नवी महानगरपालिका भरती 2026 (Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2026) ही एक महाराष्ट्रातील प्रमुख आणि वेगाने विकसित होणाऱ्या शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाते. मुंबई महानगरपालिकेकडून अनेकदा भरती प्रक्रिया राबविण्यात येते तसेच शहराचा वाढता विकास आणि नागरिकांना दर्जेदार नागरी पायाभूत तसेच आरोग्य सुविधा सातत्याने आणि प्रभावीपणे पुरवण्याच्या उद्देशाने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येते.
या महानगरपालिका भरती मध्ये गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ यामध्ये विविध पदांसाठी आणि यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभाग तांत्रिक विभाग आणि प्रशासकीय विभाग यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाले आहेत. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्र, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि वेतन याची सर्व माहिती खालील लेखामध्ये दिली आहे.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
नवी महानगरपालिका भरती 2026 (Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2026) या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे दिली आहे.
वैद्यकीय आणि आरोग्य विभाग (Medical & Health Dept)
- प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक पदासाठी संबंधित विषयांमधील पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम अर्हता, सोबतच अनुभव असणे अनिवार्य आहे.
- निवासी वैद्यकीय अधिकारी पदासाठी संबंधित विषयांमधील पदव्युत्तर पदवी (MD/MS) असणे महत्त्वाचे आहे.
- स्टाफ नर्स या पदासाठी मान्यता प्राप्त संस्थे मधून जनरल नर्सिंग अँड मिडवायफ्री डिप्लोमा बीएससी (B.Sc) नर्सिंग पदवी असणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नोंदणी झालेली असणे अनिवार्य आहे.
तांत्रिक आणि अभियांत्रिकी पदे (Engineering Posts)
- कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदासाठी संबंधित अभियांत्रिकी शाखेमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदविका असणे महत्त्वाचे आहे.
- तांत्रिक सहाय्यक पदासाठी संबंधित ट्रेड मधील ITI किंवा तत्सम तांत्रिक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
प्रशासकीय आणि इतर पदे (Administrative Posts)
- सहाय्यक आयुक्त पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. (खूप वेळा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून किंवा अनुभवाच्या आधारावर निवड केली जाते)
- लिपिक / लिपिक-टंकलेखक या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि सोबतच टंकलेखनाचे प्रमाणपत्र (मराठी ३० आणि इंग्रजी ४०)
- मल्टिपर्पज वर्कर (MPW) पदासाठी 10 वी उत्तीर्ण असणे आणि आरोग्य संबंधित कामाचा अनुभव किंवा संबंधित प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे महत्त्वाचे आहे.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
नवी महानगरपालिका भरती 2026 (Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2026) या भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्राची यादी खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
- दहावी आणि बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
- पदवी/पदव्युत्तर गुणपत्रके आणि पदवी प्रमाणपत्र
- तांत्रिक प्रमाणपत्रे: (इंजीनियरिंग डिप्लोमा किंवा डिग्री प्रमाणपत्र सोबतच नर्सिंगच्या बाबतीत नोंदणी प्रमाणपत्र)
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
- नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer)
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र (EWS Certificate)
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (Small Family Declaration)
- अनुभवाचा दाखला (Experience Certificate) (काही पदांसाठी लागू)
- MS-CIT प्रमाणपत्र
- टंकलेखन प्रमाणपत्र (मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि.)
- पासपोर्ट साईज फोटो
वयोमर्यादा (Age limit)
नवी महानगरपालिका भरती 2026 (Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2026) साठी लागणारे सर्वसाधारणपणे वयोमर्यादा चे निकष खालीलप्रमाणे देण्यात आले आहे.
| प्रवर्ग | वयोमर्यादा |
| खुला प्रवर्ग (General) | १८ वर्षे – ३८ वर्षे |
| मागासवर्गीय (SC/ST/OBC/VJNT/SBC) | १८ वर्षे – ४३ वर्षे |
| प्राविण्यप्राप्त खेळाडू | १८ वर्षे – ४३ वर्षे |
| माजी सैनिक | १८ वर्षे – ४३ वर्षे + सेवेचा कालावधी + ३ वर्षे |
| दिव्यांग उमेदवार | १८ वर्षे – ४५ वर्षे |
| प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त | १८ वर्षे – ४५ वर्षे |
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
नवी महानगरपालिका भरती 2026 (Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2026) या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्वांना अर्ज प्रक्रिया ही माहीत असणे गरजेचे आहे त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया खालील प्रमाणे दिली आहे.
- सर्वप्रथम नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या nmmc.gov.in
- पोर्टलवर मुख्य पृष्ठभागावर भरती किंवा करिअर या दोन्ही खालीलपैकी एक पर्याय क्लिक करा. यानंतर तुम्हाला चालू असलेला भरती प्रक्रियेची यादी मिळेल.
- तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाची जाहिरात बघा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे, पात्रता, नियम व अटी लक्षपूर्वक वाचा.
- जर तुम्ही अगोदर नोंदणी केली नसेल तर तुम्ही ‘New User/Registration’ हा पर्याय निवडू शकता.
- तुम्हाला तुमचे नाव ईमेल आयडी आणि मोबाईलचा वापर करून नोंदणी करायची आहे.
- नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून लॉगिन करा.
- लोगिन केल्यानंतर अर्ज उघडेल अर्जामध्ये तुमची शैक्षणिक माहिती, वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता आणि जन्म दिनांक) आणि अनुभवाची माहिती योग्य भरा.
- नमूद केलेली सर्व कागदपत्रे (पासपोर्ट आकाराचे फोटो, स्वाक्षरी, शैक्षणिक गुणपत्रके, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे योगी साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज शंकू हा प्रवर्गानुसार असतो ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या आणि शिकायची पावती जपून ठेवा.
- शुल्क भरून झाल्यानंतर अर्जामधील सर्व माहिती अचूक आहे याची खात्री करा. करण अर्जुन एकदा सबमिट केला यानंतर दुरुस्त करता येत नाही.
- माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवा.
वेतन (Salary)
नवी महानगरपालिका भरती 2026 (Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2026) :
| पदाचा प्रकार | वेतन श्रेणी (Pay Scale/Level) | अंदाजित मासिक वेतन |
| गट ‘अ’ (Class I) | लेव्हल S-20 ते S-23 | 56,100 – 1,77,500 |
| गट ‘ब’ (Class II) | लेव्हल S-15 ते S-18 | 41,800 – 1,32,300 |
| गट ‘क’ (लिपिक/तांत्रिक) | लेव्हल S-8 ते S-13 | 25,500 – 81,100 |
| गट ‘ड’ | सरकारी नियमांनुसार | 18,000 – 25,000 |

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखातील माहिती अधिकृत भरती जाहिरात व उपलब्ध सार्वजनिक स्त्रोतांच्या आधारे देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात, संकेतस्थळ व अद्ययावत सूचना काळजीपूर्वक तपासून घ्याव्यात. जाहिरातीत होणारे बदल, दुरुस्त्या किंवा अद्यतने यासाठी लेखक अथवा संकेतस्थळ जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “वकील कसे व्हायचे?” याची संपूर्ण मार्गदर्शन पाहू शकता : https://totalnaukri.com/how-to-become-a-lawyer/