Anganwadi Bharti 2026: महाराष्ट्रातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस भरती 2026 ची प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून पात्र महिला उमेदवारांना सरकारी योजनांमध्ये काम करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. संबंधित जिल्हा परिषद आणि महिला व बाल विकास विभागाकडून अधिकृत भरती सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
पुणे जिल्हा परिषद (हवेली प्रकल्प) अंतर्गत नवीन भरती जाहीर!
महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे! पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागांतर्गत, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) प्रकल्प हवेली साठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांची बंपर भरती जाहीर झाली आहे.
या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही हेलपाटे मारण्याची गरज नाही. सर्व अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच ‘सखी सहेली’ पोर्टलवर स्वीकारले जाणार आहेत. ऑफलाईन पद्धतीने आलेले अर्ज अजिबात चालणार नाहीत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२६ आहे! त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही.
कोणत्या गावात किती जागा रिक्त आहेत? (गाववार जागांचा तपशील)
हवेली तालुक्यात एकूण ०१ अंगणवाडी सेविका आणि ०८ अंगणवाडी मदतनीस अशी एकूण ९ पदे भरली जाणार आहेत. तुमच्या हक्काच्या गावात जागा आहे का, ते खालील तक्त्यात नक्की तपासून घ्या:
१. अंगणवाडी सेविका पद (एकूण जागा – ०१)
| अ.क्र. | महसुली गावाचे नाव | अंगणवाडी केंद्राचे नाव | रिक्त जागा |
| १ | केसनंद | केसनंद गावठाण | ०१ |
२. अंगणवाडी मदतनीस पद (एकूण जागा – ०८)
| अ.क्र. | महसुली गावाचे नाव | अंगणवाडी केंद्राचे नाव | रिक्त जागा |
|---|---|---|---|
| १ | आव्हाळवाडी | आव्हाळवाडी १ | ०१ |
| २ | फुलगाव | फुलगाव | ०१ |
| ३ | अष्टापूर | खोलशेत | ०१ |
| ४ | सांगरूण | सांगरूण | ०१ |
| ५ | खेड | खेड | ०१ |
| ६ | शिवापूर | शिवापूर | ०१ |
| ७ | मालखेड | मालखेड | ०१ |
| ८ | लोणीकंद | लोणीकंद – २ | ०१ |
विशेष टीप: या भरतीचा फॉर्म फक्त त्याच गावच्या स्थानिक रहिवासी महिला भरू शकतात, बाहेरच्या गावचे अर्ज चालणार नाहीत!
अर्ज करण्यासाठी काय पात्रता हवी? (नियम व अटी)
या नोकरीसाठी शासनाने काही कडक नियम ठरवले आहेत, ते अर्ज करण्यापूर्वी नीट समजून घ्या:
- शिक्षण: अर्ज करणारी महिला किमान १२ वी (बारावी) उत्तीर्ण असावी. जर तुमचे उच्च शिक्षण (पदवी, पदव्युत्तर, डी.एड, बी.एड) किंवा MS-CIT झाले असेल, तर त्याचे गुणपत्रक नक्की जोडा, कारण त्याचे जास्तीचे गुण मिळू शकतात.
- रहिवासी अट: उमेदवार महिला ही फक्त त्याच ग्रामपंचायतीची नाही, तर ज्या महसुली गावात किंवा वाडी-वस्तीवर जागा रिक्त आहे, तिथलीच मूळ रहिवासी असावी. यासाठी तहसीलदारांनी दिलेला रहिवासी दाखला जोडणे बंधनकारक आहे.
- वय किती असावे?: अर्ज करताना वय कमित कमी १८ वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त ३५ वर्षे असावे. विधवा उमेदवारांसाठी वयाची अट ४० वर्षांपर्यंत शिथिल आहे. वयाच्या पुराव्यासाठी टीसी (TC) किंवा जन्माचा दाखला चालेल.
- भाषेचे ज्ञान: महिला उमेदवाराला मराठी भाषा उत्तम बोलता आणि लिहिता आली पाहिजे. १० वी मध्ये मराठी विषय असणे आवश्यक आहे.
लहान कुटुंबाचे नियम लक्षात ठेवा: अर्ज करणाऱ्या महिला उमेदवाराला २ पेक्षा जास्त हयात मुले (अपत्ये) नसावीत. विवाहित असो वा अविवाहित, सर्वांना अर्जासोबत ‘परिशिष्ट ब’ मधील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जोडावेच लागेल. नोकरी मिळाल्यानंतर जर तिसरे मूल झाले, तर थेट सेवेतून काढून टाकले जाईल.
सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक :
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
जास्तीचे गुण (अतिरिक्त गुण) कोणाला मिळणार?
गुणवत्ता यादी तयार करताना काही विशेष प्रवर्गातील महिलांना प्राधान्य दिले जाते:
- विधवा व अनाथ महिला: विधवा उमेदवारांना पतीच्या मृत्यूचा दाखला व अनाथ महिलांना महिला बाल विकास विभागाचे प्रमाणपत्र जोडल्यास १० जास्तीचे गुण मिळतील.
- अनुभवी महिला: ज्यांनी आधी अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून शासकीय प्रकल्पात किमान २ वर्षे काम केले आहे, त्यांना अनुभवाचे गुण मिळतील. (खाजगी संस्थेचा अनुभव चालणार नाही).
- मागासवर्गीय प्रवर्ग: अनुसूचित जाती/जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, ओबीसी किंवा SEBC मधील उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्याचा जातीचा दाखला जोडणे गरजेचे आहे.
नोकरीचे स्वरूप आणि मिळणाऱ्या सवलती
- हे पद पूर्णपणे मानधनी (Honorarium) तत्त्वावर आहे. ही नियमित शासकीय नोकरी नसल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतर सवलती याला लागू होत नाहीत.
- वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम असेपर्यंत ही सेवा करता येते.
- हे स्थानिक पातळीवरचे पद असल्याने यात बदलीची (Transfer) कोणतीही सोय नसते.
- निवड झाल्यानंतर महिला उमेदवाराला इतर कोणतीही खाजगी किंवा निमशासकीय नोकरी करता येत नाही, तसेच राजकारणात भाग घेता येत नाही.
ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
- अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत सखी सहेली पोर्टलला भेट द्या.
- ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ०६ जुलै २०२६ ते १७ जुलै २०२६ पर्यंतच आहे. शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकर फॉर्म भरून घ्या.
- फॉर्म भरताना सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती नीट स्कॅन करून आणि सक्षम अधिकाऱ्यांकडून साक्षांकित (Attested) करूनच अपलोड कराव्या लागतील.
फॉर्मसोबत जोडायची महत्त्वाची कागदपत्रे:
- इयत्ता १२ वीचे गुणपत्रक (Attested).
- उच्च शिक्षणाचे प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- तहसीलदारांचा रहिवासी दाखला.
- जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला (TC).
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (परिशिष्ट ब).
- स्वयं घोषणापत्र (प्रपत्र ब) उमेदवाराच्या स्वाक्षरीसह.
- जातीचा दाखला किंवा EWS/SEBC प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- नावात बदल असल्यास विवाह नोंदणी दाखला किंवा गॅझेट.
