बँक भरती २०२६ (Bank Recruitment 2026) बँकिंग क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि 2026 हे वर्ष जे तरुण नोकरीची संधी शोधत आहेत त्यांच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आलेले आहे. बँकिंग क्षेत्रात प्रमुख बँकेकडून मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये लिपिक अधिकारी पदांसाठी आणि अप्रेंटिस सारख्या प्रशिक्षणार्थी पदासाठी मोठी भरती १३,००० पेक्षा जास्त जागांची भरतीची एक मोठी संधी आहे. जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात आपले करिअर घडवायचे आहे ते तुम्ही आताच तयारीला लागा. बँकिंग क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, बँकिंग क्षेत्रात पदांना किती पगार असतो, शैक्षणिक पात्रता याची सर्व माहिती खालील लेखामध्ये दिली आहे.
भरती करणाऱ्या प्रमुख बँकेची यादी
- स्टेट बँक ऑफ इंडिया : या बँक मध्ये SBI प्रोबेशनरी ऑफिसर (PO), लिपिक (Clerk), स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) आणि अप्रेंटिस पदांसाठी भरती घेण्यात येते.
- बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda): या बँक मध्ये IT व्यावसायिकांच्या ४४१ जागा तर वेल्थ मॅनेजमेंट विभागासाठी १०४ जागांसाठी भरती जाहीर करण्यात येते.
- इंडियन बँक (Indian Bank): या इंडियन बँक मध्ये ३५० स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India): या बँक मध्ये तांत्रिक आणि विशेषज्ञ पदांसाठी भरती सुरू करण्यात येत असते.
- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC Bank): या महाराष्ट्र राज्य सरकारी बँक मध्ये वेळोवेळी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते.
- बँकेतील प्रमुख पदांचे स्वरूप : लिपिक (Clerk), प्रोबेशनरी ऑफिसर (PO), स्पेशलिस्ट ऑफिसर (SO), अप्रेंटिस (Apprentice)
शैक्षणिक पात्रता
बँक भरती 2026 (Bank Recruitment 2026) या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे सविस्तर दिली आहे.
लिपिक पदासाठी लागणारी पात्रता खालील प्रमाणे आहे
- उमेदवाराने कोणतेही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असणे अनिवार्य आहे.
- ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केला आहे त्या स्थानिक भाषेचे ज्ञान तुम्हाला असायला हवे. (लिहिता बोलता वाचता येणे आवश्यक्य आहे)
- उमेदवारांना संगणकाचा मूलभूत वापर करता आला पाहिजे.
प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी पात्रता
- उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी.
- अनेक बँक भरतीसाठी पदवी मध्ये किमान ६०% गुणाची अट ठेवत असतात आणि काही बँकेमध्ये फक्त पदवी उत्तीर्ण असणे एवढेच आवश्यक असते.
स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदासाठी पात्रता
- या पदासाठी उमेदवाराने B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics) किंवा MCA केलेले असावे लागते.
- कायदेशीर अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकतो.
- कृषी अधिकारी किंवा संबंधित क्षेत्रामध्ये पदवी पूर्ण असावी लागते.
- हिंदी किंवा संस्कृत या विषयामध्ये पदवी केलेली असणे अनिवार्य असते.
अप्रेंटिस (Apprentice) पदासाठी पात्रता
- मान्यताप्राप्त कोणत्याही विषयांमधून पदवी उत्तीर्ण असावे लागते.
- वय २० ते २८ वर्षे दरम्यान असणे गरजेचे असते.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
बँक भरती 2026 (Bank Recruitment 2026) या भरतीसाठी अर्ज करत असताना खालील दिलेली कागदपत्रे उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.
- १० वी किंवा १२ वी चे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
- पदवी गुणपत्रक
- पदव्युत्तर गुणपत्रक (असेल तर)
- आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
- दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास)
- अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate) (असेल तर)
- पासपोर्ट साईज फोटो
- ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर अर्जाची प्रत -मुलाखतीच्या वेळी
- हॉल तिकीट – मुलाखतीसाठी
निवड प्रक्रिया
बँक भरती 2026 (Bank Recruitment 2026) या पदासाठी निवड प्रक्रिया कशी असते याचे स्वरूप खालील प्रमाणे दिली आहे.
पूर्व परीक्षा (Preliminary Examination) : परीक्षेसाठी लागणारे विषय पुढीलप्रमाणे आहेत : इंग्रजी भाषा, तर्कक्षमता (Reasoning Ability), आणि संख्यात्मक योग्यता (Quantitative Aptitude).
परीक्षा मध्ये विचारले जाणारे प्रश्न MCQ प्रकारची असतात या परीक्षेमध्ये नकारात्मक गुणदान पद्धत ही असते.
मुख्य परीक्षा : मुख्य परीक्षेसाठी लागणारे विषय खालील प्रमाणे आहेत : सामान्य/बँकिंग जागरूकता (General/Banking Awareness), संगणक ज्ञान, इंग्रजी भाषा, डेटा विश्लेषण आणि तर्कक्षमता.
