बस वाहक भरती 2026 (Bus Conductor Recruitment 2026) १० वी वर मिळवा सरकारी नोकरीची Best संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

बस वाहक भरती 2026 (Bus Conductor Recruitment 2026) तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोध असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ आणि बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम हे सर्व महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतुकीचे उपयुक्त आणि महत्त्वाचा कण आहे.

Bus Conductor Recruitment 2026 :- सध्याच्या काळातील वाढती नागरिक संख्या आणि बसेसच्या ताब्यात होणारी भर यामुळे या संस्थेने मोठ्या प्रमाणामध्ये भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. 2026 मध्ये बस वाहक पदासाठी 364 चाकांची भरती निघाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये फक्त रक्त जागा भरणे एवढेच नव्हे तर राज्यातील सार्वजनिक प्रवासी सेवा अधिक सक्षम आणि वेळेवर उपलब्ध होणे हा या भरतीचा उद्देश आहे.

तुम्ही सरकारी नोकरीचे स्वप्न बघत आहात तर ही संधी गमू नका लवकरात लवकर अर्ज करा आणि नोकरी मिळवा. या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया त्याची सर्व सविस्तर माहिती खालील लेखामध्ये पाहू शकता:

पात्रता – Eligibility

बस वाहक भरती 2026 (Bus Conductor Recruitment 2026) या भरतीसाठी उमेदवारांकडे कोणती पात्रता असणे अनिवार्य आहे त्याची माहिती खालीलप्रमाणे पाहू शकता:

  • उमेदवाराचे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळा मधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
  • उमेदवारांना स्थानिक भाषेची म्हणजेच मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असणे अनिवार्य आहे. मराठी भाषा बोलता लिहिता आणि वाचन करता येणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराकडे प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधून अधिकृतपणे (RTO) मिळालेले बस वाहक परवाना असणे बंधनकारक आहे.
  • आरटीओ मधून मिळालेला अधिकृत बिल्ला असणे अनिवार्य आहे परवान यासोबत हा बिल्ला असणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याशिवाय अर्ज करता येऊ शकत नाही.
  • उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष या दरम्यान असणे महत्त्वाचे आहे.
  • उमेदवाराची दृष्टी स्पष्ट आणि चांगली असावी. उमेदवार शारीरिक दृष्ट्या सुदृढ असणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तो बसमध्ये प्रवाशांचा तिकीट तपासणी आणि व्यवस्थेचे काम बिनधास्तपणे करेल.
  • उमेदवारांच्या नावावर म्हणजेच चारित्राबद्दल कोणत्याही प्रकारची फौजदारी नोंदणी नसावी.

टीप : सध्या तुमच्याकडे कुठलाही प्रकारचा वाहन परवाना आणि बिल्ला नसेल तर लवकरात लवकर जवळच्या आरटीओ कार्याला भेट द्या आणि परवाना सोबतच बिल्ला मिळवून घ्या.

आवश्यक कागदपत्रे – Required Document

बस वाहक भरती 2026 (Bus Conductor Recruitment 2026) या भरतीचा अर्ज भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे दिली आहे.

  • उमेदवाराचे 10 वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असणे महत्त्वाचे आहे.
  • ​वैध वाहक परवाना (Valid Conductor License)
  • बिल्ला (Conductor Badge)
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र (Voting ID)
  • जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
  • नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • शाळा सोडलेला दाखला किंवा जन्म दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी
  • जर तुम्ही या अगोदर परिवहन क्षेत्रामध्ये किंवा कंत्राटी पद्धतीने काम केलेले असेल तर त्याचे अनुभव प्रमाणपत्र असेल तर फायरदेशील ठरे.
  • चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असणे अनिवार्य आहे कारण सर्व नोंदणी आणि संपर्कासाठी महत्त्वाचे आहे.

वयोमर्यादा (Age limit)

बस वाहक भरती 2026 (Bus Conductor Recruitment 2026)

प्रवर्ग (Category)वय
खुला प्रवर्ग (Open Category)18 – 38
मागासवर्गीय (SC/ST/VJ/NT/OBC/SBC)18 – 43
माजी सैनिक (Ex-Servicemen)18 – 43 (सेवा कालावधी + ३ वर्षे)
प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त18 – 45
खेळाडू (Sports Category)18 – 43

निवड प्रक्रिया

बस वाहक भरती 2026 (Bus Conductor Recruitment 2026) या भरतीची निवड प्रक्रिया तुम्हाला माहीत असणे महत्त्वाचे आहे.

