ST Mahamandal Bharti 2025 | एसटी महामंडळ भरती 2025 | छत्रपती संभाजीनगर विभागात १८८ जागांसाठी भरती सुरू!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

ST Mahamandal Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) छत्रपती संभाजीनगर विभागात आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवारांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महामंडळाने २०२५-२०२६ या सत्रासाठी विविध १० तांत्रिक व्यवसायांमध्ये १८८ शिकाऊ उमेदवारांची (Apprentice) भरती जाहीर केली आहे.

महत्वाचे तपशील (Important Details)

  • भरतीचा प्रकार : शिकाऊ उमेदवारी (Apprentice).
  • प्रशिक्षण कालावधी : १ वर्ष.
  • वयोमर्यादा : १ जानेवारी २०२६ रोजी उमेदवाराचे वय १४ ते ३८ वर्षे असावे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे सूट).
  • विद्यावेतन : पदानुसार रु. ९,८९६/- ते रु. ११,१३३/- प्रति महिना.

ट्रेडनुसार रिक्त जागांची माहिती

ट्रेडचे नावएकूण जागाआवश्यक पात्रता (ITI उत्तीर्ण)विद्यावेतन (Stipend)
मेकॅनिक मोटर व्हेईकल४५MMV ट्रेड₹ ११,१३३/-
मॅकेनिक (डिझेल)३७डिझेल मॅकेनिक ट्रेड₹ ९,८९६/-
इलेक्ट्रीशियन३०इलेक्ट्रीशियन ट्रेड₹ ११,१३३/-
वेल्डर३०वेल्डर ट्रेड₹ ९,८९६/-
टर्नर१०टर्नर ट्रेड₹ ११,१३३/-
शिट मेटल वर्कर०९शिट मेटल वर्कर ट्रेड₹ ९,८९६/-
इतर ट्रेड२७संबंधित ट्रेड मधील ITI₹ ११,१३३/-

(इतर ट्रेडमध्ये इन्स्टुमेंट मेकॅनिक, रेफ्रीजरेशन व एअर कंडीशनींग, मेकॅनिक मेकॉट्रोनिक्स आणि पेंटर या पदांचा समावेश आहे)

सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक :

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

  • ऑनलाईन नोंदणी: उमेदवारांनी सर्वप्रथम www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर जाऊन MSRTC DIV CONTROLLER chhatrapati sambhaji nagar या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज (Apply) करावा.
  • कागदपत्रे जमा करणे: ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे विभागीय कार्यालय, म.रा.मा.प. महामंडळ, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर येथे १६-१२-२०२५ ते ०१-०१-२०२६ या कालावधीत जमा करावीत.
  • अंतिम तारीख: अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ०१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १५:०० वाजेपर्यंत आहे.

प्रक्रिया शुल्क (Application Fee)

  • खुला प्रवर्ग: रु. ५९०/-.
  • मागासवर्गीय प्रवर्ग: रु. २९५/-.
  • हे शुल्क ‘M.S.R.T.C. FUND ACCOUNT’ या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेच्या डिमांड ड्राफ्टद्वारे (DD) भरायचे आहे.

निवडीसाठी महत्त्वाच्या अटी

  • उमेदवाराने आयटीआय (ITI) उत्तीर्ण झाल्यापासून ०३ वर्षांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.
  • यापूर्वी कोणत्याही सरकारी किंवा खाजगी संस्थेत शिकाऊ उमेदवारी केली असल्यास असे उमेदवार पात्र ठरणार नाहीत.
  • प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना एसटी महामंडळाच्या कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा कोणताही हक्क राहणार नाही.
ST Mahamandal Bharti 2025
ST Mahamandal Bharti 2025

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!