RRC CR Apprentice Bharti 2025 : रेल्वे भरती सेल, मध्य रेल्वे (RRC CR) यांनी अप्रेंटिस पदभरती २०२५ साठी मोठी अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण २४१८ रिक्त पदे भरली जाणार असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.
पदांची माहिती :
ही भरती मध्य रेल्वेच्या विविध वर्कशॉप्स/युनिट्समध्ये होणार असून खालील ट्रेड्ससाठी अप्रेंटिसची निवड केली जाणार आहे :
- फिटर
- वेल्डर
- इलेक्ट्रिशियन
- मशीनिस्ट
- कारपेंटर
- पेंटर
- मेकॅनिक (डिझेल / मोटार व्हेईकल)
- टर्नर
- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
- कम्प्युटर ऑपरेटर & प्रोग्रॅमिंग असिस्टंट (COPA)
- इतर संबंधित ट्रेड्स
- एकूण २४१८ जागा विविध क्लस्टरप्रमाणे (मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर) विभागल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवाराने १०वी उत्तीर्ण (किमान ५०% गुणांसह) असणे आवश्यक.
- त्यासोबत ITI (एनसीव्हीटी / एससीव्हीटी मान्यताप्राप्त) प्रमाणपत्र असणे बंधनकारक.
- इंजिनिअरिंग पदवीधर व डिप्लोमा धारक अर्ज करण्यास पात्र नाहीत.
वयोमर्यादा (१२ ऑगस्ट २०२५ रोजीपर्यंत) :
- किमान वय : १५ वर्षे
- कमाल वय : २४ वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी सवलत :
- SC/ST : ५ वर्षे
- OBC : ३ वर्षे
- PwBD : १० वर्षे
अधिकृत संकेतस्थळ, सविस्तर जाहिरात व अर्ज :
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्ज | येथे क्लिक करा |
महत्वाच्या तारखा :
- अर्ज सुरू होण्याची तारीख : १२ ऑगस्ट २०२५
- अर्जाची अंतिम तारीख : ११ सप्टेंबर २०२५ (सायं. ५:०० वाजेपर्यंत)
निवड प्रक्रिया :
- उमेदवारांची निवड गुणांच्या टक्केवारीवर आधारित मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे.
- १०वी + ITI या दोन्ही परीक्षांतील सरासरी गुणांवर मेरिट तयार होईल.
- एकसमान गुण आल्यास जेष्ठ उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
अर्ज शुल्क :
- सामान्य / OBC : ₹१००/-
- SC / ST / महिला / PwBD : शुल्क माफ
स्टायपेंड व प्रशिक्षण :
- प्रशिक्षण कालावधी : १ वर्ष
- मासिक स्टायपेंड : अंदाजे ₹७०००/-
अर्ज कसा करावा?
- इच्छुक उमेदवारांनी केवळ ऑनलाईन अर्जच करावा.
- अधिकृत संकेतस्थळ जावे.
- अर्ज करताना आधार क्रमांक, मोबाईल व ईमेल सक्रिय ठेवणे बंधनकारक आहे.
- सर्व आवश्यक कागदपत्रे (SSC मार्कशीट, ITI प्रमाणपत्र, जातीचा दाखला, इ.) स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
महत्वाची सूचना :
- निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वेत नोकरीची हमी मिळणार नाही. फक्त प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे.
- चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होईल.
- अंतिम तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
