कृषी सहाय्यक (Agriculture Assistant) भरती 2026 |जाणून घ्या निवड प्रक्रिया (Apply Now) Best मार्गदर्शक

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

कृषी सहाय्यक (Agriculture Assistant):- भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतीची प्रगती झाली म्हणजेच ग्रामीण भागाची प्रगती झाली, भारत शासन शेतीसाठी नवनवीन योजना लागू करत असतो, त्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम कृषी सहाय्यक (Agriculture Assistant) करत असतो. यामुळेच कृषी विभागातील कृषी सहाय्यक हे पद अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे म्हणून ओळखले जाते. जर तुम्हाला शेतीची आवड असेल तर तुम्ही कृषी सहाय्यक हा योग्य मार्ग निवडला आहे.

तुमचे कृषी क्षेत्रातील शिक्षण पूर्ण झाले असेल आणि तुम्हांला सरकारी नोकरीच्या माध्यमातून ग्रामीण भागाची किंवा शेतीची सेवा करायची तर तुमच्यासाठी कृषी सहाय्यक ही तुमच्या भविष्यासाठी सुवर्णसंधी ठरेल. कृषी सहाय्यक होण्यासाठी तुमचे शिक्षण पदवी पूर्ण झालेले असावे लागते. कृषी पद नेमक असते काय? कृषी सहाय्यक पदासाठी पात्रता काय असते? पगार किती मिळतो ? या स्पर्धेची तयारी कशी करावी ? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला खालील प्रमाणे मिळतील.

कृषी सहाय्यक (Agriculture Assistant) म्हणजे कोण ?

  • कृषी सहाय्यक (Agriculture Assistant) म्हणजे ग्रामीण भागातील महत्त्वाचा कर्मचारी जो ग्रामीण स्तरावर काम करत असतो. भारत सरकारने शेतीसाठी बनवलेला योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे सर्वात मोठा हात कृषी सहाय्यक या कर्मचाऱ्याचा असतो.

कृषी सहाय्यकाची (Agriculture Assistant) कामे:

  • कृषी सहाय्यक शेतकऱ्यांसाठी पिकांचे व्यवस्थापन करण्यास मदत करतो म्हणजेच पिकांसाठी कोणता खाती योग्य आहे कोणता नाही, पिकांवर पडणाऱ्या कीड-रोगांचे नियंत्रण करण्यास काय करावेया सर्व गोष्टीचे मार्गदर्शन शेतकऱ्यांसोबत करतो.
  • शासनाने निर्माण केलेल्या विविध शेतीसाठी योजना या शेतकऱ्यांना पर्यंत पोहोचवणे आणि त्या योजनेचे अर्ज भरून घेण्यास मदत करणे.
  • शेतकऱ्यांच्या शेतातील मातीची तपासणी करून, त्या जमिनीसाठी कोणते पिक त्या जमिनीसाठी योग्य आहे आणि ते पीक जास्त उत्पादन देऊ शकतो याचा सल्ला देणे.
  • नैसर्गिक आपत्ती आल्यास पिकांचे नुकसान झाले याचे पंचनामे करणे आणि शेतकऱ्यांची भरपाई करून देण्यासाठीत्यांचा अहवाल वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले हे कृषी सहाय्यक (Agriculture Assistant) यांचे काम असते.

शैक्षणिक पात्रता (Equcation)

  • कृषी सहाय्यक या पदासाठी कृषी पदविका (Diploma in Agriculture), कृषी पदवी (B.Sc. Agriculture), समतुल्य कृषी पदवी (Equivalent Degrees),बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी), ​बी.एस्सी. (उद्यानविद्या), ​बी.एस्सी. (वनविद्या), ​बी.एफ.एस्सी. (मत्स्य विज्ञान) आणि ​बी.एस्सी. (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) .यापैकी कोणतीही एक पदवी कृषी सहाय्यक (Agriculture Assistant) पदासाठी पुरेशी आहे.

वयोमर्यादा (Age Limit)

खुला प्रवर्ग (Open / General Category)१८ वर्ष ते ३८ वर्षे
मागासवर्गीय प्रवर्ग (Reserved Category)१८ वर्षे ते ४३ वर्षे
दिव्यांग उमेदवार (Persons with Disability)४५ वर्षांपर्यंत
प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवार४५ वर्षांपर्यंत
खेळाडू उमेदवार (Sports Person)४३ किंवा ४५ वर्षांपर्यंत
माजी सैनिक (Ex-Servicemen)त्यांच्या सेवा कालावधीव्यतिरिक्त अधिक ३ वर्षे
पदवीधर / पदविकाधारक अंशकालीन कर्मचारी५५ वर्षांपर्यंत

निवड प्रक्रिया

कृषी सहाय्यक (Agriculture Assistant) या पदाची निवड प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा कृषी विभाग यांच्यामार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षेच्या आधारे घेतली जाते.

१. ऑनलाइन अर्ज आणि पात्रता तपासणी (Online Application)

  • सर्वात अगोदर कृषी सहाय्यक या अधिकृत संकेतस्थळावर भरतीची जाहिरात दिली जाते.
  • पात्र उमेदवारांना तारखेच्या आत ऑनलाइन अर्ज करावा लागतो.
  • अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला (caste certificate), फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाइन अपलोड करून परीक्षेसाठी शुल्क भरावे लागते.

