रेल्वेमध्ये टीसी (Ticket Collector 2026) तरुणांसाठी Best संधी |

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

रेल्वेमध्ये टीसी (Ticket Collector 2026) :- टीसी म्हणजे रेल्वे मधील नीटनेटक्या गणवेशात, हातात तिकीट तपासणी मशीन घेऊन प्रवेशाला मार्गदर्शन करणारी किंवा तिकिटांची तपासणी करणारे यांना टीसी असे म्हटले जाते. जर तुम्हालाही वाटत असेल आपण रेल्वे सगळ्यात आपले करिअर घडवावे आणि देशाची सेवा करावी किंवा शिस्त म्हणजे नोकरीचा भाग व्हावे, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात टीसी कसे व्हायचे? लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया आणि अर्ज प्रक्रिया, परीक्षेचा अभ्यासक्रम, पगार आणि वयोमर्यादा त्याची सर्व माहिती खालील लेखामध्ये सविस्तरपणे दिली आहे.

२०२६ मध्ये बदलते नियमानुसार किसी पदासाठी तयारी कशी करावी आणि च्या स्पर्धेच्या काळात यश कसे मिळवावे, याचे संपूर्ण मार्गदर्शक तुम्हाला या लेखामध्ये मिळून जातील.

कामे

रेल्वेमध्ये टीसी (Ticket Collector 2026) त्यांची कामे पुढील प्रमाणे दिली आहेत:

  • तिकीट तपासणी आणि पडताळणी
  • प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे वैद्य तिकीट आहे का किंवा पास आहे का याची खात्री करून घेणे.
  • विना तिकीट प्रवास करणाऱ्या किंवा अनधिकृतपणे रेल्वेच्या डब्यात प्रवेश करणाऱ्या प्रवेशाला दंडित करने किंवा दंड वसूल करणे.
  • अनेक प्रवासी आरक्षित तिकिटांवर प्रवास करत असतात अशा प्रवाशांकडून ओळखपत्र तपासणे.

प्रवासी सहाय्य आणि व्यवस्थापन

  • काही प्रवाशांना अडचण आल्यास म्हणजे त्यांच्या सीट बद्दल किंवा गाडी बद्दल काही शंका असल्यास त्या शंका दूर करणे.
  • काही वेळा प्लॅटफॉर्मवर किंवा ट्रेनमध्ये भरतीचे व्यवस्थापन करणे आणि प्रवाशांना सुव्यवस्थित बसण्यासाठी जागा करून देणे.
  • प्रवाशांच्या अडचणी एकूण त्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे टीसी चे काम असते.

प्रशासकीय आणि तांत्रिक कामे

  • टीसी ची शिफ्ट संपल्यानंतर किती तिकीट चेक केले, किती दंड वसूल केले याची सर्व माहिती किंवा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगणे.
  • प्रवाशांची तिकीट चेक करणे किंवा प्लॅटफॉर्मवर तिकीट तपासणी करून प्रवाशांना पुढे पाठवणे.
  • रेल्वे चालू असताना रेल्वे गाडीत प्रवाशांची तिकीटे पडताळणी करणे.

सुरक्षा आणि नियमन

  • रेल्वे परिसरामध्ये अनधिकृत व्यक्तींची तपासणी करणे किंवा त्या त्या व्यक्तींना प्रवेश करण्यापासून रोखणे.
  • रेल्वेमधील संशयास्पद हालचालीची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला देणे आणि रेल्वे सुरक्षा नियमचे कटरपणे पालन करणे हे टीसी चे कर्तव्य असते.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

रेल्वेमध्ये टीसी (Ticket Collector 2026) या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि मी खालील प्रमाणे सविस्तर दिली आहे.

  • उमेदवारांनी किमान १२ वी उत्तीर्ण आणि किमान ५०% गुण असणे गरजेचे असते.
  • आत्ताच्या काळात तिकीट तपासणी ही डिजिटल झाली असून यासाठी उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.
  • टीसी पदासाठी अर्ज करण्यासाठी १२ वी कोणत्याही शाखेतून (विज्ञान, वाणिज्य किंवा कला) उत्तीर्ण असायला हवे.
  • जर तुमची पदवी झाली असेल तर तुम्ही रेल्वेच्या उच्च स्तरावरील पदांसाठी ही पात्र ठरू शकता.

टिप : रेल्वेच्या नियमात अजून मधून बदल होण्याची शक्यता असते त्यामुळे भरतीची अधिकृत जाहिरात आल्यानंतर त्यातील शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक वाचावी.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

रेल्वेमधील टीसी (Ticket Collector 2026) या भरती मध्ये तुम्हाला यश मिळवायचे असेल तर खालील दिलेली कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र
  • १० वीची बोर्ड प्रमाणपत्रे
  • १२ वीची गुणपत्रिका
  • पदी पूर्ण असेल तर पदवीची प्रमाणपत्रे
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ऑनलाइन भरलेला अर्जाची प्रिंट आउट
  • परीक्षेसाठी मिळालेले ई-कॉल लेटर
  • वैद्यकीय प्रमाणपत्र

वेतन

रेल्वेमधील टीसी (Ticket Collector 2026) या पदासाठी मिळणाऱ्या व्यक्तीने अंदाजे खालील प्रमाणे दिली आहे.