मुलाखत (Interview) : अधिकारी (PO) आणि विशेषज्ञ अधिकारी (SO) पदांसाठी मुलाखत घेण्यात येते.उमेदवाराचा आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि बँकिंग क्षेत्राबद्दल जे ज्ञान तपासण्यासाठी मुलाखत घेण्यात येते.
कागदपत्र पडताळणी (Document Verification) : निवड झालेल्या उमेदवारांना बँकेने दिलेल्या तारखेला सर्व मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी घेऊन यावी लागतात.शैक्षणिक प्रमाणपत्र, वयाचा पुरावा दाखवण्यासाठी 10वी चे गुणपत्रक, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जात प्रमाणपत्र.
परीक्षा अभ्यासक्रम
बँक भरती 2026 (Bank Recruitment 2026) या भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी खालील परीक्षेसाठी लागणारा अभ्यासक्रम देण्यात आला आहे.
- संख्यात्मक योग्यतासाठी (Quantitative Aptitude)
- विषय : सरलीकरण (Simplification), संख्या मालिका (Number Series), सरासरी (Average), टक्केवारी (Percentage), नफा-तोटा (Profit & Loss), गुणोत्तर-प्रमाण (Ratio & Proportion), वेळ आणि कार्य (Time & Work), काळ-वेग-अंतर (Time, Speed & Distance), डेटा इंटरप्रिटेशन (DI) आणि साधे व चक्रवाढ व्याज
- तर्कक्षमता (Reasoning Ability) वाढवण्यासाठी विषय : बैठक व्यवस्था (Seating Arrangement), पझल्स (Puzzles), कोडिंग-डिकोडिंग, रक्त संबंध (Blood Relations), दिशा ज्ञान (Direction Sense), सिलोजिझम (Syllogism), आणि विधानांवर आधारित निष्कर्ष.
- इंग्रजी भाषेसाठी विषय : रीडिंग कॉम्प्रिहेन्शन (Reading Comprehension), क्लोज टेस्ट (Cloze Test), एरर डिटेक्शन (Error Detection), पॅराजंबल्स (Parajumbles), समानार्थी-विरुद्धार्थी शब्द आणि रिक्त जागा भरा (Fill in the blanks).
- सामान्य किंवा बँकिंग जागरूकता साठी विषय (General / Banking Awareness) : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कार्यप्रणाली, बँकिंग टर्म्स (उदा. Repo Rate, CRR, SLR), आर्थिक घडामोडी, सरकारी योजना, चालू घडामोडी (गेल्या ६ महिन्यांच्या) आणि अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना
- संगणकाचे ज्ञान : संगणकाचे मूलभूत भाग (Hardware & Software), ऑपरेटिंग सिस्टीम, MS Office (Word, Excel), इंटरनेट आणि नेटवर्किंग, आणि सायबर सुरक्षा (Cyber Security).
- नियमित मॉक टेस्ट सोडाव्यात आठवड्यातून एक वेळ किमान. दररोज लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स पेपर वाचावी चालू घडामोडी साठी आणि बँकिंग क्षेत्रातील घडामोडींवर जास्त लक्ष ठेवावे.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
बँक भरती 2026 (Bank Recruitment 2026) या पदासाठी अर्ज करताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- सर्वप्रथम तुम्हाला ज्या बँकेत अर्ज करायचा आहे त्या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या sbi.co.in किंवा bankofbaroda.in
- फक्त अधिकृत वेबसाईट वरच विश्वास ठेवा.
- Click here for New Registration हा पर्याय निवडा
- तुमची वैयक्तिक माहिती भरा तुमचे नाव मोबाईल, नंबर आणि ईमेल आयडी
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मोबाईल नंबर वरती रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल, ते जपून ठेवा.
- रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड च्या साहाय्याने लॉगिन करून घ्या
- तुमची शैक्षणिक माहिती आणि वैयक्तिक माहिती अचूक पद्धतीने भरा.
- तुमचा पासपोर्ट साईज फोटो दिलेल्या योग्य साईज मध्ये आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करून द्या.
- अर्जासाठी नमूद केलेले शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या.
- अर्ज भरल्यानंतर E-Receipt आणि Application Form तुम्हाला मिळेल ते आवश्यकही असते जपून ठेवा किंवा त्याची प्रिंट काढून ठेवा.
पदांनुसार पगार
| पदाचे नाव | अंदाजे मासिक पगार |
| लिपिक (Clerk) | ३५,००० – ४६,००० |
| प्रोबेशनरी ऑफिसर (PO) | ६५,००० – ८०,००० |
| स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) | ६०,००० – १,२०,००० |
| व्यवस्थापक (Manager) | ९०,००० – १,२५,००० |

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : बँक भरती 2026 (Bank Recruitment 2026) संदर्भातील अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि इतर अटी संबंधित बँकेच्या अधिकृत अधिसूचनेनुसार लागू राहतील. चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
तुम्ही येथे “महानगरपालिका भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/mahanagarpalika-recruitment-2026/