अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती 2026 (SSSB Recruitment 2026) सरकारी नोकरीची मोठी संधी! १९७९ जागांसाठी भरती| Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती 2026 (SSSB Recruitment 2026) अंतर्गत विविध विभागांमध्ये गट ‘ब’ (अराजपत्रित) आणि गट ‘क’ (वर्ग-३) या पदासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी चालून आली आहे. सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये तरुण सरकारी नोकरीची तयारी करत आहेत, या स्पर्धेच्या काळात यश मिळवण्यासाठी सरकारी क्षेत्रातील स्थिर करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठा यामुळे या भरतीकडे तरुणांचा मोठा ओढा आहे. या मंडळा अंतर्गत तंत्रज्ञान, प्रशासन, शिक्षण आणि लिपिक सेवा या वैविध्यपूर्ण क्षेत्रात संध्या उपलब्ध झाल्या आहेत.

सरकारी नोकरी पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची संधी! जर तुम्हाला यापदासाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्र, अर्ज प्रक्रिया, अंदाजे वेतन, पदांची नावे आणि निवड प्रक्रिया याची सर्व सविस्तर माहिती खालील लेखांमध्ये दिली आहे.

शैक्षाणिक पात्रता (Educational Qualification)

अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती 2026 (SSSB Recruitment 2026) या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहेत:

  • शिक्षक पदे : संबंधित विषयातील पदवी अन्न शिक्षणशास्त्रातील पदवी असणे अनिवार्य आहे.
  • लिपिक पदासाठी : किमान 12वी उत्तीर्ण
  • कौशल्य : टायपिंग चा वेग (इंग्रजी ३०-४०, मराठी ३०)
  • तांत्रिक पदासाठी : संबंधित शाखेतील डिप्लोमा किंवा पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. काही पदांसाठी कामाचा अनुभव फायदेशीर ठरू शकते
  • वैज्ञानिक पदे : विज्ञान शाखेतील पदवी किंवा संबंधित विषयातील मास्तर डिग्री असणे अनिवार्य.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती 2026 (SSSB Recruitment 2026) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालील दिलेली कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

  • ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड
  • जन्म दाखला / १० वीचे प्रमाणपत्र
  • ​पासपोर्ट आकाराचे अलीकडील फोटो
  • स्वाक्षरी (Signature)
  • दहावी आणि बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • पदवी (Graduation/Diploma) गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्र
  • शिक्षण शास्त्रातील पदवी (B.Ed./D.El.Ed.)
  • CTET प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • नॉन-क्रिमी लेयर (Non-Creamy Layer)
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS Certificate)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (PwD Certificate)
  • अनुभवाचे प्रमाणपत्र (Experience Certificate)
  • नाव बदलल्याचे प्रमाणपत्र (लग्नानंतर नाव बदललेले असल्यास)
  • अर्जाची प्रिंटआउट

कामे :-

अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती 2026 (SSSB Recruitment 2026) पदाचे काम खालील प्रमाणे दिले आहे.

  • शिक्षक पदे : अध्यापन करणे, मूल्यमापन करणे आणि प्रशासकीय शाळेचे व्यवस्थापनाच्या बैठकांना उपस्थित राहणे.
  • लिपिकीय पदे : कार्यालयीन कामे पाहणे, रेकॉर्ड कीपिंग करणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सूचनांचे पालन करणे.
  • तांत्रिक पदे (Technical Posts – JE/IT Assistant) : सरकारी यंत्रणा संगणक प्रणाली किंवा पायाभूत सुविधा कामकाज पाहणे, ​अहवाल आणि समस्या निवारण करणे.
  • वैज्ञानिक पदे (Scientific Posts) : प्रयोगशाळा आणि डेटा विश्लेषण करणे.
  • वेळ सामान्यता सकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:30

वेतन

अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती 2026 (SSSB Recruitment 2026) तुझ्या भरती अंतर्गत विविध पदांसाठी मिळणारे वेतन हे खालील प्रमाणे अंदाजे दिले आहे.

पदाचे नावपे लेव्हलमूळ वेतन श्रेणी
सहाय्यक विभाग अधिकारी४४,९०० – १,४२,४००
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक४४,९०० – १,४२,४००
विशेष शिक्षक३५,४०० – १,१२,४००
कनिष्ठ अभियंता३५,४०० – १,१२,४००
स्टेनो२५,५०० – ८१,१००
कनिष्ठ लिपिक / सहाय्यक१९,९०० – ६३,२००

पदाची यादी

  • शिक्षण विभाग : PGT (Post Graduate Teacher), TGT (Trained Graduate Teacher), Special Educator आणि Drawing Teacher
  • लिपिकीय आणि प्रशासकीय विभाग (Clerical & Administrative) : Junior Assistant (JA) कनिष्ठ सहाय्यक, Lower Division Clerk (LDC): कनिष्ठ लिपिक, Assistant Section Officer (ASO): सहाय्यक विभाग अधिकारी, Stenographer: लघुलेखक (हिंदी/इंग्रजी)
  • तांत्रिक आणि अभियांत्रिकी विभाग (Technical & Engineering) : Junior Engineer (JE – Civil/Electrical/Mechanical): कनिष्ठ अभियंता, Section Officer (Civil/Electrical): विभाग अधिकारी, IT Assistant: आयटी सहाय्यक, Technical Assistant: तांत्रिक सहाय्यक.
  • वैज्ञानिक आणि इतर पदे (Scientific & Misc.) : Junior Scientific Assistant (JSA): वैज्ञानिक सहाय्यक, Legal Assistant: कायदेशीर सहाय्यक, Laboratory Attendant: प्रयोगशाळा परिचर, Pharmacist: औषध निर्माता.

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती 2026 (SSSB Recruitment 2026) या योजनेचे अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन आहे. याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

  • सर्वप्रथम या भरतीच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या dsssbonline.nic.in
  • Click for New Registration हा पर्याय निवडा.
  • यानंतर वैयक्तिक माहिती भरा नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर, जन्मतारीख, दहावीच्या रोल नंबर आणि ईमेल आयडी त्यानंतर नोंदणी करून घ्या
  • नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळून जाईल.
  • पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर चा वापर करून लॉगिन करून घ्या
  • तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद निवडा.
  • तुमची झालेली शैक्षणिक माहिती आणि अनुभव सर्व माहिती अचूक भरा.
  • तुमचा पासवर्ड साइज फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून योग्य साईजमध्ये अपलोड करून द्या.
  • अर्जाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या.
  • संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सर्व माहिती एकदा तपासा आणि सबमिट करा.
  • अर्जाची अंतिम प्रत काढून घ्या.

टीप : या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी योजनेची अधिकृत जाहिरात वाचा पात्रता, आवश्यक कागदपत्र आणि नियम व अटी त्याची खात्री करून घ्या नंतर फॉर्म भरा.

SSSB Recruitment 2026 feature image
अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती 2026 (SSSB Recruitment 2026)

महत्वाची सूचना (Disclaimer) : या लेखांमध्ये दिलेली माहिती विविध बातम्या, अधिकृत स्रोत याच्या आधारे लिहिली आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवरील जाहिरात पहावी. कागदपत्रे व पात्रता नियम व अटी यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो. या माहितीमुळे होणाऱ्या नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्कृत विविध पदांसाठी भरती 2026 “या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/aiims-cre-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!