तलाठी कोण असतो? And How to Become a Talathi ? तलाठी हा गावपातळीवरील महसूल विभागाचा सर्वात मुख्य सरकारी प्रतिनिधी असतो. साधारणपणे तलाठी हा दोन ते तीन गावांसाठी नियुक्त केला जातो.जनतेचा संपर्क थे तलाठ्याशी होत असल्याने त्यांना शासनाचा आरसा असेही म्हटले जाते. महसूल विभागाच्या रचनेत सर्वात वरचे स्थान हे जिल्हाधिकाऱ्यांचे असते तर गावपातळीवरील कामे तलाठी बघतो. मंडळ अधिकारी (Circle Officer) आणि तहसीलदार (Tehsildar) या दोघांच्या नियंत्रणाखाली तलाठी काम करतो.
तलाठ्याची कामे
- १.ग्रामीण भागातील सर्व जमिनीचे ७/१२ आणि ८अ चे उतारे याची नोंदणी करणे आणि ते नागरिकांना उपलब्ध करून देणे.
- २.ग्रामीण भागांमध्ये जमीन खरेदी किंवा विक्री करायची असेल तर त्याची नोंदणी करणे, कोणाचा मृत्यू झाला असेल किंवा कोणाला वारसा नोंद करायची असेल अशा सर्व गोष्टीची नोंद गाव नमुना नंबर ६ मध्ये करणे.
- ३.जमीन कोणाच्या नावावर आहे त्या जमिनीवर कोणाचा काय हक्क आहे याची कायदेशीर तपासणी करून नोंद करणे.
- ४.शेतकरी आपल्या शेतात कोणती पीक घेत आहे त्याची ऑनलाइन नोंदणी करणे.
- दुष्काळ किंवा अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱ्यांचे किंवा ग्रामीण भागातील नागरिकांचे किती नुकसान झाले आहे याची नोंदणी करून अहवाल वरिष्ठांना पोहोच करणे.
- ५.शासनाकडून जमीन महसूल आणि इतर स्थानिक करारांची वसुली करणे. कसल्याही कर्जाची किंवा करारांची थकीद रक्कम गोळा करून घेणे.
- ६.पंचनामा करणे म्हणजेच पूर, वादळ, आग, अतिवृष्टी किंवा अवकाळी पाऊस अशा गोष्टींमुळे पिकांची किंवा घरांचे नुकसान झाल्यास त्या घटनास्थळी जाऊन तिथली देखरेख करणे म्हणजेच पंचनामा तयार करणे.
- ७.आपत्तीमुळे नुकसान झाल्यानंतर शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत केसर व नागरिकांपर्यंत पोचली आहे का मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणे.
- ८.नागरिकांना विविध कामासाठी लागणारे शासकीय कागदपत्रे जसे की उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, शेतकरी असल्याचा दाखला आणि जातीचा दाखला
तलाठी होण्यासाठी पात्रता
- तलाठी होण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.
- पदवीला टक्केवारीची कोणतीही अट नसते.
- तलाठी साठी आलेली जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपर्यंत उमेदवाराची पदवी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.
- दहावी (SSC) किंवा बारावी (HSC) च्या परिक्षेत मराठी हा विषय असावा. नसेल तर, निवड झाल्यानंतर ३ वर्षांच्या आत ‘तदर्थ मंडळाची’ मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.
- MS-CIT किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. जर तुमच्याकडे तलाठी चा फॉर्म भरताना हे प्रमाणपत्र नसतील तर तुमची निवड झाल्यांनंतर २ वर्षांच्या आत हे प्रमाणपत्र सादर करू शकता.
- वयोमर्यादा: खुला प्रवर्ग (Open / General)-१८ वर्ष, मागासवर्गीय (OBC / SC / ST / VJNT / SBC / EWS)-१८ वर्ष, दिव्यांग उमेदवार (Handicapped) १८-वर्ष, माजी सैनिक (Ex-Servicemen) १८-वर्षे आणि खेळाडू (Sports Person) १८- वर्ष
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- या पदासाठी कोणत्याही प्रकारचे शारीरिक चाचणी नसते
तलाठी परीक्षेसाठी विषय
- मराठी: व्याकरण, शब्दसंग्रह आणि साहित्य (प्रसिद्ध मराठी पुस्तके, कादंबऱ्या आणि त्यांचे लेखक कवी)
- इंग्रजी: Grammar, Vocabulary आणि Comprehension
- बौद्धिक चाचणी आणि अंकगणित: अंकगणित आणि बुद्धिमत्ता(Reasoning)
- सामान्य ज्ञान (General Knowledge): इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना व पंचायतरजा, विज्ञान आणि तंत्रज्ञान चालू घडामोडी (Current Affairs)
सामान्य ज्ञानामध्ये सर्वाधिक विचारले जाणारे विषय
सामान्य ज्ञान मध्ये एकूण २५ प्रश्न विचारले जातात आणि एकूण ५० असतात. परीक्षा पॅटर्न हा TCS/IBPS कसा असतो.
