राष्ट्रीय रेडियो खगोलभौतिकी केंद्र (NCRA), पुणे, येथे प्रशासनिक अधिकारी-ई (Administrative Officer-E 2026) या पदासाठी भरती | Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

प्रशासनिक अधिकारी-ई (Administrative Officer-E) संस्थेमधील आता प्रशासकीय कामकाजाची धुरा सांभाळण्यासाठी संस्थात्मक प्रगतीत योगदान देण्यासाठी या पदासाठी भारती प्रक्रिया निघाली असून, अनुभवी उमेदवारांकडून या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. प्रशासकीय अधिकारी-ई या पदासाठी राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिक पुणे ही टाटा मूलभूत अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत कार्यरत असलेली एक नामांकित स्वायत्त संशोधन संस्था आहे. ही संस्था खगोलक्षेत्राच्या क्षेत्रातील एक जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण संशोधन करत आहे. ही संस्था उटी रेडिओ टेलिस्कोप आणि मीटर तरंगलाबीवरील जगातील सर्वात मोठा टेलिस्कोप असलेला जाइंट मीटरवेव रेडिओ टेलिस्कोप अशा अत्याधुनिक सुविधांचे संचालन करत असते.

तुम्ही या पदाचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर खालील माहिती तुमच्यासाठीच आहे. लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया, पगार आणि या पदा काम काय असते याची सर्व माहिती खालील प्रमाणे सविस्तर दिली आहे.

पदाचे काम

प्रशासनिक अधिकारी-ई (Administrative Officer-E) या पदाचे काम काय असते याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे:

  • ज्यामध्ये विविध विभागांची समन्वय साधने समाविष्ट असतात अशा कामकाजाची नियोजन करणे आणि अंमलबजावणी करणे.
  • संस्थेचे वित्त अर्थसंकल्प आणि संबंधित आर्थिक नियमांचे पालन करून त्या कामासंबंधित असलेला कामाची देखरेख करणे.
  • केंद्रीय स्वायत्त किंवा केंद्र सरकार संस्थाच्या प्रशासकीय आणि आर्थिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन निश्चित करणे.
  • आपल्या अपेक्षा खालील पदांचे म्हणजेच कनिष्ठ सहकाऱ्यांचे नेतृत्व करणे आणि त्यांच्या कामकाजाचे व्यवस्थापन करून देणे.
  • खरेदी आणि निविदा प्रक्रियेसाठी GeM या पोर्टलचा प्रभावी वापर करणे आणि त्यासंबंधीत तपासणे.
  • प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे दैनंदिन कामात संगणक आणि विविध एप्लीकेशन चा वापर करून.

पात्रता (Eligibility)

  • प्रबंध किंवा प्रशासन विषयात कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएट पदवी ६०% गुणांसह उतरण असणे.
  • किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून ग्रॅज्युएट पदवी आणि त्यासोबतच व्यवस्थापन किंवा प्रशासनातील डिग्री किंवा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण असावे लागते.
  • लेवल नऊ मध्ये 10 वर्षाचा अनुभव हसायला हवा किंवा लेवल 10 मध्ये सात वर्षाचा अनुभव असायला हवा.
  • सामान्य प्रशासन आणि वित्त याचे ज्ञान केंद्र सरकार किंवा केंद्रीय स्वायत्त संस्थेमधून असणे आवश्यक आहे.
  • संगणक आणि त्यातील एप्लीकेशन्स वापरण्यामध्ये उत्तम असणे अनिवार्य आहे.
  • जास्तीत जास्त उमेदवाराचे वय ५० वर्ष असावे.

