BMC Recruitment 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही भरती प्रक्रिया एकूण 115 रिक्त पदे | Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

BMC Recruitment 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही भरती प्रक्रिया एकूण 115 रिक्त पदे निवड तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्त्वावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. जे तरुण सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत होते त्यांच्यासाठी ही एक संधी चालून आली आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये प्रयोगशाळा परिचय, सेवक, वीजतंत्री, तारतंत्री, सफाईगार, कक्षपरिचर, आया, माळी, हमाल, शिंपी यांसारख्या विविध पदांचा समावेश असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून यापैकी प्रक्रियेचे अर्ज 30 जुलै 2026 या तारखेच्या आत मागवण्यात आले आहेत. या भरतीची अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑफलाइन या स्वरूपात आहे आणि अर्ज शुल्क प्रवर्गानुसार भरणे बंधनकारक आहे. या भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये पाहू शकता:

महत्त्वाच्या तारखा :
जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख: दिनांक २१.०७.२०२६
अर्जाचे शुल्क भरण्याचा कालावधी: दिनांक २२/०७/२०२६ ते दिनांक ३०/०७/२०२६ पर्यंत
अर्ज स्वीकारण्याचा/सादरीकरणाचा कालावधी: दिनांक २२/०७/२०२६ ते दिनांक ३०/०७/२०२६ पर्यंत
​अर्जाची अंतिम मुदत: दिनांक ३०/०७/२०२६ रोजी संध्याकाळी ०४:०० वाजेपर्यंत

BMC Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती या पदासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता उमेदवारांकडे असणे अनिवार्य आहेत याची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • सर्वसाधारण अट (अनुक्रमांक १ ते २४ मधील पदांसाठी): संबंधित समोराचे शैक्षणिक अर्हतेनुसार उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतर परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेले मराठी विषय उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
  • तसेच उमेदवाराला मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराची 10 वी उत्तीर्ण असणे महत्त्वाचे आहे.
  • वीजतंत्री (पद क्र. ३), तारतंत्री (पद क्र. ४), उदवाहनचालक (पद क्र. ५), उदवाहनचालक नि तारतंत्री-II नि उदंचनचालक (पद क्र. ६), तारतंत्री – नि उदवाहनचालक नि उदंचनचालक (पद क्र. ७):
  • या पदासाठी उमेदवाराचे 10 वी परत शिक्षण पूर्ण झालेले असावे.
  • महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तारतंत्री परवानाधारक असावा अथवा 20 तंत्र किंवा तारतंत्री या व्यवसायाचे आयटीआय किंवा एनसीटीव्हीटी (NCTVIT) परीक्षा उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली असणे बंधनकारक आहे.
  • प्रशितन मदतनीस (पद क्र. ८), कक्ष नोकर (पद क्र. ११), माळी नि सफाईगार (पद क्र. १३), हमाल नि कामगार (पद क्र. १७), नाभिक (पद क्र. २२), शिंपी (पद क्र. २४): या पदासाठी उमेदवाराने खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या व्यवसाय चाचणी मध्ये उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. याशिवाय शिंपी पदासाठी मान्यताप्राप्त शासकीय संस्थेचे शिवणकला व का तर कामाचा एक वर्षाचा प्रशिक्षणाचा काळ समाधानकारकरिता पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र किंवा श्रमिक विद्यापीठाचा किमान 20 आठवड्याचा ॲडव्हान्स टेलरिंग कोर्स पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
  • सफाईगार (पद क्र. ९, १५), कक्षपरिचर (पद क्र. १०), आया (पद क्र. १२), माळी (पद क्र. १४), हमाल (पद क्र. १६), कामगार (पद क्र. १८), मदतनीस (पद क्र. २३): उमेदवाराची 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
  • ​रुग्णवाहिनी परिचर (पद क्र. १९), शववाहीनी परिचर नि हलालखोर नि रुग्णवाहीका परिचर (पद क्र. २०): या पदासाठी देखील उमेदवाराची दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

BMC Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Document

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्राची यादी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