कृषी सहाय्यक भरती” चा अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वापरू शकता : mpsconline.gov.in

२. संगणकीय लेखी परीक्षा (Computer Based Test – CBT)

  • परीक्षा MCQ स्वरूपाची असते
  • प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे मराठी आणि इंग्रजी भाषेत असतात.
  • कृषी सहाय्यक परीक्षेसाठी इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि कृषी विषयक संतांची प्रश्न विचारली जातात.
  • कृषी सहाय्यक पद परीक्षेसाठी नियमानुसार परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग असू शकते

​३. कागदपत्र पडताळणी (Document Verification)

  • आधार कार्ड
  • शैक्षणिक पात्रतेचा पुरावा (पदवी प्रमाणपत्र)
  • रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  • नॉन-क्रीमी लेयर

अभ्यासक्रम (Syllabus)

​१. मराठी भाषा

  • व्याकरण (शब्दांच्या जाती (नाम, सर्वनाम, विशेषण इ.), काळ व काळाचे प्रकार, संधी, प्रयोग, समास, अलंकार)
  • शब्दसंग्रह (समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार (त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग), शब्दसमूहाबद्दल एक शब्द)

​२. इंग्रजी भाषा

  • Grammar (Parts of Speech, Tenses, Voice (Active/Passive), Direct & Indirect Speech, Common Errors, Punctuation)
  • Vocabulary (Synonyms, Antonyms, Idioms & Phrases, One-word substitutions, Spelling check)
  • Comprehension (Passage-based questions)

३. सामान्य ज्ञान (General Knowledge)

  • महाराष्ट्राचा विशेष संदर्भ (महाराष्ट्राचा भूगोल (नद्या, जिल्हे, पिके, हवामान), महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक)
  • भारतीय राज्यघटना (मूलभूत हक्क, कर्तव्ये, राष्ट्रपती, राज्यपाल आणि स्थानिक स्वराज्य संस्था (पंचायत राज))
  • चालू घडामोडी (राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी (विशेषतः कृषी क्षेत्राशी संबंधित नवीन घडामोडी, पुरस्कार आणि कायदे))

​४. बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित (Reasoning & Aptitude)

  • बुद्धिमत्ता (क्रम ओळखणे (Series), नातेसंबंध (Relations), दिशा ज्ञान (Direction Sense), सांकेतिक भाषा (Coding-Decoding), विसंगत घटक ओळखणे)
  • अंकगणित (संख्या व संख्यांचे प्रकार, सरासरी, टक्केवारी, नफा-तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, काळ-काम-वेग)
कृषी विषयक तांत्रिक अभ्यासक्रम
  • पीक उत्पादन तंत्रज्ञान (Crop Production Technology) : (प्रमुख पिकांची शास्त्रीय पद्धतीने लागवड, सुधारित आणि संकरित वाण (Varieties), बियाणे प्रमाण (Seed Rate) आणि पेरणीच्या पद्धती, फलोत्पादन (Horticulture): फळझाडे आणि भाजीपाला लागवड तंत्रज्ञान)
  • मृदा विज्ञान (Soil Science) : (जमिनीचे प्रकार, गुणधर्म आणि मृदा निर्मिती प्रक्रिया, जमिनीची धूप (Soil Erosion) आणि ती रोखण्याचे उपाय, मृदा परीक्षण (Soil Testing) आणि जमिनीची सुपीकता वाढवणे, खत व्यवस्थापन)
  • वनस्पती संरक्षण (Plant Protection) : (पिकांवरील मुख्य किडी आणि रोग (उदा. तांबेरा, मर रोग, खोडकिडा इ.) आणि त्यांची लक्षणे, कीड नियंत्रण, कीटकनाशकांची (Pesticides) माहिती आणि त्यांचा सुरक्षित वापर)
  • कृषी विस्तार शिक्षण (Agricultural Extension) : (शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याच्या पद्धती, ग्रामीण विकास आणि कृषी क्षेत्रातील संवाद माध्यमे)
  • कृषी अर्थशास्त्र आणि विपणन (Agri Economics & Marketing) : (शेतीचा उत्पादन खर्च, कृषी पतपुरवठा (Agri Finance) आणि बँकांच्या योजना, कृषी उत्पन्न बाजार समित्या (APMC), हमीभाव (MSP) आणि शेतमाल विक्री व्यवस्था)
Agriculture Assistant feaute image
कृषी सहाय्यक (Agriculture Assistant) पदाचे सर्व माहिती

महत्त्वाची सूचना : महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये कृषी सहाय्यक पदांची गरज सातत्याने निर्माण होत असते. सध्या अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली नसली तरी उपलब्ध माहिती आणि मागील भरतींचा विचार करता येत्या काही महिन्यांत कृषी सहाय्यक भरतीची अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील पात्र उमेदवारांनी आतापासूनच अभ्यास सुरू ठेवून आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच अंतिम पात्रता, जागांची संख्या व इतर अटी निश्चित होतील.

तुम्ही येथे “जिल्हा परिषद भरतीची” संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/zilla-parishad/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!