सोलापूर जनता सहकारी बँक भरती (Solapur Janata Sahakari Bank Recruitment 2026) या भरती प्रक्रियेमध्ये “जूनियर ऑफिसर” आणि “ट्रेनिंग क्लर्क” पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. ज्या तरुणा बँक क्षेत्रात आपले करिअर घडवायचे असेल अशा तरुणांसाठी सुवर्णसंधी!. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध शाखांमध्ये या जूनियर ऑफिसर आणि ट्रेनी क्लर्क नियुक्ती केली जाणार आहे, या पदासाठी इच्छुक उमेदवार २७ जून २०२६ या तारखेपर्यंत बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपला अर्ज भरून घेऊ शकता. जे उमेदवार बँक क्षेत्रामध्ये करियर घडवण्यास इच्छुक आहेत अशा तरुणांना ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली असून, ही संधी न गमवता आत्ताच अर्ज करा.
या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया, कोणत्या पदासाठी भरती सुरू होणार आहे आणि परीक्षा शुल्क याची सविस्तर माहिती पाहिजे असेल तर खालील माहिती संपूर्ण वाचावी.
जूनियर ऑफिसर आणि ट्रेनी क्लर्क म्हणजे काय?
सोलापूर जनता सहकारी बँक भरती (Solapur Janata Sahakari Bank Recruitment 2026) या भरतीमध्ये जूनियर ऑफिसर आणि ट्रेनी क्लर्क या पदांची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
ज्युनिअर ऑफिसर (Junior Officer) :
- काम : जूनियर ऑफिसर बँकेच्या शाखेमधील दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवणे, ग्राहकांच्या तक्रारी ऐकून त्याचे समाधान काढणे आणि शाखा व्यवस्थापनाला गरजे नुसार मदत करणे.
- अनुभव : जूनियर ऑफिसर होण्यासाठी बँकिंग उद्योगातील कमीत कमी ७ वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे, यामुळे उमेदवाराला बँकेचे सखोल तांत्रिक ज्ञान आहे असे मानले जाते.
- प्रशिक्षण कालावधी : निवड झालेल्या उमेदवाराला एकूण १८ महिन्याच्या कालावधीत जावे लागते, सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्ये टेम्पररी एम्प्लॉयी, म्हणून काम करावे लागते आणि यानंतर सहा महिने ट्रेनिंग आणि पुन्हा सहा महिने प्रोबेशन अशी एकूण 18 महिने कालावधीत जावे लागते, यानंतर उमेदवाराला कायमस्वरूपी नोकरीसाठी स्वीकारले जाते.
ट्रेनी क्लर्क (Trainee Clerk) :
- काम : ट्रेनी क्लर्क हे पद प्रशिक्षणार्थी पद आहे. हे क्लर्क खाते उघडणे, रोख व्यवहार हाताळणे, डेटा एन्ट्री, चेक क्लिअरिंग ग्राहकांना बँकिंग सेवा पुरवणे हे काम ट्रेनी क्लर्क करत असतात.
- प्रशिक्षणाचा कालावधी : या पदावर उमेदवाराला तीन वर्षाचे प्रशिक्षण घ्यावे लागते यामध्ये पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी ट्रेनिंग म्हणून आणि तिसऱ्या वर्षी प्रोबेशन काम करावे लागते.
शैक्षणिक पात्रता आणि अटी (Eligibility)
सोलापूर जनता सहकारी बँक भरती (Solapur Janata Sahakari Bank Recruitment 2026) :-
| पात्रता घटक | ज्युनिअर ऑफिसर (Junior Officer) | ट्रेनी क्लर्क (Trainee Clerk) |
| वयोमर्यादा | २८ ते ३५ वर्षे | ३० वर्षांपर्यंत |
| वयोमर्यादा सवलत | ५ वर्षांच्या बँकिंग अनुभवास | ३५ वर्षांपर्यंत सवलत |
| शैक्षणिक पात्रता | पदवीधर | पदवीधर (५०% गुण) |
| अनुभव | बँकिंग क्षेत्रात किमान ७ वर्षांचा अनुभव | बँकिंग अनुभवास प्राधान्य |
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
सोलापूर जनता सहकारी बँक भरती (Solapur Janata Sahakari Bank Recruitment 2026) या भरती मधील ज्युनियर ऑफिसर आणि ट्रेनी क्लर्क या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालील आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
- स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो
- स्कॅन केलेली स्वाक्षरी
- पदवी परीक्षेचे प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- बँकिंग क्षेत्रामध्ये काम केल्याचे पुरावे म्हणजेच अनुभव प्रमाणपत्र
- बँकिंग संबंधित पात्रता प्रमाणपत्र
- संगणक कोर्स पूर्ण केल्यानंतर मिळालेले प्रमाणपत्र
परीक्षा अभ्यासक्रम
सोलापूर जनता सहकारी बँक भरती (Solapur Janata Sahakari Bank Recruitment 2026) या भरती मधील दोन्ही पदासाठी लागणारा अभ्यासक्रम आणि परीक्षेची पद्धत खालील दिली आहे.
