Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Bharti 2025
Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Bharti 2025 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी मार्फत “पहारेकरी व मजूर” या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 369 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केवळ ऑफलाइन पद्धतीनेच मागवण्यात येत आहेत. विशेषतः, ही अधिकृत जाहिरात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी मार्फतच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक 02 जुलै 2025 पासून होत आहे, तर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 01 ऑगस्ट 2025 आहे.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ घालवता लवकरात लवकर अर्ज करावा. या भरतीची सविस्तर अधिकृत जाहिरात आणि ऑफलाईन अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करणे आवश्यक आहे.
भरती विभाग : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
अर्ज प्रक्रिया : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णतः ऑफलाईन (Offline) पद्धतीने राबवण्यात येणार आहे.
पदाचे नाव व पदसंख्या :
अ.क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | पहारेकरी | 62 |
2 | मजूर | 307 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसाठी सविस्तर जाहिरात पहा.
वयोमर्यादा : या भरतीसाठी पात्र उमेदवारांचे अराखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा हि 18 ते 38 वर्ष व राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा हि 18 ते 43 वर्ष असणार आहे.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी अराखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.1000/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.900/- एवढे अर्ज शुल्क आहे. (Comptroller, Recruitment Account VNMKV Parbhani) State Bank Of india, VNMKV Campus, Parbhani Branch Code 20317 IFSC CODE SBIN0020317. यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची तारीख : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख हि 02 जुलै 2025 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 01 ऑगस्ट 2025 आहे.
सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक :
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑफलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