पे स्केल२१,७००
महागाई भत्ता (DA – 50% च्या आसपास)१०,८५०
घरभाडे भत्ता (HRA – शहराच्या वर्गानुसार)१,८०० ते ५,४००
ट्रान्सपोर्ट अलाउन्स (TA)९०० ते १,८००
इतर भत्ते (उदा. नाईट ड्युटी, रनिंग अलाउन्स)२,००० ते ५,०००
कूण ढोबळ पगार (Gross Salary)३७,००० ते ४४,०००

टीसी पदाचा संपूर्ण अभ्यासक्रम

रेल्वेमधील टीसी (Ticket Collector 2026) या पदासाठी लागणारा अभ्यासक्रम खालील प्रमाणे दिला आहे:

  • गणित (Mathematics) या विषयातील 30 प्रश्न विचारले जातात : (संख्या पद्धती (Number System), दशांश आणि अपूर्णांक (Decimals & Fractions), लसावि आणि मसावि (LCM & HCF), ​गुणोत्तर आणि प्रमाण (Ratio & Proportion), टक्केवारी (Percentage), ​नफा आणि तोटा (Profit & Loss), ​सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज (Simple & Compound Interest), ​वेळ आणि काम (Time & Work), ​वेळ आणि अंतर (Time & Distance), ​क्षेत्रफळ आणि घनफळ (Mensuration))
  • सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती (General Intelligence & Reasoning) या विषयाची 30 प्रश्न विचारले जातात. (अनालॉजी (Analogy),अक्षरे आणि अंकमालिका (Alphabet & Number Series), कोडिंग आणि डिकोडिंग (Coding & Decoding), गणितीय क्रिया (Mathematical Operations), नातेसंबंध (Relationships), सिलोजिझम (Syllogism), वेन आकृत्या (Venn Diagrams), पझल्स (Puzzles) आणि डेटा सफिशियन्सी (Data Sufficiency))
  • सामान्य जागरूकता (General Awareness) या विषयावर ४० प्रश्न विचारले जातात. (चालू घडामोडी (Current Affairs), इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि तंत्रज्ञान)
  • परीक्षेचे स्वरूप : परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रकारची प्रश्न विचारली जातात. एकूण प्रश्न 100 असतात, आणि वेळ 90 मिनिटे असतो. सर्वात महत्त्वाचे या परीक्षेसाठी नकारात्मक गुण असतात, प्रत्येकी चुकीच्या उत्तरा साठी १/३ गुण कापले जातात.

टीसी ची ड्युटी कशी असते ?

टीसीची (Ticket Collector 2026) या पदाची ड्युटी रेल्वे मधील सर्वात महत्त्वाची आणि जबाबदारीची ड्युटी असते.

  • ड्युटी चे प्रकार: स्टेशन ड्युटी, ट्रेन ड्युटी,
  • शिफ्ट आणि वेळ : शिफ्ट पद्धत, रात्रपाळी (Night Shift), आठवड्याची सुट्टी
  • दैनंदिन ड्युटीचे टप्पे: ​साइन-ऑन (Sign-on), साइन-ऑफ (Sign-off)
  • कामातील आव्हाने : संवाद कौशल्य, ​सतत प्रवास आणि कामाचा दबाव

टीसी भरती कोण काढते ?

टीसी भरती प्रक्रिया आणि RRB (रेल्वेमधील टीसी (Ticket Collector 2026) ) : टीसी ची भरती प्रामुख्याने RRB (Railway Recruitment Board) आरआरबी द्वारे राबवली जाते. RRB हे मंडळ भारतीय रेल्वेच्या विविध झोन मधील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करत असते.

टीसी हे पद NTPC (Non-Technical Popular Categories) या भरती प्रक्रियेचा एक भाग आहे. टीसी पदासाठी अर्ज केव्हा मागवले जातात तेव्हा रेल्वे NTPC ची जाहिरात काढते.
या पदासाठी जाहिरात कोणत्या वेबसाईटवर बघावी indianrailways.gov.in

Ticket Collector 2026 feature image
रेल्वेमधील टीसी (Ticket Collector 2026) तरुणांसाठी Best संधी

महत्वाची सूचना (Disclaimer) :लेखामध्ये दिलेली माहिती केवळ मार्गदर्शनासाठी आहे. रेल्वे भरतीचे नियम, पात्रता निकष आणि परीक्षेचे स्वरूप वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे, कोणत्याही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी रेल्वे भरती मंडळाच्या (RRB/RRC) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली मूळ जाहिरात (Official Notification) काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य आहे.

तुम्ही येथे “बँक भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/bank-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!