होमगार्ड भरती 2026 (Home Guard Recruitment 2026) या भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी हे सुवर्णसंधी. सर्व तरुण पोरं पोरींचे स्वप्न असतं आपल्या अंगावर खाकी वरती असावी, हे स्वप्न पूर्ण करायची ही एक तुमच्यासाठी संधी चालून आली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात आली लवकरच या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. या भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला आत्ताच तुमचे ग्राउंड पूर्ण करावे लागेल, त्यासाठी तुम्ही आत्ताच तयारीला लागा.
तुम्हालाही देशबा करायची असेल आणि पोलीस प्रशासनाला खांद्याला खांदा लावून मदत करायची इच्छा असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. पुढील एका मध्ये तुम्हाला होमगार्ड भरती बद्दल सर्व माहिती मिळेल. महाराष्ट्र होमगार्ड दल नेमकं काय असते? याच्यामधील कामे काय करावी लागतात? सविस्तर माहिती खालील लेखांमध्ये तुम्हाला भेटेल.
महाराष्ट्र होमगार्ड तर म्हणजे काय?
अनेक तरुणांना असं वाटतं होमगार्ड म्हणजे रेगुलर पोलीसच असतात पण असे नसून, होमगार्ड हे पोलीस प्रशासनाला कायदा सुव्यवस्था आणि इतर आणीबाणीच्या काळात मदत करणारे पोलीस असतात. होमगार्ड दल गृह विभाग महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत काम करत असते. ज्यावेळी शहरात किंवा गावात काही मोठा सण असतो (गणेश उत्सव, दीपावली किंवा ईद), निवडणुका असतात किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा पोलिसांवर चा ताण कमी करण्यासाठी होमगार्डला तिथे शांतता राखण्यासाठी नियुक्त केले जाते. दररोज नोकरी नसली तरीही ग्रामीण भागातील तरुणांना हक्काचा रोजगार आणि वर्दी मिळवून देणारे हे चांगली माध्यम ठरू शकते.
भरतीचे स्वरूप
- भरतीचे नाव हे महाराष्ट्र होमगार्ड भरती 2026 (Home Guard Recruitment 2026)
- विभाग : महाराष्ट्र होमगार्ड दल, ग्रुप विभाग आणि महाराष्ट्र शासन असे विभाग आहे.
- पताचे नाव हे होमगार्ड (गृहरक्षक -पुरुष आणि महिला) असे आहे.
- एकूण जागा याची माहिती अधिकृत जाहिरात आल्यानंतर स्पष्ट सांगता येऊ शकते परंतु येणारे भरती मोठ्या प्रमाणावर जागा निघण्याची शक्यता दर्शवते.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
होमगार्ड भरती 2026 (Home Guard Recruitment 2026) या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.
- दहावीचे गुणपत्रिका
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.
- रहिवासी दाखला (Domicile Certificate)
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र(Non-Creamy layer Certificate)
- इतर प्रमाणपत्र : जर तुम्ही खेळाडू असाल, भूकंपग्रस्त किंवा माजी सैनिक असेल तर त्याचा पुरावा म्हणून प्रमाणपत्र असणे महत्त्वाचे आहे.
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- चालू असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
कामे
- पोलीस दलाला मदत : शहरात किंवा ग्रामीण भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांसोबत होमगार्ड यांची ड्युटी असू शकते. पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी होमगार्ड यांना ड्युटीवर पाठवली जाते.
- बंदोबस्त : सण-उत्सव, यात्रा आणि व्हीआयपी दौरा या काळामध्ये होमगार्ड यांना बंदोबस्तासाठी पाठवण्यात येते.
- निवडणूक ड्युटी : विधानसभेच्या, लोकसभेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका चालू झाल्यानंतर निवडणुका शांततेत पूर्ण होण्यासाठी होमगार्ड यांची ड्युटी असते.
- आपत्ती व्यवस्थापन : काही क्षेत्रांमध्ये पूर, आग लागली किंवा इतर कुठल्याही मोठ्या संकटाच्या वेळी नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी होमगार्ड त्यांची ड्युटी असते.
पगार किती असतो?
होमगार्ड भरती 2026 (Home Guard Recruitment 2026) या भरतीमध्ये होमगार्ड यांना पगार किती मिळतो याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.
- स्वयंसेवी दल असल्यामुळे त्यांना इतर सरकारी कर्मचाऱ्यांसारखा दरमहा न चुकता पगार मिळत नसतो. त्यांना दैनंदिन भत्ता किंवा मानधन देण्यात येते.
- होमगार्ड यांचे मानधन हे जितके दिवस ड्युटी करेल तितके दिवस त्यांना मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा होत जाते.
- महाराष्ट्र शासनाकडून गेल्या काही काळामध्ये होमगार्डच्या रोजच्या भत्त्यात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आली आहे.
- एवढेच नव्हे तर निवडणूक ड्युटी किंवा विशेष बंदोबस्तासाठी अतिरिक्त भत्ता आणि प्रवास खर्चासाठी पैसे देण्यात येते.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
होमगार्ड भरती 2026 (Home Guard Recruitment 2026) या भरतीची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन कशी करावी याचे मार्गदर्शन खालील प्रमाणे आहे.
- सर्वप्रथम महाराष्ट्र होमगार्डच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या maharashtracdhg.gov.in
- यानंतर मुख्य पानावर Home Guard Recruitment 2026 यावर क्लिक करा.
- तुमची सर्व माहिती (नाव, पत्ता, जन्मतारीख आणि शिक्षण) अचूकपणे भरा.
- तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि विचारलेले सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- या भरतीसाठी जर काही अर्ज शुल्क असेल तर ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या.
- फॉर्म सबमिट करण्या अगोदर सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या. आणि अर्ज सबमिट करा
- अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या.

टीप: मित्रांनो, लक्षात ठेवा की होमगार्ड दलाची २०२६ ची अधिकृत जाहिरात सध्या प्रसिद्ध झालेली नाही. पण खात्यांतर्गत हालचाली आणि विविध माध्यमांनुसार येत्या काही महिन्यांतच या भरतीची अधिकृत जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ऐनवेळी धावपळ होण्यापेक्षा, उमेदवारांनी आतापासूनच आपली कागदपत्रे गोळा करणे आणि मैदानी चाचणीची तयारी सुरू ठेवणे फायद्याचे ठरेल. अंतिम माहिती नेहमी शासनाच्या अधिकृत जाहिरातीनुसारच ग्राह्य धरली जाईल.
तुम्ही येथे तलाठी भरतीची तयारी कशी करावी? याची संपूर्ण माहिती पाहू शकता: https://totalnaukri.com/how-to-become-a-talathi/