आरोग्य सेवक भरती २०२६ (Health Department Recruitment 2026) :- प्रत्येक देशाचा विकास हा देशातील नागरिकांच्या आरोग्यावर अवलंबून असतो. सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यात आणि प्राथमिक आरोग्य शासनाच्या विविध आरोग्य योजना आणि मोफत वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचवण्याचे मुलाचे काम आरोग्य सेवक करत असतात. आरोग्य सेवक हे दुर्गम भागातील गाव ते प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यंत आरोग्य योजना पोहचावीत असतात.
आरोग्य सेवा भरती जिल्हा परिषद मार्फत घेण्यात येते. २०२६ मध्ये आरोग्य सेवा भरती जिल्हा परिषदेमार्फत मोठ्या प्रमाणावर मेगा भरती आयोजित करण्याची शक्यता आहे.
Health Department Recruitment 2026 :- ज्या तरुणांना आरोग्य क्षेत्रात आपले करिअर घडवायचे आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. ते तरुण ग्रामीण भागात राहून समाजसेवा करू शकतात आणि त्यांचे सरकारी नोकरी लागण्याचे स्वप्न ही पूर्ण होईल. आरोग्य सेवा भरती मध्ये पात्रता काय असते? यासाठी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, अभ्यासाचे नियोजन कसे करावे?, हे पद आपल्या नावावर कसे करावे? अशा प्रश्नांची सर्व उत्तरे तुम्हाला खालील लेकामध्ये मिळून जाते.
आरोग्य सेवक पद म्हणजे काय?
- आरोग्य सेवा भरती (Health Department Recruitment 2026) हे पद म्हणजे सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा पुरवणे आणि प्राथमिक आरोग्य मार्फत निघणाऱ्या नवनवीन योजना सर्व नागरिका पर्यंत पोहोचवणे.
- आरोग्य सेवकाचे काम कामाची नियुक्ती प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा आरोग्य उपकेंद्र आणि इंस्टाग्राम पंचायत स्तरावर करण्यात येते.
- आरोग्य सेवकाची कामे:- लसीकरण करणे (गावातील लहान मुले आणि गरोदर बायकांचे वेळेवर लसीकरण करून घेणे)
- ग्रामीण भागामध्ये कुठल्याही प्रकारचे मलेरिया, डेंगू, टीबी, चिकनगुनिया यासारखे आजार रोखण्यासाठी वारंवार औषध फवारणी करणे आणि हे आजार रोखण्यासाठी नियोजना करणे.
- गावात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे आरोग्य तपासणी व माहिती गोळा करणे आणि आजारी नागरिकांची नोंदणी करून त्यांना पुढील उपचारांसाठी आरोग्य केंद्र पाठवणे.
- ग्रामसंस्था मध्ये आरोग्याबाबत म्हणजेच स्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी, कुटुंबाची नियोजन आणि चांगल्या आरोग्य विषयी ग्राम संस्था मध्ये जनजागृती निर्माण करणे.
- आरोग्य सेवक म्हणजे पुरुष यांना प्रामुख्याने बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (Multipurpose Health Worker – MPHW) म्हणतात.
- आरोग्य सेविका म्हणजेच महिला यांना ANM (Auxiliary Nurse Midwife) म्हणतात.
आरोग्य सेवक भरती कोण घेते?
आरोग्य सेवा भरती (Health Department Recruitment 2026) या पदाची आरोग्य भरती कोण करते खालील प्रमाणे दिले आहे
जिल्ह्यातील संबंधित जिल्हा परिषद (Zilla Parishad – ZP)
सार्वजनिक आरोग्य विभाग (Public Health Department)
परीक्षा घेणाऱ्या अधिकृत संस्था (Exam Conducting Agencies)
शैक्षणिक पात्रता
आरोग्य सेवा भरती २०२६ (Health Department Recruitment 2026) या पदाचा अर्थ भरण्यासाठी खालील शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता उमेदवारांकडे असणे अनिवार्य आहे. आणि या पात्रता पुरुष आणि महिला यांच्यासाठी वेगवेगळ्या असतात.
आरोग्य सेवक -पुरुष
- १० वी (मॅट्रिक) किंवा १२ वी (विज्ञान शाखा – Science) पास असावे लागते.
- बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यासाठी’ (Multipurpose Health Worker) 12 महिन्यांचा मूलभूत अभ्यासक्रम म्हणजेच कोर्स पूर्ण केलेला असावा लागतो.
- किंवा शासनमान संस्थेकडील संबंधित सॅनिटरी इन्स्पेक्टर हा कोर्स पूर्ण असावा लागतो.
आरोग्य सेविका- महिला
- कमीत कमी १० वी किंवा १२ वी पास असणे अनिवार्य आहे.
- या पदासाठी सहाय्यकारी प्रसविका आणि परिचारिका ANM – Auxiliary Nurse Midwife) किंवा GNM (General Nursing and Midwifery) हा कोर्स पूर्ण असावा लागतो.
- महिलेची महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडे नोंदणी असणे अनिवार्य आहे.
- त्या पदाचा अर्ज भरण्यासाठी उमेदवाराला मराठी भाषा लिहिता वाचता आणि व्यवस्थित बोलता येणे अनिवार्य आहे.
