Credit Officer Recruitment 2026 (बँक ऑफ इंडिया क्रेडिट ऑफिसर भरती 2026) ही भरती 2026 या वर्षामध्ये क्रेडिट ऑफिसर या पदाच्या 779 जागा निघाल्या आहेत. ही भरती प्रक्रिया बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छित असणाऱ्या तरुणांसाठी आणि पदव्युत्तर असलेल्या उमेदवारांसाठी संधी घेऊन आली आहे. जे तरुण सरकारी नोकरीचे स्वप्न बघत होते त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे.
या भरतीतील उमेदवारांची निवड हे ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखती द्वारा करण्यात येते. या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 30 जून 2026 या तारखेपासून सुरू झाली आहे अन्याय भरतीची अंतिम तारीख 20 जुलै 2026 कशी आहे. तारीख संपण्याच्या आत या भरतीचा अर्ज तुम्ही भरून घ्या. ही भरती प्रक्रिया MMGS-II, III आणि IV या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी राबविण्यात आली आहे.
जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे, वेतन, अर्ज प्रक्रिया निवड प्रक्रिया याची सर्व माहिती तुम्हाला या लेखामध्ये खालीलप्रमाणे मिळून जाईल.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
Credit Officer Recruitment 2026 (बँक ऑफ इंडिया क्रेडिट ऑफिसर भरती 2026) या भरतीचा अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे याची माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.
- उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतेही शाखेमधील पदवी असणे आवश्यक आहे.
- पदवी असणे गरजेचे आहे परंतु पदवी मध्ये कमीत कमी ६०% गुण गुण असणे अनिवार्य आहे.
- फक्त पृथ्वी असल्यास तुम्ही असं करू शकत नाही परंतु पुढीलपैकी एक कोणत्याही व्यावसायिक पदवी असल्यास उमेदवाराला प्राधान्य दिले जाऊ शकते: MBA (Finance / Banking), CA (Chartered Accountant), CFA (Chartered Financial Analyst), ICWA (Cost and Management Accountant)
- उमेदवाराकडे संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे अनिवार्य आहे.
नोंद : जर तुम्ही पदवीच्या अंतिम वर्षामध्ये शिकत असाल तर या ज्या तारखेला तुम्ही अर्ज करत आहात त्या तारखेपर्यंत तुमच्याकडे पदवीचे मूळ प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
वयोमर्यादा (Age limit)
Credit Officer Recruitment 2026 (बँक ऑफ इंडिया क्रेडिट ऑफिसर भरती 2026) या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार या वयोमर्यादा असणे अनिवार्य आहे.
| पदाचे नाव (Scale) | वयोमर्यादा (Age limit) |
| MMGS-II | २५ वर्षे ते ३५ वर्षे |
| MMGS-III | २८ वर्षे ते ३८ वर्षे |
| SMGS-IV | ३० वर्षे ते ४० वर्षे |
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
Credit Officer Recruitment 2026 (बँक ऑफ इंडिया क्रेडिट ऑफिसर भरती 2026) या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालील कागदपत्राची यादी असणे फायदेशीर ठरते.
- १० वी आणि १२ वी चे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
- पदवी (Graduation) प्रमाणपत्र ( सर्व वर्षाच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे)
- जर तुम्ही MBA, CA, CFA किंवा ICWA केले असेल तर संबंधित संस्थेचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
- विद्यार्थी जर अंतिम वर्षात असेल तर कॉलेजचे बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा परीक्षेला बसलेला पुरावा.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) किंवा पॅन कार्ड (PAN Card)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate) – असेल तर
- पासपोर्ट साईज फोटो
- PwBD प्रमाणपत्र – अपंगत्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
Credit Officer Recruitment 2026 (बँक ऑफ इंडिया क्रेडिट ऑफिसर भरती 2026) या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन असते. अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे पाहू शकता:
- सर्वप्रथम तुम्ही या बँकेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या bankofindia.co.in
- Click here for New Registration या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमचे नाव संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी टाका आणि नोंदणी करून घ्या.
- नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल. याचा वापर करून लॉगिन करून घ्या.
- यानंतर तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाचा तपशील काळजीपूर्वक भरा.
- नमूद केलेली सर्व कागदपत्रे योग्य साईजमध्ये स्पष्ट दिसतील अशी स्कॅन करून अपलोड करा.
- यानंतर अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा. अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती अचूक असण्याची खात्री करून घ्या. कारण अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येत नाही.
- अर्ज सबमिट करा आणि अर्ज यशस्वी सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून घ्या.
अभ्यासक्रम (Syllabus)
Credit Officer Recruitment 2026 (बँक ऑफ इंडिया क्रेडिट ऑफिसर भरती 2026) भरतीच्या परीक्षा साठी अभ्यासक्रम:
व्यावसायिक ज्ञान (Professional Knowledge)
- बँकिंग आणि क्रेडिट (क्रेडिट धोरण, कर्ज प्रक्रिया, कर्ज वाटप (Loan Disbursement), आणि क्रेडिट मॉनिटरिंग)
- वित्तीय विश्लेषण (ताळेबंद (Balance Sheet) विश्लेषण, नफा-तोटा पत्रक (Profit & Loss Statement), रोख प्रवाह (Cash Flow) विश्लेषण)
- जोखीम व्यवस्थापन (Risk Management) (कर्ज जोखीम (Credit Risk), बासेल निकष (Basel Norms), NPA (Non-Performing Assets) व्यवस्थापन आणि पुनर्प्राप्ती (Recovery)
- कायदेशीर बाबी (सरफेसी (SARFAESI) कायदा, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, आरबीआयचे दिशानिर्देश (RBI Guidelines))
- व्यापार वित्त (Trade Finance) (LC (Letter of Credit), बँक गॅरंटी, आणि परकीय चलन व्यवहार (Forex))
इंग्रजी भाषा (English Language)
- व्याकरण (Grammar) (Error Spotting, Sentence Improvement, Cloze Test)
- शब्दसंग्रह (Vocabulary) (Synonyms, Antonyms, Idioms and Phrases)
- आकलन (Comprehension) ( Reading Comprehension (मोठ्या परिच्छेदावर आधारित प्रश्न)
बँकिंग आणि आर्थिक जागरूकता (Banking & Financial Awareness)
- चालू घडामोडी (Current Affairs)
- भारतीय वित्तीय प्रणाली (Indian Financial System)
- सरकारी योजना (Government Schemes) ज्या बँकांशी संबंधित आहेत
- मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केटची मूलभूत माहिती
वेतन (Salary)
Credit Officer Recruitment 2026 (बँक ऑफ इंडिया क्रेडिट ऑफिसर भरती 2026) या भरतीतील पदांसाठी वेतन हे खालील प्रमाणे पाहू शकतात:
| पदाचे नाव (Scale) | वेतन श्रेणी (Pay Scale) |
| MMGS-II | ६४,८२० – ९३,९६० |
| MMGS-III | ८५,९२० – १,०५,२८० |
| SMGS-IV | १,०२,३०० – १,२०,९४० |

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामधील माहिती अधिकृत भरती अधिसूचना (Official Notification) व उपलब्ध अधिकृत स्रोतांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा तसेच इतर सर्व अटी व शर्ती यांची खात्री करण्यासाठी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरती प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे अद्ययावत माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्या. या लेखामधील माहिती केवळ शैक्षणिक व माहितीपर उद्देशाने देण्यात आली असून, कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेलाच प्राधान्य द्यावे.
तुम्ही येथे “महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळामध्ये भरती (MSIDC) 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/msidc-recruitment-2026/