IBPS Bank Recruitment 2026 : दरवर्षी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन द्वारे भरती प्रक्रिया राबवली जाते, 2026 या वर्षात CRP SPL-XVI ही स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) या पदाच्या भरतीसाठी या बँकेअंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये करिअरचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक सर्वोत्तम संधी आहे.
या भरती प्रक्रियेचा प्रमुख उद्देश म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये लागणाऱ्या विशेष सेवा जसे माहिती तंत्रज्ञान (IT), कृषी (Agriculture), कायदा (Law), मानवी संसाधन (HR/Personnel), राजभाषा आणि विपणन (Marketing) या क्षेत्रांमधील पदवी धारक किंवा पदव्युत्तर उमेदवारांची बँक अधिकाऱ्यांच्या पदावर निवड करण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
या भरतीची निवड प्रक्रिया म्हणजेच परीक्षा ही तीन टप्प्यामध्ये पार पडते पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे या परीक्षेचे असतात. याची संपूर्ण माहिती अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया, परीक्षेचे स्वरूप परीक्षा माहिती याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्हाला खालील संपूर्ण लेख वाचणे गरजेचे आहे.
महत्त्वाच्या तारखा :
जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख : ३० जून २०२६
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : १ जुलै २०२६
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ जुलै २०२६ (मुदत वाढवली आहे)
ऑनलाइन परीक्षा (पूर्व परीक्षा) प्रवेशपत्र डाउनलोड : ऑगस्ट २०२६
मुख्य परीक्षा (Mains Exam) : नोव्हेंबर २०२६
IBPS Recruitment 2026 : एकूण पदे
| पदाचे नाव | एकूण जागा |
| आय.टी. ऑफिसर (IT Officer – Scale I) | 376 |
| ॲग्रिकल्चरल फील्ड ऑफिसर (Agricultural Field Officer) | 370 |
| लॉ ऑफिसर (Law Officer) | 125 |
| राजभाषा अधिकारी (Rajbhasha Adhikari) | 94 |
| एचआर/पर्सोनेल ऑफिसर (HR/Personnel Officer) | 60 |
| मार्केटिंग ऑफिसर (Marketing Officer) | 10 |
| एकूण पदे | 1,035 |
IBPS Bank Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
आयबीपीएस (IBPS) स्पेशालिस्ट ऑफिसर भरती या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांकडे खालील शैक्षणिक पात्रता असेल तर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरवू शकतो.
- आय.टी. ऑफिसर (Scale-I): संगणक विज्ञान (Computer Science), आय.टी., इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, किंवा संबंधित विषयामध्ये चार वर्षाचा इंजीनियरिंग किंवा टेक्नॉलॉजी पदवी किंवा संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी पूर्ण झालेली असणे आवश्यक ठरते.
- ॲग्रिकल्चरल फील्ड ऑफिसर (Scale-I): या पदासाठी उमेदवाराने कृषी (Agriculture), उद्यानविद्या (Horticulture), पशुसंवर्धन, दुग्धशास्त्र, मत्स्यव्यवसाय, कृषी अभियांत्रिकी किंवा संबंधित क्षेत्रामध्ये चार वर्षाची पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- राजभाषा अधिकारी (Scale-I): पदवी स्तरावर इंग्रजी विषयासोबतच हिंदी विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी किंवा पदवी स्तरावरील हिंदी आणि इंग्रजी विजया सोबत संस्कृत मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी पूर्ण केलेली असणे अनिवार्य आहे.
- लॉ ऑफिसर (Scale-I): कायद्याची पदवी म्हणजेच एल.एल.बी आणि बार कौन्सिलकडे वकील म्हणून नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
- एचआर/पर्सोनेल ऑफिसर (Scale-I): या पदासाठी पदवी सोबतच पर्सनल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन, एचआर, एचआरडी किंवा सोशल वर्क मध्ये दोन वर्षाची पूर्ण वेळ पदवी किंवा दोन वर्षाचा पूर्ण वेळ पदव्युत्तर पदविका असणे आवश्यक असते.
- मार्केटिंग ऑफिसर (Scale-I): मार्केटिंग ऑफिसर या पदासाठी पदवी सोबतच 2 वर्षाची पूर्ण वेळ एमएमएस MMS (मार्केटिंग), MBA (मार्केटिंग) किंमत मार्केटिंग विषयी सोबत PGDBA/PGDBM/PGPM/PGDM केलेले असणे गरजेचे आहे.
IBPS Bank Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit
| वयाचा निकष | तपशील |
| किमान वय | 20 वर्षे |
| कमाल वय | 20 वर्षे |
| महत्त्वाची तारीख (वयोमर्यादा गणनेसाठी) | उमेदवाराचा जन्म साधारणपणे २ जुलै १९९६ पूर्वीचा आणि १ जुलै २००६ नंतरचा नसावा. |
IBPS BanknRecruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
आयबीपीएस (IBPS) स्पेशालिस्ट ऑफिसर भरती या भरतीचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे याचे यादी अर्सदाराकडे असणे फायदेशीर ठरते.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक मग कागदपत्र असणे गरजेचे आहे.
