NHM Maharashtra Community Health Officer Recruitment 2025 : महाराष्ट्रात राहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मार्फत एक मोठी संधी आली आहे. समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) या पदासाठी तब्बल 1974 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असली तरी काम, पगार, प्रशिक्षण आणि भविष्यातील उपयोग पाहता ही एक चांगली संधी आहे.
ही भरती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची ऑफलाइन फॉर्म, पोस्ट, हातोहात अर्ज – काहीही चालणार नाही. संपूर्ण माहिती NHM च्या अधिकृत साइटवर उपलब्ध आहे.
या भरतीत नेमके काय आहे?
समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) हा पद आरोग्य खात्याखालील उपकेंद्रावर असतो. गावात सर्वसामान्य लोकांना मूलभूत आरोग्य सेवा, तपासणी, रोगनियंत्रण, मातृ–बाल आरोग्य, डेंग्यू–मलेरिया नियंत्रण, पोषण, कुटुंब नियोजन अशा अनेक कामांसाठी हा अधिकारी महत्त्वाचा असतो.
ही नोकरी म्हणजे सरकारी आरोग्य व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग असून CHO हा प्राथमिक आरोग्य केंद्राचे हात आणि पाय समजला जातो.
एकूण जागा – 1974
या भरतीमध्ये 1974 जागा विविध आरक्षण प्रवर्गानुसार विभागल्या आहेत. SC, ST, OBC, EWS, Open अशा सर्व प्रवर्गांना यातून संधी मिळणार आहे.
यामध्ये महिला आरक्षण, माजी सैनिक, खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त, इत्यादी समांतर आरक्षण सुद्धा लागू आहे.
शैक्षणिक पात्रता (Qualification)
या पदासाठी खालीलपैकी कोणतीही पात्रता चालते:
- BAMS (आयुर्वेदिक वैद्यक आणि शस्त्रक्रिया)
- BUMS (युनानी वैद्यक)
- B.Sc Nursing
- B.Sc Community Health
- BAMS/BUMS उमेदवारांकडे इंटर्नशिप पूर्ण असणे आवश्यक.
- Nursing उमेदवारांकडे ववैध नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate) असणे गरजेचे.
सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक :
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा (Age Limit)
- सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
- आरक्षित प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे
- दिव्यांग: 18 ते 45 वर्षे
- माजी सैनिक: नोकरीनंतर + 3 वर्ष सवलत
- अनाथ: वयोमर्यादा 43 वर्षे
- वयाची गणना अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार केली जाईल.
अर्ज प्रक्रिया (How to Apply?)
ही भरती पूर्णपणे ऑनलाईन आहे.
- सर्वप्रथम अधिकृत साइटला भेट द्या.
- जाहीरात नीट वाचा
- तुमचा प्रोफाइल तयार करा (Registration)
- फोटो, सही, प्रमाणपत्रे अपलोड करा
- फॉर्म भरा
- परीक्षा शुल्क भरा
- सबमिट करा आणि पावती जतन करा
परीक्षा शुल्क (Application Fee)
- OPEN (सर्वसाधारण): ₹1000
- आरक्षित व अनाथ: ₹900
- माजी सैनिकांना शुल्क नाही
- फीस फक्त ऑनलाईन भरावी लागणार आहे.
परीक्षा पद्धत (Exam Pattern)
- CHO भरतीची परीक्षा ऑनलाईन CBT पद्धतीने होणार आहे.
- एकूण प्रश्न: 100
- प्रत्येक प्रश्न 1 गुण – नेगेटिव्ह मार्किंग नाही.
- विषयानुसार वाटप :
- Public Health, Maternal Health, Child Health, NCD, CD, Nutrition, Mental Health, Skills – 60 Marks
- General Knowledge – 20 Marks
- NHM Programme Related – 20 Marks
- एकूण वेळ: 120 मिनिटे
- उत्तीर्णता (Passing): किमान 45 गुण आवश्यक
प्रशिक्षण (Bridge Course Training)
- परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 6 महिन्यांचे Certificate Training दिले जाईल.
- Training दरम्यान ₹10,000 स्टायपेंड
- Training नंतर Exit Exam
- Exit Exam उत्तीर्ण झाल्यानंतरच CHO म्हणून नियुक्ती
- Exit Exam दोनदा देता येतो
नोकरीचा प्रकार (Job Type)
- ही नोकरी कायम सरकारी नाही.
- ही कॉन्ट्रॅक्ट आधारित (Contractual) आहे.
- CHO हा NHM Maharashtra अंतर्गत नियुक्त होतो.
पगार (Salary / Honorarium)
- प्रशिक्षण दरम्यान: ₹10,000 / महिना
- नियुक्तीनंतर:
- ₹25,000 महिना (स्थिर वेतन)
- ₹15,000 कामावर आधारित परफॉर्मन्स इंसेंटिव्ह
- एकूण ₹40,000 पर्यंत मिळू शकते.
महत्वाच्या सूचना
- फॉर्ममध्ये चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द होईल
- बनावट कागदपत्र स्वीकारले जाणार नाहीत
- परीक्षा केंद्र बदलता येणार नाही
- फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर संपादन नाही
- सर्व अपडेट्स फक्त वेबसाइटवर – कुठेही वेगळं कळणार नाही
ही नोकरी कोणांसाठी योग्य?
ही नोकरी त्या उमेदवारांसाठी आहे ज्यांना:
- गावात/उपकेंद्रावर काम करण्याची तयारी आहे
- लोकांशी बोलणे, आरोग्य मार्गदर्शन करणे जमते
- क्षेत्रभेट, तपासणी, गर्भवती-मातांच्या भेटी, पोषण कामे करता येतात
- आरोग्य क्षेत्रात कॅरिअर करायचे आहे
अंतिम निष्कर्ष
NHM महाराष्ट्र CHO भरती 2025 ही आरोग्य क्षेत्रातील एक उत्कृष्ट संधी आहे. योग्य शैक्षणिक पात्रता, योग्य वय, आणि गावागावात आरोग्य सेवा करण्याची इच्छा असेल तर ही नोकरी नक्कीच फायदेशीर आहे.
कामाचा अनुभव, पगार, सरकारी आरोग्य विभागाशी जोडणं, भविष्यातील संधी – सर्व काही चांगले आहे.