- संगणक शास्त्राचे ज्ञान असावे (MS-CIT चे प्रमाणपत्र असणे आवश्यक ते मानले जाते).
आवश्यक कागदपत्रे (Required Document
आरोग्य सेवा भरती २०२६ (Health Department Recruitment 2026) या योजनेचा अर्ज भरायचा असेल तर तुमच्याकडे खालील सर्व कागदपत्रे असणे अनिवार्य आहे
- ओळख पटवण्यासाठी पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) (उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा)
- जन्मतारीख पुरावा (१० वीचे बोर्ड प्रमाणपत्र)
- १० वी आणि १२ वी मार्कशीट
- बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्याचा (MPHW) १ वर्षाचा कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर प्रमाणपत्र पुरुषांसाठी
- ANM किंवा GNM कोर्स उत्तीर्ण प्रमाणपत्र महिलांसाठी.
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडे वैद्य आणि नूतनीकरण केलेले नोंदणी प्रमाणपत्र.
- लागू असेल तर खालील प्रमाणपत्र: जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity)
- नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer)
- EWS प्रमाणपत्र
- आवश्यक प्रमाणपत्र : MS-CIT प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate), लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (Small Family Declaration)
वयोमर्यादा (Age limit)
आरोग्य सेवा भरती (Health Department Recruitment 2026) या पदाचा अर्ज भरण्यासाठी खालील वयोमर्यादा लक्षात घ्या.
| खुला प्रवर्ग (Open / General) | १८ वर्षे ते ३८ वर्षे |
| मागासवर्गीय प्रवर्ग (SC, ST, OBC, VJ/NT, SBC, EWS) | १८ वर्षे ते ४३ वर्षे |
| दिव्यांग उमेदवार (PwD) | ४५ वर्षांपर्यंत |
| प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवार | ४५ वर्षांपर्यंत |
| माजी सैनिक (Ex-Servicemen) | उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेचा कालावधी + ३ वर्षे इतकी वयात सवलत मिळते. |
| अंशकालीन कर्मचारी | ५५ वर्षांपर्यंत |
| खेळाडू उमेदवार (Sports Person) | ४३ वर्षांपर्यंत |
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
आरोग्य सेवा भरती (Health Department Recruitment 2026) या पदाची अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन असते
- सर्वात अगोदर शासनाने घोषित केलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: arogya.maharashtra.gov.in
- जिल्ह्याचे अधिकृत जाहिरात डाऊनलोड करून घ्या त्यात पात्रता व अटी असलेल्या काळजीपूर्वक वाचा.
- मुख्य पानावर न्यू रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडा.
- तुमची वैयक्तिक माहिती भरा नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि जन्मतारीख सर्व माहिती अचूक भरा.
- माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती रजिस्ट्रेशन आयडी (युझरनेम) येईल ते जपून ठेवा.
- पाठवलेल्या आयडी आणि पासवर्ड चा वापर करून लॉगिन करा.
- तुमची वैयक्तिक माहिती भरून घ्या (तुमचा पत्ता कास्ट कॅटेगिरी, आरक्षणाचा प्रकार (महिला, खेळाडू, दिव्यांग) सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
- १० वी, १२ वी आणि तांत्रिक कोर्स चे गुण उत्तीर्ण वर्ष आणि मंडळाचे नाव अचूक भरा.
- तुमचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन करून अपलोड करा.
- पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने तुमची स्वाक्षरी करा आणि अपलोड करून द्या.
- जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर, रहिवासी प्रमाणपत्र, अनेक शैक्षणिक प्रमाणपत्रे दिलेल्या साईजमध्ये अपलोड करा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी Preview पर्याय निवडा व संपूर्ण भरलेली माहिती बरोबर आहे का तपासून घ्या.
- अर्धासाठी असलेली शुल्क ऑनलाइन द्वारे भरा.शुल्क भरून झाल्यानंतर अर्ज सबमिट करा आणि शुल्क भरल्याची पावती जतन करून ठेवा.
अर्ज शुल्क
| उमेदवाराचा प्रवर्ग | अंदाजे परीक्षा शुल्क |
| खुला प्रवर्ग (Open / General) | १,०००/- |
| मागासवर्गीय प्रवर्ग (OBC, SC, ST, VJ/NT, SBC, EWS) | ९००/- |
| अनाथ उमेदवार (Orphan) | ९००/- |
| दिव्यांग उमेदवार (PwD) | परीक्षा शुल्कातून सूट (किंवा नाममात्र शुल्क) |
| माजी सैनिक (Ex-Servicemen) | परीक्षा शुल्कातून पूर्ण सूट |
निवड प्रक्रिया
आरोग्य सेवा भरती (Health Department Recruitment 2026) या पदाची निवड प्रक्रिया कशी असते खालील प्रमाणे दिले आहे:
- परीक्षेचे स्वरूप TCS किंवा IBPS मार्फत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येते.
- प्रश्नपत्रिका मध्ये एकूण १०० प्रश्न MCQs प्रकारचे असतात सर्व मिळून प्रश्नपत्रिका २०० गुणाची असते.
