Tourism & Cultural Affairs Department Advocate Bharti 2025 | महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग वकील भरती २०२५

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Tourism & Cultural Affairs Department Advocate Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मंत्रालय (मुंबई) येथे वकील पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीअंतर्गत विभागाच्या न्यायालयीन प्रकरणे हाताळण्यासाठी पॅनलवरील दोन विधिज्ञ (वकील) नेमण्यात येणार आहेत.

सदर पदासाठी पात्र आणि अनुभवी उमेदवारांकडून 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ही भरती कंत्राट पद्धतीने (Contract Basis) करण्यात येणार असून उमेदवारांना मान्य दराप्रमाणे फी देण्यात येईल.

विभागाचे नाव

  • पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन

पत्ता :

  • मंत्रालय (मुख्य इमारत), तळमजला, अभिलेख कक्ष क्र. 22, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई – 400032
  • दूरध्वनी क्र.: 022-22025608
  • ईमेल आयडी : tca-est@mah.gov.in

पदाचे नाव

  • वकील (Advocate) – पॅनलवरील नेमणूक

Tourism & Cultural Affairs Department Advocate Bharti 2025 पदासाठी आवश्यक अर्हता

  • शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी (LL.B.) आवश्यक
  • वयोमर्यादा किमान वय: 35 वर्षे, कमाल वय: 62 वर्षे
  • अनुभव सनद मिळाल्यानंतर किमान 10 वर्षांचा प्रत्यक्ष कायदेशीर अनुभव आवश्यक
  • प्राधान्य मा. सर्वोच्च न्यायालय, मा. उच्च न्यायालय, मा. दिवाणी वा फौजदारी न्यायालयात शासकीय प्रकरणे हाताळण्याचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य

फी दर (Fee Structure)

  • कायदेविषयक लेखी अभिप्राय ₹2500/-
  • याचिकेचा मसुदा (Written Statement) ₹7500/-
  • लिखीत जबाब तयार करणे ₹7500/-
  • प्रतिज्ञापत्र लेखन ₹7500/-
  • संकिर्ण (Per Case) ₹2000/-
  • कॅव्हेट फाईल करणे ₹2000/-
  • कायदे विषयक बैठक भत्ता ₹1000/-

सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक :

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
ऑफलाइन अर्जयेथे क्लिक करा

अटी व शर्ती

  • निवड झालेल्या विधिज्ञाची पॅनलवर नियुक्ती झालेल्या दिनांकापासून वरील फी दर लागू होतील.
  • न्यायालयीन प्रकरणांमध्ये विभागाच्या बाजूने योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
  • आवश्यकतेनुसार विभागास लेखी कायदेशीर सल्ला देणे आणि क्षेत्रीय कार्यालयांना मदत करणे आवश्यक.
  • कामाचा अहवाल तपासून प्रमाणित झाल्यानंतरच फी अदा केली जाईल.
  • नेमणूक प्रथम 1 वर्षासाठी राहील. काम समाधानकारक असल्यास मुदतवाढ दिली जाऊ शकते.
  • कोणतीही पूर्वसूचना न देता अर्ज स्वीकारणे/नाकारणे/रद्द करणे याबाबतचा सर्व अधिकार मा. सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडे राहील.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  1. विधी शाखेची पदवी / पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र
  2. बार कौन्सिल सनदची प्रत
  3. सर्वोच्च / उच्च / दिवाणी / फौजदारी न्यायालयातील शासकीय प्रकरणांचे विवरणपत्र
  4. वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा समकक्ष प्रमाणपत्र)
  5. पॅनकार्डची प्रत
  6. आधारकार्डची प्रत

अर्ज कसा करावा?

  • अर्ज विहित नमुन्यात भरून पोस्टाने किंवा प्रत्यक्ष सादर करावा.
  • अर्जाचे ठिकाण :
    • उप सचिव (आस्थापना), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई – 400032
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 30 ऑक्टोबर 2025 (सायं. 5.00 वाजेपर्यंत)
  • अर्ज बंद लिफाफ्यात पाठवावा.

महत्वाच्या तारखा

  • जाहिरात प्रसिद्धी दिनांक 06 सप्टेंबर 2025
  • अर्जाची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2025
  • अर्ज सादरीकरण पद्धत पोस्टाने / प्रत्यक्ष मंत्रालयात

महत्त्वाचे मुद्दे

  • ही भरती थेट मुलाखतीशिवाय पॅनल नेमणूक स्वरूपात होणार आहे.
  • पात्रता व अनुभवाच्या आधारे निवड केली जाणार आहे.
  • विभागाला न्यायालयीन सहाय्य देणे, सल्ला देणे आणि कायदेशीर कामे हाताळणे ही प्रमुख जबाबदारी राहील.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाविषयी थोडक्यात

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण विभाग असून, राज्यातील पर्यटन विकास, सांस्कृतिक संवर्धन, कला उपक्रम आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याची जबाबदारी या विभागावर आहे. या विभागाच्या अधीन ९ क्षेत्रीय कार्यालये कार्यरत आहेत ज्यांच्या न्यायालयीन प्रकरणांसाठी या पॅनलवरील वकीलांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

निष्कर्ष

महाराष्ट्र शासनाच्या या भरतीद्वारे अनुभवी वकीलांना शासकीय पातळीवर काम करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. ज्यांना न्यायालयीन प्रकरणे हाताळण्याचा अनुभव आहे, त्यांनी 30 ऑक्टोबर 2025 पूर्वी अर्ज नक्की सादर करावा.

  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2025
  • ठिकाण: मंत्रालय, मुंबई
  • ईमेल: tca-est@mah.gov.in
Tourism & Cultural Affairs Department Advocate Bharti 2025
Tourism & Cultural Affairs Department Advocate Bharti 2025

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!