- नदी प्रणाली
- प्राकृतिक भूगोल
- जिल्हे व सीमा
- धरणे व जल विद्युत प्रकल्प
- मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास
- महाराष्ट्रातील समाजसुधारक
- स्वातंत्र्य चळवळ
- पंचायतराज
- मूलभूत हक्क व कर्तव्य
- प्रमुख पदे व कलमे
- शासकीय योजना
- पुरस्कार
- क्रीडा घडामोडी
- नियुक्त्या
- जीवन शास्त्र
- भौतिक व रासायनिक शास्त्र
- माहिती तंत्रज्ञान
- तलाठी होण्यासाठी ( How to Become a Talathi) वरील अत्यंत महत्त्वाचे विषय आणि सर्वाधिक विचारले जाणारे विषय आहेत.
अभ्यास करण्यासाठी सर्वात महत्त्वाची पुस्तके
तलाठी पदाचा अभ्यास करण्यासाठी लागणारी महत्त्वाची पुस्तके – How to Become a Talathi
- मराठी विषयांचा अभ्यास करण्यासाठी : मो. रा. वाळंबे , बाळासाहेब शिंदे
- इंग्रजी विषयांचा अभ्यास करण्यासाठी : बाळासाहेब शिंदे, एम. जे. शेख (M. J. Shaikh) किंवा पाल अँड सुरी (Pal & Suri)
- अंकगणित आणि बुद्धिमत्ता विषयाचा अभ्यास करण्यासाठी : पंढरीनाथ राणे किंवा सतीश वसे आणि नितीन महाले
- बुद्धिमत्तेसाठी : अनिल अंकलगी किंवा सचिन ढवळे
- सामान्य ज्ञान : तात्यांचा ठोकळा, माहितीचा अधिकार (RTI 2005) आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
- चालू घडामोडी : पृथ्वी परिक्रमा’ किंवा ‘सिम्प्लीफाइड चालू घडामोडी’ (बाळासाहेब शिंदे)
- सर्वात महत्त्वाचे प्रश्न पत्रिका साठी संच: K’Sagar किंवा ‘स्मार्ट स्टडी’ (विठ्ठल पुंगळे) किंवा ‘भारती प्रकाशन’ (राजकुमार महारनवर) यांचे TCS/IBPS प्रश्नपत्रिका संच.
जेव्हा नवीन तलाठी भरतीची जाहिरात येते, तेव्हा अर्ज भरण्यासाठी (Online Application Link) शासनाकडून एक विशिष्ट नवीन mahabhumi.gov.in
तलाठी पदाचा पगार
| मूळ पगार (Basic Pay) | ₹२५,५०० |
| महागाई भत्ता (DA) | ₹१२,७५० |
| घरभाडे भत्ता (HRA) | ₹२,३०० – ₹२,५०० |
| एकूण पगार (Gross Salary) | ₹४१,५०० ते ₹४२,२०० |
अभ्यासाचे नियोजन
तलाठी कसे बनावे ( How to Become a Talathi) यासाठी अभ्यासाची नियोजन
- सकाळी ७ ते ९:३० अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास करावा कारण हे विषय में तुला चालना देतात सकाळी शुद्ध वातावरण असते त्यात गणित सोडवणे सोपे जाते.
- सकाळी १०:३० ते १:०० मराठी व्याकरण चा अभ्यास करावा हा विषयी थोडासा सोपा असतो त्यामुळे दुपारपर्यंत अभ्यास पूर्ण होऊ शकतो.
- दुपारी ३:०० ते ५:०० इंग्रजी व्याकरण चा अभ्यास करावा
- संध्याकाळी ६:०० ते ८:०० सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास करा कारण दिवसभरातील थकवा असताना वाचन करणे सोयीचे.
- रात्री ९:०० ते १०:०० पूर्ण दिवसभराचे रिविजन करावे + चालू घडामोडी कराव्या

महत्वाची सूचना :
वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.