  • उमेदवाराने भरलेला संपूर्ण अर्ज स्पष्ट अक्षरांमध्ये असावा.
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे: १०वी व १२वीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र, तसेच संबंधित पदाच्या अर्हतेनुसार आवश्यक असणारी इतर कागदपत्रे जसे की पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी, फेलोशिप, MSCIT किंवा टंकलेखन प्रमाणपत्र
  • नोंदणी प्रमाणपत्र: संबंधित परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र
  • कोणत्या पदासाठी लागू असेल तर अनुभव प्रमाणपत्र सोबत ठेवा
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड गरजेचे आहे
  • पत्त्याचा पुरावा पाहण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल, मतदान ओळखपत्र किंवा रेशन कार्ड यापैकी कोणतेही एक असेल तरी चालते.
  • महिलेचा विवाह झाला असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  • वरील सर्व कागदपत्राची व प्रमाणपत्राची छायांकित प्रती स्वयं प्रमाणेच करून अर्जासोबत जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

BMC Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

तपशीलमाहिती
वयोमर्यादेची निकषाची तारीखदिनांक ०१.०७.२०२६ रोजी
किमान वय१८ वर्षांपेक्षा कमी नससावे
कमाल वय३८ वर्षांपेक्षा जास्त असावे कामा नये

BMC Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती या पदासाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने आहे याचा अर्ज आणि सांगितलेली सर्व कागदपत्रे प्रत्यक्ष जाऊन जमा करायचे आहेत.

  • सर्वात महत्त्वाचे अर्ज हा प्रत्यक्ष सादर करणे अनिवार्य आहे, लक्षात घ्या टपाल आणि किंवा ऑनलाइन पद्धतीने भरलेला अर्ज ग्राह्य मानला जाणार नाही.
  • अर्जुन शुल्क हे रु. ८७०/- + १८% जी.एस.टी. (रु. १५८/-) = एकूण रु. १०२८/- इतकी असून अर्ज शुल्क सुद्धा ऑफलाइन पद्धतीने जमा करायची आहे.
  • अर्ज शुल्क भरण्याचा पत्ता . रूस्तम नरसी कूपर रुग्णालय, पहिला मजला, डी विंग, रोखपाल विभाग (रुम नं. ६५) येथे सकाळी ११:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत (सर्व शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळून)
  • अर्ज या तारखे मध्ये जमा केला तर ग्राह्य धरला जाईल : २२/०७/२०२६ ते दिनांक ३०/०७/२०२६ पर्यंत
  • अर्ज सादर करण्याचे ठिकाण : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्णालयाचा पहिला मजला, डी विंग
  • सर्वात महत्त्वाची अट अर्ज शुल्क भरल्यानंतर शुल्क भरल्याची पावती अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे अन्यथा अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
Apply link येथे क्लिक करा
Notification linkयेथे क्लिक करा

BMC Recruitment 2026 : मानधन – Salary

पदाचे नाव / संवर्गएकूण पदेठोक मानधन (प्रति महिना)
प्रयोगशाळा परिचर715,000/-
प्रयोगशाळा सेवक315,000/-
वीजतंत्री, तारतंत्री, उदवाहनचालक, तारतंत्री नि उदवाहनचालक / उदंचनचालक, प्रशितन मदतनीस1,1,3,1,1,5 (12)18,000/-
सफाईगार, कक्षपरिचर, कक्ष नोकर, आया, माळी नि सफाईगार, माळी, सफाईगार नि हलालखोर, हमाल, हमाल नि कामगार, कामगार विविध पदे एकूण 8518,000/-
रुग्णवाहिनी परिचर215,000/-
शववाहीनी परिचर नि हलालखोर नि रुग्णवाहीका परिचर515,000/-
व्रणोपचारक217,000/-
नाभिक215,000/-
मदतनीस118,000/-
शिंपी217,000/-
BMC Recruitment 2026 feature image
BMC Recruitment 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) भरती 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (Notification) काळजीपूर्वक वाचा. पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि निवड प्रक्रिया यांची खात्री करूनच अर्ज करा. अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत ऑनलाइन अर्ज पूर्ण करा. अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांनुसारच अर्ज करावा.

तुम्ही येथे “IBPS Bank Recruitment 2026” ची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/ibps-bank-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!