- परीक्षेसाठी कालावधी हा ९० ते १२० मिनिटांचा असतो.
- पदासाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांनी किमान ४५% गुण घेणे अनिवार्य असते.
- लेखी परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे आणि प्रवर्गातील जगांनुसार तात्पुरती गुणवत्ता अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात.
- एक जागेसाठी साधारणपणे अनेक उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येते.
- या पडताळणी मध्ये उमेदवारांनी अर्जात भरलेली माहिती आणि त्यांच्याकडील मूळ प्रमाणपत्रे तपासली जातात.
- जर कागदपत्रे अयोग्य किंवा त्या कागदपत्रामध्ये खोट निघाली किंवा अपूर्ण असेल त्या विद्यार्थ्यांचे या पदासाठी सलेक्शन होत नाही.
- कागदपत्रे तपासून झाल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाते.
- निवड झालेल्या प्रत्येक उमेदवाराला शासकीय रुग्णालयातून आपली वैद्यकीय तपासणी करून घेणे अनिवार्य असते.
- वैद्यकीय तपासणी करून झाल्यानंतर त्या तपासणी मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देऊन सेवेत रुजू करण्यात येते.
- आरोग्य सेवक भरती या पदासाठी मूळ वेतन हे २५,५०० ते ८१,१०० इतके असते
अभ्यासक्रम (Equcatoion)
आरोग्य सेवा भरती (Health Department Recruitment 2026) या पदाचा अभ्यासक्रम खालील प्रमाणे दिला आहे.
मराठी भाषा
- मराठी भाषा : व्याकरण (शब्दांच्या जाती (नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद), काळ व काळाचे प्रकार, संधी, समास, प्रयोग)
- शब्दसंग्रह (समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग व वचन बदलणे, शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
- म्हणी व वाक्प्रचार (त्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग)
- उतारा (मराठी उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधणे)
इंग्रजी भाषा
- Grammar (Parts of Speech, Tenses, Voice (Active/Passive), Direct & Indirect Speech, Degree)
- Vocabulary (Synonyms, Antonyms, One-word substitutions, Idioms and Phrases, Correct Spelling)
- Sentence Structure (Spotting errors, Fill in the blanks, Sentence rearrangement)
- Comprehension (Passage reading and answering questions)
सामान्य ज्ञान (General Knowledge – GK)
- इतिहास (भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास)
- भूगोल (महाराष्ट्राचा भूगोल (नद्या, जिल्हे, हवामान, प्रमुख पिके))
- राज्यघटना (भारतीय संविधानाची प्राथमिक माहिती, ग्रामप्रशासन (पंचायत राज, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत))
- विज्ञान (मूलभूत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र)
- शासकीय योजना (केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्यविषयक महत्त्वाच्या योजना)
बुद्धिमत्ता चाचणी व गणित (Reasoning & Maths)
- बुद्धिमत्ता (संख्यामालिका, अक्षरमालिका, विसंगत घटक ओळखणे, नातेसंबंध, दिशा ज्ञान, सांकेतिक भाषा (Coding-Decoding), घड्याळ व कॅलेंडर)
- अंकगणित (बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, टक्केवारी, नफा-तोटा, काळ-काम-वेग, गुणोत्तर व प्रमाण)
तांत्रिक / आरोग्य विषयक घटक (Technical Syllabus)
- मानवी शरीरशास्त्र (मानवी संस्था (पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था, श्वसनसंस्था, मज्जासंस्था), हाडे आणि स्नायू)
- आहारशास्त्र व जीवनसत्त्वे (प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे (Vitamins) आणि त्यांच्या कमतरतेमुळे होणारे रोग)
- साथीचे रोग व आजार (मलेरिया, डेंग्यू, टीबी (क्षयरोग), कुष्ठरोग, एड्स, पोलिओ, कॉलरा, कोरोना इत्यादी लक्षणे, कारणे आणि उपाय)
- राष्ट्रीय आरोग्य मोहिमा (राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM), राष्ट्रीय आरोग्य मोहीम (NHM), जननी सुरक्षा योजना, आयुष्मान भारत योजना)
- लसीकरण (राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक (Immunization Schedule), बालकांना आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या विविध लसी)
- प्राथमिक उपचार (आपत्कालीन परिस्थितीत करायचे प्राथमिक उपचार, निर्जंतुकीकरण, स्वच्छता आणि पाणी शुद्धीकरण पद्धती)

महत्त्वाची सूचना (Disclaimer)
महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये कृषी सहाय्यक पदांची गरज सातत्याने निर्माण होत असते. सध्या अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली नसली तरी उपलब्ध माहिती आणि मागील भरतींचा विचार करता येत्या काही महिन्यांत कृषी सहाय्यक भरतीची अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे (Health Department Recruitment 2026) पात्र उमेदवारांनी आतापासूनच अभ्यास सुरू ठेवून आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच अंतिम पात्रता, जागांची संख्या व इतर अटी निश्चित होतील.
तुम्ही येथे कृषी सहाय्यक याविषयी संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/agriculture-assistant/