  • उमेदवारांकडून संबंधित महामंडळाच्या अधिकृत पोर्टल वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
  • रिचार्ज सोबत अभिषेक कागदपत्राची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करणे बंधनकारक असते.
  • अर्ज भरल्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे अर्ज शुल्क हा ऑनलाईन पद्धतीने भरावे लागते.
  • अर्ज भरल्यानंतर जर अर्जामध्ये कुठलाही प्रकारचे त्रुटी आढळले नाही तर त्या उमेदवारांना परीक्षेसाठी बनवण्यात येते.
  • भरती प्रक्रियेमध्ये 10वीच्या स्तरावरील परीक्षेमधील प्रश्न विचारले जातात.
  • परीक्षेचे विषय : सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, अंकगणित आणि बस वाहक म्हणून काम करण्यासंबंधित तांत्रिक प्रश्न विचारले जाऊ शकतात.
  • ही परीक्षा बहुपर्यायी म्हणजेच MCQ प्रकारची असते.
  • लेखी परीक्षेमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येते.
  • यानंतर तुमचे 10 वीचे प्रमाणपत्र वयाचा पुरावा जातीचे प्रमाणपत्र आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजेच आर.टी.ओ. (RTO) कडून मिळालेले मूळ वाहक परवाना आणि बिल्ला तपासण्यात येतो.
  • बस वाहकाचे काम हे सतत उभ्याने करण्याचे आणि प्रवाशांची सतत संबंधित असलेल्या उमेदवारांची शारीरिक तंदुरुस्ती तपासण्यात येते.
  • वैद्यकीय चाचण्या केल्या जातात दृष्टी तपासली जाते यामुळे उमेदवार वाहक म्हणून काम करण्यास सक्षम आहे याची खात्री पटवली जाते.
  • लेखी परीक्षेमधील गुण आणि कागदपत्र पडताळणी पातळीनुसार अंतिम यादी तयार करण्यात येते आणि जाहीर केली जाते.
  • निवड झाल्यानंतर उमेदवारांना कामावर घेण्याअगोदर काही दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये तिकीट मशीन हाताळणे, प्रवाशांशी संवाद साधणे सोबतच महामंडळाचे नियम या गोष्टी शिकवल्या जातात.
  • प्रशिक्षण संपूर्ण पार पडल्यानंतर उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येते.

महत्त्वाची सूचना : लेखी परीक्षेची तारीख आणि हॉल तिकीट मिळवण्यासाठी उमेदवाराने अधिकृत जाहिरातीला नियमित लक्षात ठेवणे अनिवार्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षेमध्ये गुण वाढवण्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिका याचा अभ्यास करा.

अर्ज प्रक्रिया – How to Apply

बस वाहक भरती 2026 (Bus Conductor Recruitment 2026) या भरतीची अर्ज प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑनलाईन असते याची सर्व माहिती खालील प्रमाणे पाहू शकता:

  • सर्वप्रथम महामंडळाच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या. https://www.bestundertaking.com/
  • तुम्ही जर या अगोदर अर्ज केला नसेल माहीत नसेल तर सर्वात अगोदर ‘नवीन नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका आणि नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल याचा वापर करून लॉगिन करा.
  • लोगिन केल्यानंतर वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, आधार नंबर आणि जन्मतारीख), शैक्षणिक माहिती आणि तांत्रिक माहिती काळजीपूर्वक भरा.
  • तुमचा फोटो आणि स्वाक्षरी स्पष्ट दिसेल अशी स्कॅन करून अपलोड करा.
  • यानंतर सर्व नमूद केलेली कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्र, आरटीओ परवाना आणि इतर आवश्यक कागदपत्र) योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • या नंतर प्रवर्गानुसार ठरवलेली शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा या शिवाय अर्ज पूर्ण झाला असे गृहीत धरले जाणार नाही.
  • शुल्क भरून झाल्यानंतर गरजा मधील सर्व माहिती पुन्हा एकदा तपासा सर्व माहिती अचूक असल्याची खात्री पटवा.
  • माहिती पाहून झाल्यानंतर सबमिट करा. अर्ज यशस्वी सुमित झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून जतन करून ठेवा.

महत्त्वाची सूचना: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्रे तसेच अर्जाची अंतिम तारीख यांची खात्री करूनच अर्ज सादर करा. भरतीसंबंधीचे सर्व निर्णय संबंधित प्राधिकरणाच्या अधिकृत अधिसूचनेनुसारच ग्राह्य राहतील.

तुम्ही येथे “महाराष्ट्र होमगार्ड भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/home-guard-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!