानंतर संबंधित भरतीसाठी अर्ज सादर करता येईल.
अर्जासाठी अधिकृत पोर्टल: https://nats.education.gov.in/index.php
अर्जाची शेवटची तारीख
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज पूर्ण करावा.
महत्त्वाची सूचना
या भरतीमध्ये पदवी, वय, NATS प्रोफाइल आणि अनुभवासंबंधी अटी लागू आहेत. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रतेची खात्री करून घ्या. अप्रेंटिसशिप प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नियमित नोकरीची हमी नाही.
अशाच सरकारी भरतींची माहिती, पात्रता, अर्जाच्या तारखा आणि नवीन जाहिरातींसाठी www.totalnaukri.com ला भेट देत राहा.