आवश्यक कागदपत्रे

प्रशासनिक अधिकारी-ई (Administrative Officer-E) या पदांमध्ये यश मिळवण्यासाठी उमेदवाराकडे खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

  • पद उत्तर पदवी किंवा पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका (६०% गुण)
  • पदवी सोबत केलेले डिग्री किंवा सर्टिफिकेट कोर्सची मूळ प्रमाणपत्रे
  • कामाचा अनुभव असलेली प्रमाणपत्रे
  • वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडलीचे प्रमाणपत्र किंवा जन्मतारखेचा अधिकृत दाखला असणे अनिवार्य आहे.
  • आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट ओळख पटवण्यासाठी
  • आरक्षण प्रमाणपत्र (लागू असेल तर)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी

टिप : अर्ज भरताना सर्व कागदपत्रे मूळ असावी त्याची खात्री करून घ्या. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही किंवा अर्ज रद्द होऊ शकतो.

निवड प्रक्रिया

प्रशासनिक अधिकारी-ई (Administrative Officer-E) या पदासाठी ची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे दिली आहे.

  • पात्रता तपासणी : उमेदवाराकडे अनुभव निकष पूर्ण आहेत का नाही आणि उमेदवार आवश्यक शैक्षणिक अहर्ता आहे की नाही याची तपासणी करण्यात येते.
  • संख्या मर्यादित करणे : अर्जाची संख्या पाहून जास्त असेल तर संस्थान जाहिराती मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या उमेदवाराची संख्या मर्यादी पर्यंत कमी करण्याचा अधिकार राखून ठेवते.
  • निवड प्रक्रिया : उमेदवाराला निवड प्रक्रियेसाठी बोलवणे बंधनकारक नाही.
  • अंतिम यादी : निवड प्रक्रियेत सोबत अधिक माहितीसाठी आणि वेळेवर येणाऱ्या अपडेट साठी https://tinyurl.com/ncrajob-2026 या अधिकृत संकेतस्थळाला नियमितपणे पाहणे फायदेशीर ठरेल.

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

प्रशासनिक अधिकारी-ई (Administrative Officer-E) या पदासाठीची अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे सोपी आणि ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने केली जाते.

  • ऑनलाइन अर्ज : सर्वप्रथम उमेदवारांनी या पदाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या https://tinyurl.com/ncrajob-2026
  • ​ऑफलाईन अर्ज : जे उमेदवार काही तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन अर्ज करू शकत नाहीत, अशी उमेदवार विहित नमुन्यात अर्ज भरून त्यांची हार्ड कॉपी पाठवू शकतात. हा अर्ज एका बंद लिफाफ्यात असावा आणि त्यावर “पद का नाम” (पदाचे नाव) स्पष्टपणे असणे अनिवार्य आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासनिक अधिकारी-डी
  • एनसीआरए-टीआयएफआर (NCRA-TIFR) ​पोस्ट बॅग ३, गणेशखिंड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर ​पुणे – ४११००७
  • अर्ज अंतिम तारीख : ३० जून २०२६ या तारखेचा आज सर्व उमेदवारांनी आपला अर्ज करावा.
  • तांत्रिक समस्या : ऑनलाइन अर्ज भरते वेळी काही अडचण आल्यानंतर समस्येचे सविस्तर वर्णन करून estt@ncra.tifr.res.in या ईमेल द्वारे संपर्क करावा.
  • सूचना : अर्जाचा नमुना व जाहिराती संबंधित इतर सर्व कागदपत्रे अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असतात. अर्ज करण्यापूर्वी या जाहिरातीची पाहणी करून घ्या.
Administrative Officer-E feature image
राष्ट्रीय रेडियो खगोलभौतिकी केंद्र (NCRA), पुणे, येथे प्रशासनिक अधिकारी-ई (Administrative Officer-E 2026)

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : वरील भरतीविषयीची माहिती अधिकृत जाहिरात, अधिसूचना व उपलब्ध स्रोतांच्या आधारे देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून सर्व माहिती पडताळून घ्यावी. पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया किंवा इतर अटींमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे अंतिम व अधिकृत माहितीकरिता संबंधित संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरातच ग्राह्य धरावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास किंवा गैरसमजास Total Naukri जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या पदाची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/government-college-of-engineering-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!