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडलेला दाखला
- 10वी आणि 12 वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- पदवी (Graduation) किंवा पदव्युत्तर पदवीची (Post Graduation) सर्व सेमिस्टर ची गुणपत्रक, प्रमाणपत्र आणि पदवी प्रमाणपत्र.
- पदानुसार आवश्यक असणारे प्रमाणपत्र किंवा वकिलीची नोंदणी असलेली प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- उत्पन्न व मालमत्ता प्रमाणपत्र (EWS)
- अपंगत्व प्रमाणपत्र (PwD)
- ऑनलाइन अर्जाची प्रिंटआउट
- फी भरल्याची पावती (E-Receipt)
- पासपोर्ट साईज फोटो आणि मी स्वाक्षरी
IBPS Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
आयबीपीएस (IBPS) स्पेशालिस्ट ऑफिसर भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे पाहू शकता:
- सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी IBPS बँकेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या www.ibps.in
- अधिकृत पोर्टलवर घेतल्यानंतर ‘CRP Specialist Officers’ या लिंक वर जाऊन नोंदणी करा.
- नोंदणी केल्यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून लॉगिन करा.
- लग्न केल्यानंतर अर्जामधील तुमची वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता आणि जन्मतारीख), शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती अचूक भरा.
- नमूद केलेली सर्व कागदपत्र पासवर्ड आकाराचा फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज शुल्क प्रवर्गानुसार ऑनलाइन पद्धतीने भरून घ्या. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज पूर्ण मानला जात नाही.
- अर्ज शुल्क भरून झाल्यानंतर अर्जा मधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या कारण अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येत नाही.
- माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर अर्ज सबमिट करा आणि अर्थ सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवा.
- अर्जाची प्रिंट आउट आणि अर्जुन शुल्क भरलेली पावती भविष्यात कामाला येऊ शकते.
IBPS Bank Recruitment 2026 : वेतन Salary
आयबीपीएस (IBPS) स्पेशालिस्ट ऑफिसर या भरतीचे विविध पदांसाठी वेतन खालील प्रमाणे देण्यात आले आहे.
| वेतनाचे घटक (Components) | तपशील |
| मूळ वेतन (Basic Pay) | 48,480 |
| वेतनश्रेणी (Pay Scale) | 48,840 – 2000/7 – 62,480 – 2340/2 – 67,160 – 2680/7 – 85,920 |
| घटनाव्दारे मिळणारी एकूण ग्रॉस सॅलरी (Gross Salary) | अंदाजे 75,000 – 90,000 प्रतिमहिना (भत्त्यांसह) |
| हातात येणारा पगार (In-Hand Salary | अंदाजे 60,000 – 75,000 प्रतिमहिना |
IBPS Bank Recruitment 2026 : परीक्षा स्वरूप
- पूर्वपरीक्षा : पूर्वपरीक्षा फक्त पात्र उमेदवारांसाठी वर्गवारी करण्यासाठी असते. या पूर्व परीक्षेचे गुण अंतिम मेरिट लिस्ट मध्ये जोरले जाणार नाहीत.
- परीक्षा ही पूर्णपणे पारदर्शक असते आणि परीक्षेमध्ये प्रश्न बहुपर्यायी प्रश्न (Objective Type) असतात.
- परीक्षेमधील एकूण प्रश्न 100 प्रश्न आणि एकूण गुण 125 असतात परीक्षा वेळ हा 80 मिनिट असतो. या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग असते प्रत्येकी चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केला जातो.
- मुख्य परीक्षा : मुख्य परीक्षा ही पूर्व परीक्षेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी असते या परीक्षेमधील एकूण अंतिम निवड यादी तयार करताना या परीक्षेमधील गुण ग्राह्य धरले जाते.
- स्वरूप : पदानुसार संबंधित विषयाचे सखोल ज्ञान तपासण्यासाठी मुख्य परीक्षा घेण्यात येते यामध्ये ऑब्जेक्टिव प्रश्न सोबत काही पदांसाठी वर्णनात्मक पेपरही असू शकतो.
- मुलाखत : मुलाखत हे मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी असते आणि हा निवड प्रक्रियेचा अंतिम टप्पा मानला जातो.

महत्त्वाची सूचना (Disclaimer): वरील भरतीविषयीची माहिती अधिकृत अधिसूचनेच्या आधारे संक्षिप्त स्वरूपात देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि इतर सर्व अटी-शर्ती अधिकृत IBPS अधिसूचनेतून काळजीपूर्वक तपासाव्यात. अधिकृत जाहिरात वाचल्यानंतरच अर्ज करावा. जाहिरातीत किंवा नियमांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. चुकीच्या माहितीसाठी किंवा अर्ज प्रक्रियेत झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी लेखक किंवा totalnaukri.com जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे तलाठी भरती 2024 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/talathi-recruitment-2026/