- परीक्षा स्वरूप (जूनियर ऑफिसर) : परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येते.
- परीक्षा स्वरूप (ट्रेनी क्लर्क) : या पदासाठी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर वर घेण्यात येते.
- अभ्यासक्रम आणि माहितीपत्रक : परीक्षा अभ्यासक्रम परीक्षेची वेळ केंद्राचा पत्ता आणि हॉल तिकीट याची सर्व माहिती बँकेच्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल.
- उमेदवाराला परीक्षेच्या संबंधित सर्व माहिती त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल द्वारे कळवली जाईल.
निवड प्रक्रिया
- ऑनलाइन अर्ज : अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्जामध्ये सर्व माहिती अचूक पद्धतीने भरणे अनिवार्य आहे कारण चुकीच्या माहिती आढळल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द होऊ शकतो.
- लेखी परीक्षा: जूनियर ऑफिस या पदासाठी परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येते. आणि ट्रेनी क्लर्क साठी परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येते.
- वैयक्तिक मुलाखत (Personal Interview): लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येते.
- अंतिम निवड यादी : लेखी परीक्षेतील गुण वैयक्तिक मुलाखत उच्च शैक्षणिक पात्रता आणि संबंधित कामाचा अनुभव त्याची एकत्रित गुण करून अंतिम यादी जाहीर करण्यात येते.
- प्रशिक्षण आणि प्रोबेशन: प्रशिक्षण आणि प्रोबेशन मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून विचार केला जाऊ शकतो.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
सोलापूर जनता सहकारी बँक भरती (Solapur Janata Sahakari Bank Recruitment 2026) या भरतीमध्ये जूनियर ऑफिसर आणि ट्रेनी क्लर्क या पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची सर्व माहिती खालील प्रमाणे सविस्तर दिली आहे.
- सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत पोर्टल द्वारे लॉगिन करून घ्या www.sjsb.bank.in
- संबंधित भरती लिंक वर क्लिक करा आणि अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती अचूक भरा.
- यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून योग्य साईज मध्ये अपलोड करा.
- माहिती सबमिट केल्यानंतर संगणक प्रणाली द्वारे विशिष्ट क्रमांक दिला जाईल. तू झोपून ठेवा.
- यानंतर परीक्षा शुल्क भरा : ७७५ रुपये + १८% GST (एकूण ९१५ रुपये) हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरून घ्या.
- अर्ज तारीख : १२ जून २०२६ ते २७ जून २०२६ रोजी मध्यरात्री २३:५९
पगार
सोलापूर जनता सहकारी बँक भरती (Solapur Janata Sahakari Bank Recruitment 2026) या भरती मधील ट्रेनी क्लर्क या पदासाठी पगार अंदाजपणे खालील दिली आहे.
| कालावधी | पदाचे स्वरूप | पगार |
| पहिले वर्ष | ट्रेनी कालावधी | १७,५००/- |
| दुसरे वर्ष | ट्रेनी कालावधी | २२,५००/- |
| तिसरे वर्ष | प्रोबेशन कालावधी | २८,२५५/- |

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : वरील माहिती ही करिअर मार्गदर्शनाच्या उद्देशाने देण्यात आली आहे. पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि निवड प्रक्रिया संस्थेनुसार बदलू शकते. नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित संस्थेची अधिकृत अधिसूचना तपासणी आवश्यक आहे.
तुम्ही येथे रेल्वे मधील टीसी भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/ticket-collector-2026/